बेळगाव—belgavkar—belgaum : अशोकनगरमध्ये घर फोडून पसार झालेल्या चोरट्याला जेरबंद करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे. प्रसाद मल्लाप्पा नेसरगी (वय 26, रा. माळी गल्ली, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
प्रसाद नेसरगीने काही दिवसांपूर्वी अशोकनगरमधील घर फोडून सोन्याचे तब्बल साडेपाच लाखांचे दागिने लांबवले होते. त्याला संशयावरुन ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली.
रहदारी व गुन्हे विभागाचे डीसीपी निरंजन अर्स, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या नेतृत्वाखाली माळमारुतीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, एम. जी. कुरेर, सी. जी. चन्नप्पगोळ, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लप्पन्नवर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, रफिक मुजावर, मल्लिकार्जुन गाडवी, महेश ओडेयर, रमेश अक्की, महादेव काशीद यांनी ही कारवाई केली.
#Belgaum #Belgavkar #MaliGali #JewelleryTheft #CrimeNews #Arrested #GoldJewellery #PoliceAction #LocalNews #CrimeInvestigation #ThiefCaught #Ashoknagar #JewellerySeized #YouthArrested #MaharashtraCrime #DCPNiranjanArs #ACPSantoshSatyanaik #PoliceRaid #CrimeReport #CommunitySafety
Youth from Mali Gali arrested jewellery seized
Youth from Mali Gali arrested jewellery seized