हिवाळा म्हणजे थंड हवामानाचा काळ. या ऋतूत अनेकांना हृदयासंबंधित समस्या जास्त होतात, विशेषतः ज्या व्यक्तींना आधीच Heart Attack किंवा हृदयाची इतर समस्यांची तक्रार आहे. यामुळे या हंगामात हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ जर्नल मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना आधीपासून हृदयविकार आहेत त्यांच्यासाठी हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31% पर्यंत वाढतो.
हिवाळ्यात Heart Attack चा धोका का वाढतो?
हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. थंड हवेमुळे धमन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह मंद होतो आणि हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो. याशिवाय, थंड हवेमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल पातळी वाढू शकते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हिवाळ्यातील हृदयासंबंधित समस्या कोणत्या असू शकतात?
हिवाळ्यात पुढील हृदयविकारांच्या समस्या दिसून येऊ शकतात:
- Heart Attack : हृदयाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
- हृदय अपयश (Heart Failure): हृदय रक्तपुरवठा करण्यास असमर्थ ठरते.
- स्ट्रोक: मेंदूमध्ये रक्तप्रवाह बंद होतो किंवा कमी होतो.
- हाय ब्लड प्रेशर: रक्तदाब अनियंत्रितपणे वाढतो.
- कार्डियाक अरेस्ट: हृदयाचा ठोका अनियमित होतो किंवा थांबतो.
हिवाळ्यात Heart Attack चा धोका वाढण्याची कारणे
1. थंड हवामान आणि रक्तप्रवाह
थंड हवामानामुळे धमन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयाला शरीरभर ऑक्सिजन पुरवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.
2. हायपोथर्मिया
शरीराचे तापमान 98.6 फॅरेनहाइटपेक्षा (37°C) कमी होणे ही एक गंभीर समस्या आहे. ही स्थिती हृदयासाठी घातक ठरू शकते.
3. हिवाळ्यातील फ्लू
सीझनल फ्लू किंवा सर्दीमुळे आधीच कमजोर असलेल्या हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी खालील 12 उपाय उपयोगी ठरू शकतात:
1. थंडीत योग्य कपडे परिधान करा
शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करा. बाहेर पडताना नेहमी टोपी, हातमोजे आणि मफलर घालणे आवश्यक आहे.
2. अति शारीरिक श्रम टाळा
थंड हवामानात जास्त मेहनत किंवा जोरदार व्यायाम टाळा. कारण यामुळे हृदयावर ताण येतो.
3. आरामशीर आणि नियमित व्यायाम करा
हिवाळ्यात हलका व्यायाम करा, जसे की वॉकिंग किंवा योगा.
4. डिहायड्रेशन टाळा
थंडीत पाणी कमी प्यायले जाते, पण शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.
5. संतुलित आहार घ्या
जड पदार्थ, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा. भरपूर फळे, भाज्या, नट्स, आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड युक्त पदार्थ खा.
6. धूम्रपान आणि मद्यपान टाळा
सिगारेट आणि अल्कोहोलमुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
7. ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित ठेवा
नेहमी ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या.
8. फ्लूची लस घ्या
हिवाळ्यातील फ्लू हृदयावर ताण आणतो. त्यामुळे दरवर्षी फ्लूची लस घेणे उपयुक्त ठरते.
9. ताणतणाव टाळा
योगा, ध्यान किंवा पुस्तक वाचणे यासारख्या गोष्टी करून तणाव दूर ठेवा.
10. डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास असेल, तर हिवाळ्यात डॉक्टरांचा सल्ला अधिक घ्या.
11. गरम पाण्याने अंघोळ करा
थंड पाण्याने अंघोळ करणे टाळा. यामुळे अचानक रक्तदाब कमी होऊ शकतो.
12. हृदयाचे आरोग्य तपासा दर तीन महिन्यांनी हृदयाचा तपासणी करून घ्या. ECG, ब्लड टेस्ट यासारखे टेस्ट वेळोवेळी करा.
जगभरातील Heart Attack चे आकडे भीतीदायक का आहेत?
वर्ल्ड हार्ट फेडरेशन च्या अहवालानुसार, दरवर्षी 2 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू Heart Attack मुळे होतो. यामध्ये 85% मृत्यू Heart Attack आणि स्ट्रोकमुळे होतात. भारतामध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
हिवाळ्यातील विशेष दिवसांवर अधिक धोका
- डिसेंबर 24: हार्ट अटॅकचे प्रमाण 37% वाढते.
- डिसेंबर 25 (क्रिसमस): अमेरिकेत सर्वाधिक हार्ट अटॅकचे मृत्यू होतात.
- जानेवारी 1: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही धोका जास्त असतो.
हिवाळ्यात आरोग्य जपा, आयुष्य वाढवा
हिवाळा आरोग्यासाठी आव्हानात्मक असला तरी योग्य काळजी घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. उष्ण कपडे, नियमित व्यायाम, आणि संतुलित आहारामुळे हिवाळ्यातही आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकतो.
हिवाळा आलाय… काळजी घ्या आणि हृदयाला जपा!