कधी होणार आहेत महाराष्ट्रात निवडणुका ? काय म्हणाले CM Eknath Shinde?

By Swamini Chougule

Published on:

CM Eknath Shinde
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What did CM Eknath Shinde say – सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतचे वारे वाहत आहे. सगळेच पक्ष खडबडून जागे झाले असून काहींनी तर प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी माहायुती आणि महाविकास आघाडी मोर्चे बांधणी करत आहे. अनेक बडे नेते प्रचारसभा घेताना देखील दिसून येत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक कधी होणार,याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे कारण अजून तरी अधिकृतपणे निवडणूका कधी होणार आहेत याबद्दल कोणत्याही तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम दिसून येतोय. निवडणूक कधी होणार याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत.मात्र या दरम्यान राज्याचे CM Eknath Shinde यांनी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.तसेच विधानसभा निवडणुका कधी होणार याचा CM Eknath Shinde यांनी अंदाज देखील वर्तवला आहे.

चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल,कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम CM Eknath Shinde यांच्या हस्ते संपन्न झाला. तेंव्हा एकनाथ शिंदे बोलत होते.

CM Eknath Shinde यांनी आगामी निवडणुकांचे दिले संकेत

याच कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका केंव्हा होणार याचे संकेत दिले आहेत. येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या वेळी चांदिवली विधानसभा मतदार संघातून त्यांचा उमेदवार दिलीप लांडे यांना निवडून देण्याचे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार

याचबरोबर, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे CM Eknath Shinde यांनी सांगितले.

चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना आज ४०० घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे, असे CM Eknath Shinde म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची मुदत पुन्हा वाढवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली आहे. पुढील काळात १५०० रुपयाची रक्कम वाढविण्यात येणार आहे. या बरोबरच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू केल्या जाणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला घेणार आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्यात देणार आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून या कल्याणकारी योजना सुरू केल्या जाणार आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणूक हरियाणासोबत झालेली होती. पण यंदा हरियाणात विधानसभेची निवडणूक आधी होणार आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभेच्या तारख्या अद्याप जाहीर करण्यात आल्या नाही. दरम्यान, येत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या महाराष्ट्रात सामान्य लोकांपासून नेत्यापर्यंत निवडणुकीचे वेध लागले आहेत. आत्तापासूनच निवडणुकीची मोर्चे बांधणी आणि प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षांकडून विविध प्रलोभने सामान्य जनतेला दाखवली जात आहेत. आता या रणधुमाळीत कोणाचा निभाव लागणार आणि कोणाचा पाडाव राहणार हे पाहण्यासारखे आहे.

एक तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पक्ष फोडाफोटीच्या राजकारणानी उत आणला आहे.एक पक्षाने दोन दोन पक्ष आणि गट पडले आहेत आणि त्यांच्या त्यांच्यातच हेवे-दावे आणि आरोप-प्रत्येरोप होत आहेत. यावर्षीची निवडणूक बहुरंगी होणार आहे आणि जनता कोणाला आपला कौल देते आणि कोणाला राज्यावर बसवते ते पाहण्यासारखे आहे.

महाराष्ट्राचे राजकारण फक्त इथल्या पुरते सीमित नसून महाराष्ट्र हा देशाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यातच भारताची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबापुरी हे महाराष्ट्रात असल्याने इथे आपलीच सत्ता असायला हवी म्हणून पक्ष आणि युती आटोकाट प्रयत्न करणार आहेत.त्यामुळे आता कोणता पक्ष काय आश्वासन देणार? कोणता पक्ष कोणत्या पक्षावर कुरघोडी करणार आणि सामान्य जनता कोणत्या पक्षाला निवडून देणार हे चित्र मात्र रंजक असणार आहे.

पण नोव्हेंबरपर्यंत निवडणुका जाहीर होणार हे मात्र निश्चित आहे.