जागतिक पर्यटन दिवस २०२४ (World Tourism Day 2024):- दरवर्षी जागतिक पर्यटन दिवस २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यंदा म्हणजेच २०२४ ची या दिवसाची थीम “पर्यटन आणि शांतता” अशी ठेवण्यात आली आहे. धकाधकीच्या आयुष्यात कुठेतरी फिरायला जाऊन विरंगुळा करण्यासारखे दुसरे सुख नाही. या दिवसाचे खास महत्त्व म्हणजे या दिवसामुळे जागतिक स्तरावर पर्यटनाची वाढ होण्यास मदत होते.
उन्हाळी सुट्टया, दिवाळीच्या सुट्टया किंवा ख्रिसमसच्या सुट्टया अश्या जास्त दिवसांच्या सुट्टया आल्या की सगळीकडे फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. आपल्या आवडत्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची मजा काही औरच. आपल्या ठिकाणाहून कुठे दुसरीकडे फिरायला जाणे, तेथील खाद्य संस्कृती अनुभवणे, लोककलेचा सन्मान करणे आणि सोबत एक अनुभवाची शिदोरी घेऊन परत येणे म्हणजे पर्यटन. अर्थव्यवस्थेतील वाढीत पर्यटनाचा मोलाचा वाटा असतो. चला तर मग पाहूया पर्यटन दिनाचा इतिहास आणि महत्त्व.
World Tourism Day चा इतिहास
1980 मध्ये पहिल्यांदा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेने म्हणजेच UNWTO ने या दिवसाची सुरुवात केली होती. 1970 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक व्यापार संघटनेने 27 सप्टेंबर रोजी मान्यता दिली होती म्हणूनच याच दिवशी म्हणजेच UNWTO च्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो.
जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर रोजी असला तरीही भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.
World Tourism Day चे महत्त्व
आर्थिक वाढीत पर्यटन एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. पर्यटनामुळे जसे आर्थिक विकास होतात तसेच माणसांच्या आरोग्यासाठी देखील पर्यटन खूप महत्वाचे असते. World Tourism Day पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो आणि त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:-
- महसूल वाढण्यास मदत:- पर्यटनामुळे महसूल वाढण्यास मदत होते. देश विदेशातून आलेले पर्यटक रहाणे, फिरणे, खरेदी, वाहतुकीचा खर्च असे अनेक खर्च संबंधित पर्यटन क्षेत्रात करत असतात आणि तो पैसाच महसुलाच्या रूपाने संबंधित देशाच्या तिजोरीत जमा होतो.
- रोजगार निर्मिती:- पर्यटनाचे अजून एक महत्त्व म्हणजे रोजगार निर्मिती. पर्यटनासाठी जेव्हा पर्यटक जातात तेव्हा आपोआप रोजगार निर्मिती होऊ शकते. टुरिस्ट गाईड, ड्रायव्हर्स, दुकानदार, अनेक हस्त निर्मित वस्तू बनवणारे कलाकार यांच्या हाताला काम मिळते.
- परकीय गंगाजळीत वाढ:- जेव्हा विदेशी पर्यटक देशात येतात तेव्हा आपसूक Currency Exchange होते आणि यातून देशाच्या परकीय गंगाजळीत भर पडत राहते.
- विकास आणि समृध्दी:- पर्यटनामुळे संबंधित भागाचा विकास होतो. पक्के रस्ते, इतर सोयी आणि प्रसिध्दी मिळते.
भारतातील अवश्य भेट द्यावी अशी काही पर्यटन स्थळे
जर तुम्हालाही तुमच्या कामातून थोडा ब्रेक हवा असेल आणि मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील या ठिकाणांना तर नक्कीच भेट द्यावी.
काश्मीर:-
भारताचा स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे काश्मीर पर्यटनासाठी खूप चांगला पर्याय आहे. निसर्ग सौंदर्य आणि सुंदर दऱ्या पहायच्या असतील तर काश्मीरला अवश्य भेट द्यावी.

डोंगरांची राणी दार्जिलिंग:-
भारतील पश्चिम बंगाल मध्ये असलेल्या दार्जिलिंगला डोंगरांची राणी म्हणतात. सर्वत्र पसरलेले डोंगर आणि ते निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायचे असेल तर दार्जिलिंगला नक्की भेट द्यावी.

लेह लदाख :-
जर तुम्हाला बर्फ आवडत असेल तर लेह सर्वोत्तम पर्याय आहे. लडाख ची राजधानी लेह हे पर्यटनासाठी सगळ्यात आवडते ठिकाण आहे. उन्हाळ्यात लेहचे सौंदर्य अजूनच वाढलेले दिसते. आजूबाजूला पसरलेली बर्फाची चादर आणि सोबत मित्रांची मैफिल नक्कीच आनंद द्विगुणित करेल.

महाबळेश्वर:-
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर बाराही महिने पर्यटकांनी गजबजलेले असते. थंड हवेचे ठिकाण आणि विविध नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी महाबळेश्वर सर्वोत्तम पर्याय आहे.

पर्यटनाचे फायदे
जसे काम करणे आपल्यासाठी खूप गरजेचे असते तसेच स्वतः साठी वेळ देणे, रोजच्या त्याच त्याच रूटीन मध्ये थोडा बदल करून जरा विरंगुळा घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा आपण कामातून थोडा ब्रेक घेतो तेव्हा थकलेला मेंदू पुन्हा ताजातवाना होतो आणि आपली कामातील गुणवत्ता वाढू लागते यासाठी कुठेतरी फिरायला जाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आजच्या युगात बैठी जीवनशैली जास्त आहे. कामे कॉम्प्युटरवर बसून होतात आणि ऑफिसच्या वेळा, प्रवासाचा वेळ आणि घरी परतायची वेळ या सगळ्याचा ताळमेळ बसवता व्यायामाला पुरेसा वेळ मिळतच नाही. पर्यटनामुळे व्यायाम तर होतोच शिवाय इतर भागातील/ देशातील संस्कृती जवळून अनुभवता येते.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी, तणावमुक्त जगण्यासाठी, निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी तसेच आत्मपरीक्षण करण्यासाठी पर्यटन एक उत्तम पर्याय आहे. वर्षातून एकदा केलेले पर्यटन संपूर्ण वर्षभर कामासाठी नवी ऊर्जा देते.
FAQ
What is the World Tourism Day 2024 theme?
Travel and Peace
When was world tourism day celebrated?
27th of September.