बेळगाव—belgavkar—belgaum : संकेश्वर : गरम पाण्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात हात पाय स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल गेल्याने पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्या आवारात घडली.
विनायक संजय गोरवगोळ (वय 22, रा. गोटूर ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, विनायक हा मंगळवारी उसाची गाडी भरण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी गेलाच नाही. सकाळी कारखान्याच्या गरम जलशुद्धीकरण प्रकल्पात त्याचा मृतदेह दिसला. मंगळवारी हातपाय धुण्यासाठी गेल्यावर पाय घसरुन पाण्याच्या टँकमध्ये पडून युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Youth dies fall into hot water Sankeshwar Belgaum