हल्ल्याचा व्हिडीओ मोबाईल कॅमेर्यात कैद
बेळगाव—belgavkar—belgaum : अनैतिक संबंधातून एका तरुणावर विळ्याने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना बेळवडी (ता. बैलहोंगल) येथील बसस्थानकानजीक मंगळवारी सायंकाळी घडली. मकतुमसाब नजीरसाब तटगार (वय 24, रा. आरवळी ता. बैलहोंगल) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मुत्तू गणाचारी (वय 37, रा. सवटगी ता. बैलहोंगल) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. मुत्तुच्या पत्नीसोबत मकतुमसाब याचे अनैतिक संबंध होते. याची माहिती मुतुला समजल्यानंतर तो संतापला होता. त्यामुळे तो मकतुमसाबच्या मागावर होता. मंगळवारी सायंकाळी बेळवडी बसस्थानकानजीक मुत्तुने मकतुमसाबला गाठले व त्याला काही करण्याआधीच मानेवर चार ते पाच वेळा विळ्याने सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
या खुनी हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले. त्यानंतर काहींनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, दोडवाड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुमा गोरबाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरा दोडवाड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हल्लेखोराला रात्री अटक झाली असून हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
#Belgaum #CrimeNews #Stabbing #Violence #ImmoralRelationship #MurderAttempt #BreakingNews #PoliceInvestigation #ViralVideo #LocalNews #SafetyFirst #JusticeForVictims #CommunityAlert #CrimeWatch #PublicSafety #Awareness #SupportVictims #LawAndOrder #CrimeReport #BelgaumUpdates
young man stabbed immoral relationship belgaum
young man stabbed immoral relationship belgaum
🥺🥺