आम्ही इथे काय गोट्या खेळायला आलो आहोत का – MLA Rohit Pawar

Admin
2 Min Read
ROHIT PAWAR

ROHIT PAWAR : सध्या विधानसभेची निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, त्यातच बडे नेते आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. भोसरी मधील युतीचे भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांची नुकतीच दिघी या ठिकाणी जाहीर सभा झाली सभेत श्री. महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला उद्देशून इशारा दिला की, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर आम्ही धारकरी आहोत. यालाच प्रत्युत्तर देताना आमदार ROHIT PAWAR यांनी महेश लांडगे यांना ‘आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलो आहोत का?’ असे प्रतयुतर दिले

काय म्हणाले Rohit Pawar

पिंपरी चिंचवड मधील विधानसभेसाठी उभे असलेल्या तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीच्या राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार ROHIT PAWAR हे पिंपरी चिंचवड शहरात आले होते. सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्रावर जी गुजरातशाही लादली आहे ती या वेळेस आपले स्वाभिमानी मतदार या वेळेस धुडकावून लावणार आहेत. अतिशय आक्रमक होऊन त्यांनी महेश लांडगे यांना उत्तर दिले आणि हेही म्हणाले की महेश लांडगे येत्या 23 तारखेला आमदार राहणार नाहीत.

लांडगे हे गुंडशाही करतात

महेश लांडगे यांच्या इशाऱ्याला आमदार ROHIT PAWAR यांनी थणकून उत्तर दिल्यावर ते म्हणाले की, महेश लांडगे हे फडणवीस यांच्यासारखे द्वेष, दबावतंत्र, आणि गुंडशाही वापरुन राजकारण करतात. 23 तारखेला महेश लांडगे हे आमदार राहणार नाहीच शिवाय भोसरीसहित, पिंपरी- चिंचवड असे तीनही उमेदवार या वेळेस निवडून येणार आहेत. यानंतर जी महानगरपालिका निवडणूक होणार आहे त्यातही नवीन चेहरे देऊन निवडूण आणू आणि परिवर्तन घडवू असेही पवार म्हणाले.

ईडी ची भीती दाखवून गलीछ राजकारण

भाजप हे महाराष्ट्रामद्धे ईडी ची भीती दाखवून गलीछ राजकारण करत आहे. आमच्या सोबटाचे बरेच नेते ईडी च्या भीतीने त्यांना जावून मिळाले, पण आम्ही अजूनही लढत आहोत असे आमदार ROHIT PAWAR हे सभेत म्हणाले. छगन भुजबळ यांनी ही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, आम्ही ओबीसी असल्याने आमच्यावर ईडी ची कारवाई झाली आणि तिला घाबरूनच आम्ही पक्षांतर केले.        

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *