Contents
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात
बेळगाव—belgavkar—belgaum : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दुधगंगा नदी पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. रवी बाबू शिंदे (वय 38, रा. सातारा) असे मृताचे नाव आहे.
निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला दुधगंगा नदीपुलाजवळ वाहनाने धडक
निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला कोगनोळी दुधगंगा नदीपुलाजवळ वाहनाने धडक दिली. यात दुचाकीस्वार खाली कोसळल्याने त्याच जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार प्रकाश तळवार यांनी भेट दिली. मृताच्य खिशात असलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी ओळख पटवण्याचे काम सुरु ठेवले होते. तो निपाणी येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. परतत असताना हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Youth killed near Dudhganga river bridge