क्रेडीट कार्ड वापरत असाल तर घ्या हि काळजी नाहीतर होईल खूप मोठा तोटा – What care should be taken while using credit card ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What care should be taken while using credit card ? – आजच्या काळात क्रेडीट कार्ड वापरणे हे खूप सोप्पे झाले आहे. सर्व बँकानी ओनलाईन व्यवहार चालू केले आहेत, आणि ग्राहकांना हि पेमेंट करण्यासाठी क्रेडीट कार्ड (CREDIT CARD) , डेबिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे हे थर्ड पार्टी अप्प वापरणे अतिशय सोप्पे झाले आहे. आज प्रत्येक गावागावात ओनलाईन पेमेंट ची सोय झाली आहे, आज डिजिटल इंडिया हि संकल्पना खरया अर्थाने यशस्वी झालेली दिसत आहे. तसेच फ्लिपकार्ट आणि अमेझोन अश्या ओनलाइन अप्प वर कॅश पेमेंट न करता डेबिट किंवा क्रेडीट कार्ड द्वारे शॉपिंग करता येते. आणि क्रेडीट कार्ड असेल तर आपण मंथली हफ्ते हि घेऊ शकतो.

क्रेडीट कार्ड वापरताना काय काळजी घ्यायची – What care should be taken while using credit card?

What care should be taken while using credit card? – क्रेडीट कार्ड वापरताना काही फायदे पण होतात त्याचबरोबर त्याचे तोटेही खूप आहेत. क्रेडीट कार्ड पेक्षा बँक लोन परवडले असे म्हणतात. तरीही जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर खालील काळजी घेतली तर मानसिक त्रास होणार नाही आणि तुमचे पैसेही वाचतील.  

  • सर्वात महत्वाचे क्रेडीट कार्ड घेताना बँक ज्या फॉर्म वर आपली सही घेतात त्यावर बारीक अक्षरात नियम व अटी असतात त्या पूर्ण वाचाव्यात. त्यामध्ये किती दिवस बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात. उशीर झाल्यावर दिवसाला/ महिन्याला किती टक्के व्याज आहे हे पहावे.
  • आता बँका क्रेडीट कार्ड वरूनही कॅश काढण्याची सुविधा देतात. परंतु त्यावर काहीही रिवार्ड किवा कॅशबक मिळत नसल्या कारणाने शक्यतो रोख रक्कम काढणे टाळावे.
  • क्रेडीट कार्ड चे पैसे वापरल्यावर दिलेल्या मुदतीत न भरल्यास बँका दिवसाला ५ टक्के पर्यंत व्याज लावतात.
  • क्रेडीट कार्ड हेक करणे खूप सोप्पे असल्याने, त्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
  • बँका कितीही रु. चे क्रेडीट देतात मात्र आपण घेताना आपल्या उत्पन्नाच्या कमी मर्यादा असलेले क्रेडीट घ्यावे.
  • आपल्या क्रेडीट कार्ड चा वापर कधीही सायबर कॅफे मधे वापरू नये.
  • क्रेडीट कार्ड नंबर, पासवर्ड किंवा ओटीपी कुठेही शेअर करू नये.
  • कार्ड हरवल्यास लगेच सबंधित बँकेमध्ये जाऊन कार्ड ब्लॉक आणि बंद करून घावे.
हे हि वाचा -  या विवो च्या फोन मध्ये dslr सारखेच फोटो निघणार Vivo V40 pro like DSLR

क्रेडीट कार्ड म्हणजे काय – What is a credit card?

बँकेने दिलेले कॅशलेस ओनलाइन दिलेले कर्ज म्हणजेच क्रेडीट कार्ड. काही वर्षांपूर्वी हि सुविधा फक्त काही बँका आणि काही मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती परंतु आता सर्वच बँका पूर्ण भारतात कुठेही क्रेडीट कार्ड ची सुविधा देतात. क्रेडीट कार्ड घेतल्यावर आपण त्या कार्ड द्वारे बँकेने दिलेल्या लिमिट पर्यंत फक्त ओंनलाईन शॉपिंग साठी पैसे वापरू शकतो आणि बँकेच्या दिलेल्या दिवसांच्या मुदतीत ते वापरलेले पैसे आपल्याला व्याजासहित बँके मध्ये भरायचे असतात. यासाठी बँका काहीतरी चार्जेस लावतात. बँकेने दिलेल्या मुदतीत आपण जर पैसे भरले नाहीत तर बँका २ टक्के पासून ५ टक्के पर्यंत दिवसाला किंवा महिन्याला व्याज लावतात.


क्रेडीट कार्ड चे प्रकार- Types of Credit Cards 

तसे तर प्रत्येक बँकेनुसार क्रेडीट कार्ड चे खूप प्रकार आहेत. सर्व बँकेचे व्याजदर, पैसे भरायची मुदत वेगवेगळी आहे. परंतु आपण इथे पूर्ण भारतात प्रामुख्याने काही प्रकारचे क्रेडीट कार्ड चे प्रकार (Types of Credit Cards ) पाहणार आहोत.

1) कॅशबॅंक क्रेडीट कार्ड- Cashbank Credit Card

कॅशबॅंक क्रेडीट कार्ड हे क्रेडीट कार्ड सर्वसामान्य आहे. हे क्रेडीट कार्ड घेतल्यावर आपण जेवढ्या रक्कमेची ओनलाईन वस्तू किंवा पेट्रोल/ डीझेल खरेदी करू त्यावर बँका काही टक्के रक्कम आपल्याला रिटर्न करतात. या मध्ये हि दोन प्रकारचे कॅशबॅंक क्रेडीट कार्ड येते. एक म्हणजे आपण काहीही खरेदी केली तरी बँकेने ठरवून दिलेल्या एकाच टक्केवारीमध्ये रिटर्न रक्कम मिळते. आणि दुसरे म्हणजे बँक विविध प्रोडक्ट वर किंवा विविध सुविधांवर वेगवेगळ्या टक्केवारीमध्ये रिटर्न कॅशबक देते.

2) भागीदारी क्रेडीट कार्ड – Partnership Credit Card

सध्या ओनलाइन शॉपिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी किचनच्या साहित्यापासून ते कपडे आणि फर्निचर हि ओनलाइन भेटू लागले आहे. ज्या ट्रस्टेड शॉपिंग साईटस आहेत त्यांच्या संगे भागीदारी करून बँका  बँका क्रेडीट कार्ड विकत आहेत. जसे कि ‘फ्लीपकार्ट एक्सिस क्रेडीट कार्ड’, ‘अमेझॉन एच.डी.एफ.सी. शॉपिंग कार्ड’ याप्रमाणे. हे कार्ड फक्त त्याच कंपनीच्या शॉपिंग साठी लिमिटेड असते आणि त्याच साईट वरून शॉपिंग केल्यावर तुम्हाला रिवार्ड पोइंट द्वारे कॅशबॅंक मिळते.

हे हि वाचा -  बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे कौतुक मिळवणारा हा सुरज चव्हाण आहे तरी कोण? - Suraj Chavan

3) प्रवासी क्रेडीट कार्ड – Travel Credit Card

प्रवासी क्रेडीट कार्ड हेही एक भागीदारी क्रेडीट कार्डच आहे. या कार्ड द्वारे आपण वस्तू शॉपिंग करू शकत नाही, हे कार्ड फक्त प्रवास करताना म्हणजेच बस तिकीट, विमान तिकीट, हॉटेल बुकिंग या साठी वापरू शकतो आणि यावरच बँक ग्राहकांना रिवार्ड देते. अश्या कार्ड द्वारे ग्राहकांना बाकी कार्ड पेक्षा ठराविक सुविधेला भरघोस रिवार्ड मिळतो यामुळे हे कार्ड घ्यायला परवडते.

4) प्रीमियम क्रेडीट कार्ड – Premium Credit Card

हे कार्ड कोणासाठी आहे हे या कार्ड च्या नावातच लपले आहे. प्रीमियम क्रेडीट कार्ड फक्त प्रीमियम लोकांसाठी आहे. आणि या कार्ड द्वारे प्रीमिअम वस्तू किवा सुविधा घेतल्या जाऊ शकतात. हे कार्ड सामान्य लोकांना वापरणे शक्य नाही कारण याचे क्रेडीट लिमिट हे अमर्यादित असते आणि याचा व्याजदरही सामान्य क्रेडीट कार्ड पेक्षा दहापट किवा त्यापेक्षा जास्त असतो. या कार्डवर जास्त रिवार्ड मिळत नाही पण एक लक्झरी लाईफ म्हणून हे वापरतात.

5) फ्युईल क्रेडीट कार्ड – Fuel Credit Card

इंधन क्रेडीट कार्ड हे हि एक भागीदारी तत्वावरील क्रेडीट कार्ड आहे. सध्या गाडीतील पेट्रोल किवा डिझेल हे खूप महत्वाचे झाले आहे. बँकांनी ज्या इंधन कंपन्या आहेत यांच्याशी भागीदारी करून हे क्रेडीट कार्ड बनविले आहे. बँकेने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार कार्ड ने पेट्रोल आणि डीझेल खरेदीवर रिवार्ड मिळतो.


क्रेडीट कार्ड चे फायदे काय – What are the benefits of credit cards?

  • सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पैसे नसताना हि आपण वस्तू किंवा सर्विस खरेदी करू शकतो.
  • आपल्याकडे क्रेडीट कार्ड असल्यावर आपण त्याद्वारे ओंनलाईन सर्व प्रकारची बिले भरू शकतो आणि मोबाईल रिचार्ज हि करू शकतो. 
  • जवळ क्रेडीट कार्ड असेल तर रोख रक्कम संभाळण्याची गरज भासत नाही.
  • क्रेडीट कार्ड असेल तर फ्लिपकार्ट, अमेझॉन अश्या साईट्स वरून वस्तू मासिक हफ्ते करून खरेदी करू शकतो.
  • क्रेडीट कार्ड वापरल्याने आपल्याला रिवार्ड पोईण्टद्वारे कॅशबक मिळते.
  • क्रेडीट कार्ड ची रक्कम हि आपल्याला ४५ दिवसांपर्यंत बिनव्याजी असते.
हे हि वाचा -  तुमचा मोबाईल आहे का Water Proof, IP Rating म्हणजे काय?

क्रेडीट कार्ड वापराचे तोटे – Disadvantages of using credit cards

  • आपण क्रेडीट कार्ड मध्ये फुकट चे पैसे आहेत म्हणून जास्त खर्च करतो पण परत फेड करायच्या वेळेस पैसे उपलब्ध होत नाही आणि मनस्ताप होतो.
  • जर वेळेत परतफेड केली नाही तर बँका अनावश्यक कितीही दंड (व्याज) लावतात जे आपल्याला नाईलाजास्तव भरावे लागतात.
  • खूप सहकारी बँकाकडून क्रेडीट कार्ड च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जाते.
  • ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवस जर क्रेडीट किवा रक्कम वापरली तर बँका दिवसाला ५ टक्के पर्यंत व्याज लावू शकतात.

काही मोठ्या बँकेचे क्रेडीट कार्ड प्रकार पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन पहावे. – Check out the links below to see some of the major bank credit card types.

  1. एच.डी.एफ.सी. बँक क्रेडीट कार्ड प्रकार – HDFC Types of Bank Credit Cards
  2. बँक ऑफ बरोडा क्रेडीट कार्ड प्रकार – Bank of Baroda Credit Card Type
  3. एक्सिस बँक क्रेडीट कार्ड प्रकार – Axis Bank Credit Card Type
  4. पंजाब नेशनल बँक क्रेडीट कार्ड प्रकार – Punjab National Bank Credit Card Types
  5. कोटक महिंद्रा बँक क्रेडीट कार्ड प्रकार – Kotak Mahindra Bank Credit Card Types

हे हि वाचा

1 thought on “क्रेडीट कार्ड वापरत असाल तर घ्या हि काळजी नाहीतर होईल खूप मोठा तोटा – What care should be taken while using credit card ?”

Leave a Reply