Badlapur sexual assault case – कोलकता येथील महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून बलात्कार करून हत्येची घटना ताजी असतानाच मुंबईजवळील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या नामवंत शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या तीन ते सहा वर्षांच्या दोन चिमकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बदलापूरमधील एका नामवंत शाळेत नुकत्याच 1 ऑगस्टला कंत्राट बेसिसवर कामाला लागलेल्या अक्षय शिंदे या 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने शिशुवर्गातील दोन चिमुरड्यांवर अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी पोलीस कस्टडीत असून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
Badlapur sexual assault case – शाळेसमोर पालकांचे आंदोलन – संतप्त झालेल्या पालकांनी शाळेसमोर आंदोलन करून शाळेत तोडफोड केली. आणि तिथे आंदोलन केले.
शाळा प्रशासनाची कार्यवाही (Badlapur sexual assault case)
शाळा प्रशासनाने तात्काळ मुली ज्या वर्गात शिकत होत्या त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका, मुख्याध्यापक यांना निलंबित केले असून ज्या कॉन्ट्रॅक्टरला सफाई कामगार पुरवण्याचे काम दिले होते त्याच्याकडून काम काढून घेतले आहे आणि शाळा प्रशासनाने पालकांची माफी देखील मागितली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये मुलींचे पालक तब्बल बारा तास ताटकळत
अत्याचाराचा हा प्रकार लक्षात आल्यावर पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी मुलींच्या पालकांना तब्बल बारा तास तक्रार न घेताच ताटकळत बसवले. शेवटी नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पालकांची तक्रार नोंदवण्यात आली . म्हणजे सामान्य माणसांवर अत्याचार झाला तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायचे की नाही? हा देखील प्रश्नच आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉस्को प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केलाचा आरोप होत आहे.
सफाई कर्मचाऱ्याला अटक (Badlapur sexual assault case)
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेत चार ते सहा वर्षांच्या दोन मुलींवर नुकत्याच रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षीय नराधम कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आला. या नराधमाला शाळेतील मुलींचे शौचालय साफ करण्यासाठी ठेवण्यात आले होते आणि त्याने त्याच्या कामाचाच फायदा घेतला. या नराधमाने 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले तर 13 ऑगस्ट दिवशी आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार केले.दोन मुलीं पैकी एकीने घरी येऊन पालकांकडे तिच्या प्राव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. जेंव्हा पालकांनी तिला विश्वासात घेतले तेंव्हा हा किळसवाणा प्रकार त्या पालकांना समजला.आणखीन एका मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांची मुलगी शाळेत जायला घाबरत आहे असे कळले आणि पालकांनी मुलींना घेऊन डॉक्टरकडे धाव घेतली तेंव्हा हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला.
Badlapur sexual assault case – त्या अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला शेवटी अटक झाली आहे. पुढे या चिमुरड्या मुलींना न्याय मिळेल का? आणि त्या हैवणाला योग्य ती शिक्षा होईल का? हा देखील प्रश्नच आहे.आणि आता मुली शाळेत सुरक्षित आहेत का? हा देखील प्रश्न आहेच.
- संतप्त बदलापूरकरांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू
- या घडनेने संतप्त झालेल्या लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
- सकाळी 7:30 वाजता पालकांनी आणि नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करून शाळेची तोडफोड केली.
- त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उभं राहून आंदोलन करत आहेत आणि
- आरोपीला तत्काळ फाशी द्या अशी मागणी करत आहेत.
गेल्या सहा ते सात तासापासून बदलापूर रेल्वे सेवा बंद असून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. आणि रेल्वे ट्रॅकवरील आंदोलन अजून ही सुरूच आहे.
बदलापूर आंदोलन (Badlapur sexual assault case) – घटनाक्रम
- सकाळी 7:30 वाजता आंदोलन सुरू झाले.
- सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी संयम ठेवण्याचे आव्हाहान लोकांना केले आहे.
- सकाळी 11:30वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
- सकाळी 11:45 वाजता आंदोलकांनी शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.
- दुपारी 12 वाजता आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली.
- दुपारी 12:40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न केला पण संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगड फेक केली
- दुपारी 1 वाजता आंदोलकांनी पुन्हा रेल्वेट्रॅकवर आले. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तो प्रयत्न अजून सुरूच आहे पण आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
- दुपारी 1:10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला होता त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नकळकांड्या फोडल्या
सकाळी 10वाजता लोकांनी आक्रमक पवित्रा घेऊन बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन सुरू केले.त्यामुळे मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गवरील सेवा बंद झाल्या आहेत.आठ तास होत आले तरी आंदोलकांचे आंदोलन रेल्वे ट्रॅकवर सुरूच आहे.
Badlapur sexual assault case -आरोपीला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीवर संतप्त आंदोलक अजून ही ठाम आहेत. पोलीस अधिकारी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत असले तरी आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.
या सगळ्या प्रकारमुळे काही पुन्हा काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
- शाळा, कॉलेजांमध्ये मुली सुरक्षित आहेत का?
- शाळेने मुलींचे शौचालय साफ करण्यासाठी पुरुष कामगार का ठेवले? महिला कर्मचारी का ठेवली नाही?
- शाळेत इतकं सगळं घडेपर्यंत मुलींचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक काय करत होते?
- कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या एजन्सीज कामगार घेताना त्यांचे बॅकग्राऊंड चेक करतात की नाही? आणि अशा एजन्सीमधून कामाला येणाऱ्या कंत्राटी कामगारांवर भरवसा कसा ठेवायचा?
- कोलकता असो वा बदलापूर देशातल्या मुली शाळा-कॉलेजमध्येच सुरक्षित नसतील तर पालकांनी मुलींना शिक्षणासाठी घरातून बाहेर कसे सोडायचं?
- भारतात अशा अत्याचारा विरुद्ध कठोर कायदा कधी येणार?