बिग बॉस मराठी सिझन 5 मधले बरेच स्पर्धक सध्या चर्चेत आहेत. काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात घातलेल्या धुमकुळामुळे ट्रोल होत आहेत तर काही स्पर्धक अजून ही पिकनिकला आल्या सारखे निवांत आहेत. पण बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा साधेपणा लोकांना भावत आहे आणि प्रेक्षक त्याला सपोर्ट करत आहेत. तो सदस्य म्हणजे सूरज चव्हाण (suraj chavan) !
सूरज चव्हाणने (suraj chavan) रितेश देशमुख आणि अक्षय कुमार सारख्या स्टार नटांना ही त्याच्या झपाक झुपक झपाकवर थिरकायला भाग पाडले. असा हा सुरज चव्हाण नेमका आहे तरी कोण ? कसे आहे त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि एका छोट्याखेड्यातून बिग बॉसच्या घरापर्यंत त्याचा प्रवास कसा झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात
सूरज चव्हाणचे संघर्षमय आयुष्य – Struggling life of Suraj Chavan
सूरज चव्हाण (suraj chavan) हा मूळचा बारामतीमधील मोडवे या खेड्यातील असून त्याचे वैयक्तिक आयुष्याचा प्रवास खूप संघर्षमय आहे. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला असून पाच बहिणींवर जन्माला आलेला हा सहावा मुलगा आहे. त्याचे वडील तो लहान असताना कॅन्सलने गेले. आईला वडिलांच्या जाण्याचा धक्का सहन झाला नाही आणि तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्याची आई ही गेली. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मोठ्या बहिणीने घेतली आणि त्याचा सांभाळ केला. बहिणीची आर्थिक परिस्थिती देखील बेताचीच आहे.सूरज शेत मजूर म्हणून काम करायचा.
टिकटॉक स्टार ते यु ट्युबर – Suraj Chavan TikTok Star to YouTuber
सूरज (suraj chavan) मोलमजुरी करायचा याच दरम्यान त्याला टिकटॉकबद्दल समजले. त्याने सुरवातीला एक दोन व्हिडीओ टाकून पाहिले आणि ते प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर सूरजने मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर मोबाईल घेतला आणि टीकटॉक डाउनलोड केलं आणि व्हिडीओ काढून तो टाकू लागला. त्यात त्याचे व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध झाले. त्याचे बरेच व्हिडीओ व्हायलर झाले. त्याला काही यु ट्यूब चॅनलकडून शॉर्ट फिल्मच्या ऑफर येऊ लागल्या.टिकटॉक भारतात बंद झाल्यावर त्याने स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू केले आणि तिथे देखील त्याला लाखो चाहत्यांचे प्रेम मिळाले. त्यामुळे सूरज आज बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचला.
सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात त्याच्या आयुष्या विषयी काय बोलला?
सूरज चव्हानने त्याच्या सहस्पर्धकांशी बोलताना सांगितलं की त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि त्यातच ते गेले. त्याची आई हा धक्का पचवू शकली नाही आणि तिला वेड लागलं. त्याचत तिला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तीही गेली. त्याची आई आणि आजी एकाच दिवशी गेला त्यामुळे दोघी सासू-सुनांनी एकमेकींना शेवटचे पाहिले देखील नाही. आता त्याच्याकुटुंबात पाच बहिणी आणि एक आत्या आहे. तो म्हणतो की सुरवातीला बऱ्याच लोकांनी त्याला लुटले त्यामुळे त्याच्या बहिणी तू सुधार त्यामुळे त्यांना बरे वाटेल असे म्हणतात.
सूरज सांगत होता की जेंव्हा त्याचे वडील वारले तेंव्हा तो गोट्या खेळत होता. एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याचे वडील वारले आहेत घरी चल असं म्हणाला तो लहान होता त्यामुळे त्याला काहीच कळले नाही.
किती आहे सूरज चव्हाणची कमाई? – How much is Suraj Chavan’s earnings
सूरज चव्हाण किती पैसे कमावतो त्या विषयी ही त्याने सांगितले की त्याला टिकटॉक होते तेंव्हा दिवसाला 80000 मिळायचे आता यु ट्यूबवरून त्याची दिवसाची कमाई 30000 ते 50000 आहे. बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी सूरज चव्हाणला आठवड्याला 25000 हजार मिळतात.
रितेश देशमुखने भाऊचा धक्का म्हणजे वीकेंडचा वारमध्ये केले कौतुक
सूरज चव्हाणकडे गेल्या आठड्यात घरात झाडू मारण्याची जबाबदारी होती आणि ते काम त्याने चोख केले. त्यामुळे रितेश देशमुख यांनी त्याचे कौतुक केले. तसेच टाक्सममध्ये देखील त्याला बुक्कीत डोकं उडवीन म्हणून जेंव्हा दम देण्यात आला तेंव्हा तो न घाबरता समोरच्याशी भिडला.
ट्रॉफी तर मीच नेणार
सूरज चव्हाण अभिजित सावंतशी बोलताना आत्मविश्वासाने म्हणाला की बिग बॉसची ट्रॉफी तर मीच नेणार त्यावर अभिजित सावंतने ही त्याला तुझा हक्क आहे ट्रॉफीवर घेऊन जा असं म्हणत त्याला प्रोत्साहन दिले. अभिजित सुरजला म्हणाला की इथे तुला शेवटचा समजतात त्यावर सूरज म्हणाला की मी शेवटी आलो आणि शेवटीच जाणार.
बिग बॉसच्या घरात येऊन काही काळासाठी सूरज चव्हाण (suraj chavan) थोडा बुजला होता पण आता त्याने ही शड्डू ठोकला आहे आणि तोही आता सगळ्यांशी भिडायला तयार आहे. सूरज चव्हाणने त्याच्या भोळ्या भाबड्या स्वभावाने आणि बिग बॉसच्या घरातील चांगल्या वागणुकीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात असून त्याला सपोर्ट देखील केला जात आहे. आता प्रेक्षकांच्या सपोर्टवर सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात किती दिवस राहतो ते मात्र पाहण्यासारखे आहे.
2 thoughts on “बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे कौतुक मिळवणारा हा सुरज चव्हाण आहे तरी कोण? – Suraj Chavan”