बेळगाव : यरमाळ रोडवर अपघातात युवक ठार

Belgaum Belgavkar
2 Min Read
  • दुचाकी अपघातात धामणेचा युवक ठार
  • यरमाळ रोडवरील घटना
  • वेळीच मदत न मिळाल्याने मृत्यू

बेळगाव—belgavkar—belgaum : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी यरमाळ रोडवर उघडकीस आली. भूषण कृष्णा पाटील (वय 32, रा. पाटील गल्ली, धामणे) असे मृताचे नाव आहे. रात्री झालेल्या अपघातानंतर वेळीच मदत न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : भूषण हा धामणेहून सासरवाडी नागेनहट्टीला निघाला होता. सोमवारी रात्री तो यरमाळ रोडमार्गे जात होता. धामणेजवळील शहापूर तलावाच्या ठिकाणी वळण आहे. या वळणाचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे, दुचाकी रस्त्याकडेला पडली व भूषण उडून जाऊन बाजूला असलेल्या दगडाच्या ढिगार्‍यावर पडला. येथील दगडावर डोके आपटून तो ठार झाला. रात्रीची या मार्गावर वर्दळ कमी असल्याने तसेच अंधार असल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही.

मंगळवारी सकाळी ढिगार्‍यावर कुणीतरी पडल्याचे आढळून आले. ही माहिती वडगाव पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृताची ओळख पटली. या प्रकरणाची नोंद वडगाव ग्रामीण पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी पुढील तपास करीत आहेत. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी व बहिणी असा परिवार आहे.

भूषण स्वतःचा ट्रॅक्टर चालवत होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या अचानक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तो मनमिळाऊ व परोपकारी वृत्तीचा होता. रस्त्याकडेला रात्रीच्या वेळी पडल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. वेळेत उपचार मिळाले असते, तर तो वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी होती.

- Advertisement -

 

#Belgaum #YarmalRoad #Accident #YouthTragedy #RoadSafety #MotorcycleAccident #BelgaumNews #TragicIncident #CommunitySupport #EmergencyResponse #LifeLost #Awareness #SafetyFirst #LocalNews #BelgaumDistrict #RoadAccident #Condolences #SupportFamily #Grief #RememberingBhushan

Youth killed in accident on Yarmal Road Belgaum
Youth killed in accident on Yarmal Road Belgaum

Youth killed in accident on Yarmal Road Belgaum

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *