नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस….

Belgaum Belgavkar
2 Min Read

Fresh western disturbance from Jan 4 to cause snowfall, rain in north India, predicts IMD

Weather Forecast : IMD Warning Cold Wave, dense Fog, Snowfall & Rain in these States

नव्या वर्षात थंडी जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार असून कमाल तापमानात मात्र फारसा परिणाम जाणवणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार 4 जानेवारीपासून उत्तर भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा तडाखा बसणार आहे. यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे.

North India struggles with cold wave, IMD warns of harsher conditions

आयएमडीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स 4 जानेवारीच्या रात्रीपासून उत्तर-पश्चिम भारतावर परिणाम होणार आहे. 1 ते 3 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने 4 आणि 5 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवलीय. वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतीय क्षेत्रापासून दूर गेलाय. यामुळे थंडीची लाट कमी झालीय. जी केवळ पश्चिम हिमालयीन भागात कायम असल्याचं आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी सांगितलं.

IMD ने बहुतेक ठिकाणी धुके आणि दाट धुके आणि काही ठिकाणी सकाळी दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवलाय. नंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी आणि रात्री धुके किंवा हलके धुके पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. काश्मीरच्या गुलमर्ग आणि पहलगाममध्ये थंडीच्या लाटेमुळे तीव्र थंडी कायम आहे.

- Advertisement -

western disturbance from Jan 4
western disturbance from Jan 4

western disturbance from Jan 4

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *