सध्या पावसाचे दिवस आहेत आणि कुठे जाताना तुम्ही भिजत असाल तर पहिला विचार आपल्या मोबाईल बद्दल येतो. पावसाळ्यात मोबाईल ची खूप काळजी घ्यावी लागते. मोबाईल (Mobile) भिजून खराब होऊ नये म्हणून आपण प्लास्टिक मध्ये टाकून वापरतो किंवा पावसात जाने टाळतो. मोबाईल धुळी पासून आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्या मध्ये आय पी रेटिंग (IP Rating) दिलेली असते. आय पी रेटिंग तुम्ही ऐकलेच असेल परंतु किती आय पी रेटिंग असल्यावर मोबाईल पावसात वापरू शकतो हि माहिती घेऊ.
आय पी रेटिंग म्हणजे काय
आय पी रेटिंग (IP Rating) म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन रेटिंग आहे. मोबाईल आणि टेबलेट मधील आय पी रेटिंग देताना पहिले दोन अल्फाबेट म्हणजेच IP आणि दुसरे दोन अंक असतात जसे कि ५२ पासून ६९ पर्यंत. आता या दोन अंका पैकी पहिला अंक हा धुळीपासून तुमचा डीव्हाइस किती सुरक्षित राहू शकतो यासाठी असतो. आणि दुसरा अंक हा पाण्यापासून किंवा किती खोल पाण्यात तुमचा मोबाईल किती सुरक्षित राहू शकतो यासाठी असतो. यातही जर कधी कधी डीव्हाइस ला धुळीपासून संरक्षण नसेल तर त्या जागी X असे लिहून देतात. जसे कि IPX5 याप्रमाणे लिहिले जाते.
कोणत्या रेटिंग ला काय फायदा
आय पी रेटिंग (IP Rating) मध्ये काही रेटिंग चा अर्थ जाणून घेऊयात. IP52, IP67, IP68 यातील कोणते रेटिंग चांगले हे पाहूयात. तुम्ही तुमच्या मोबाईल डीव्हाइस चे गूगल वर जाऊन ओनलाईन रेटिंग चेक करू शकता. त्यामध्ये जर तुमचा मोबाईलला IP52 रेटिंग दिलेले असेल तर मोबाईल धुळीपासून संरक्षण होऊन थोडे पाण्याचे थेंब पडले तरी मोबाईल सुरक्षित राहील परंतु पूर्ण पाण्यात गेल्यावर मोबाईल पूर्ण खराब होऊ शकतो. IP67 हे आय पी रेटिंग असेल तर धुळीपासून आणि थोड्या पाण्यापासून मोबाईल सुरक्षित राहू शकतो, जर रेटिंग IP68 असेल तर धुळीपासून तर संरक्षण होईलच त्याचप्रमाणे पावसात गेले तरी मोबाईल खराब होणार नाही आणि काही कंपनी असा दावा करतात कि IP68 रेटिंग असेल तर मोबाईल अर्धा तास खोल पाण्यात राहिला तरी काही होणार नाही.
आता आले IP69 रेटिंग वाले मोबाईल
IP68 रेटिंग (IP Rating) असले तरी पावसात मोबाईल ला काही होणार नाही. परंतु ज्या मोबाईल ला IP68 रेटिंग आहे आणि तो मोबाईल दुरुस्तीसाठी किवा काही कारणास्तव खोलला तर कंपनीच्या म्हणण्यानुसार मोबाईल चे IP रेटिंग खराब होते ते कार्य करत नाही. IP68 रेटिंग मध्ये मोबाईल पावसात वापरला तरी चालतो पण सध्या IP69 रेटिंग आले आहे. जर मोबाईल ला IP69 रेटिंग असेल तर याचा अर्थ हा मोबाईल धुळीमध्ये, पावसात हि सुरक्षित राहील याच प्रमाणे मोबाईल गरम पाण्यातही काम करेल.
IP68 रेटिंग ची मोबाईल लिस्ट
सध्या कमी किमतीमध्ये IP68 च्या रेटिंग (IP Rating) चे मोबाईल मोटोरोला हि कंपनी देत आहे. IP68 रेटिंग च्या मोबाईल ची लिस्ट पाहूयात.
NO | COMPANY | MODEL | PRICE IN INDIA |
1 | Motorola | Edge 50 Fusion (12/256) | 30999 |
2 | Motorola | Edge 50 Pro 5G (8/256) | 29999 |
3 | Samsung | Galaxy S23 FE (8/128) | 35999 |
4 | Vivo | S19 Pro ( 8/256) | 37990 |
5 | Oppo | Find X7 Ultra (12/256) | 69990 |
6 | Apple | Iphone 13 ( 4/128) | 48499 |
IP69 रेटिंग असलेले मोबाईल
आता भारतात सर्वात चांगले आय पी रेटिंग (IP Rating) IP69 हेच आहे. आणि या रेटिंग चे बोटावर मोजण्या इतकेच मोबाईल भारतात भेटत आहेत. त्याची लिस्ट खालील प्रमाणे.
NO | COMPANY | MODEL | PRICE IN INDIA |
1 | Oppo | F27 Pro Plus (8/256) | 29999 |
2 | Xiaomi | 15 Ultra (16/512) | 109990 |
3 | Vivo | X100 Ultra ( 12/256) |