ओप्पो मोबाईल कंपनीने बाजारात OPPO F27 PRO+ 5G हा मोबाईल वजन फक्त १७६ ग्राम आणि IP69 रेटिंग सहित मोबाईल आणला आहे. IP69 रेटिंग म्हणजे हा फोन कितीही वेळ तुम्ही पावसात पाण्यात वापरू शकता. या मोबाईल वर धूळ नाही राहणार, हाताचे ठसेहि उमटणार नाहीत आणि मुख्य म्हणजे पावसात्त पूर्ण सुरक्षित राहणार आहे. त्याच बरोबर मोबाईल 360 DIGREE BODY ARMOUR सर्टीफिकेशन सहित येतो म्हणजे मोबाईल ६ फुट वरून पडला तरी मोबाईल ला काहीही होत नाही, अशी कंपनी दावा करते.
OPPO F27 PRO+ 5G चा डिस्प्ले कसा आहे
OPPO F27 PRO+ 5G या मोबाईल मध्ये ६.७ इंच म्हणजेच १७.०२ सेंटीमीटर फुल एच.डी. प्लस कर्व – अमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट सहित येतो आणि डिस्प्ले ची ब्राईटनेस हि कंपनीने 950NTS दिलेली आहे. तसेच डिस्प्ले प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टूस 2 आहे. मोबाईल डिस्प्ले स्क्रीन टू बॉडी रेटीओ हा एकदम चांगला म्हणजेच ९३% आहे. डिस्प्ले एकूण १.०७ बिलियन कलर्स सहित विविड मोड आणि जेन्ट्ल मोड असून पिक्सेल डेन्सिटी हि ३९४ पीपीआय आहे. डिस्प्ले पेनेल कंपनीच्या साईट वर ३डी कर्व अमोलेड स्क्रीन दिली आहे.
OPPO F27 PRO+ 5G स्पेसिफिकेशन
सर्वात चांगला मेडियाटेक डायमेनसिटी 7050 (6NM) प्रोसेसर असून सीपीयू हा ८ करोड सोबत २.६ जिएचझेड आणि जीपियु एआरएम माली- जी ६८ एमसी४ आहे. यामध्ये दोन वेरीएंट बघायला भेटतात एक आहे 8GB RAM /128GB स्टोरेज आणि दुसरे वेरीएंट 8GB / 256GB स्टोरेज. फोन स्लिम असून सुद्धा यामध्ये बेटरी 5000MAH देण्यात आली आहे त्याचप्रमाणे एवढी मोठी बेटरी चार्जिंग करण्यासाठी 67W चा सुपरवूक चार्जर हि देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे कि आमच्या चार्जर ने चार्ज केल्यास बेटरी 20 मिनिटात 56% चार्जिंग होते. ओप्पो एफ२७ प्रो ननो सीम कार्ड स्लॉट सहित डूअल सीम सपोर्ट करतो. सेन्सर चा विचार केला तर या मोबाईल मध्ये इन डिस्प्ले कलर टेम्परेचर सेन्सर, जिओमेट्रिक सेन्सर, इन डिस्प्ले प्रोक्सीमेट्री सेन्सर, इन डिस्प्ले ओप्टीकल सेन्सर, एसेलेरेषण सेन्सर, जायरोस्कोप, स्टेप काऊटिंग हे जेवढे गरजेचे आहेत ते सर्व सेन्सर उपलब्ध आहेत
हे हि वाचा – तुमचा मोबाईल आहे का WATER PROOF, IP RATING म्हणजे काय?
OPPO F27 PRO+ 5G मधील कनेक्टीविटी
आता या मोबईल मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे Wifi 6 आणि Wifi 5 ची कनेक्टीविटी मिळते. त्याचबरोबर ब्लूटूथ ५.३ सोबत युएसबी Type C Port हे चार्जिंग आणि ओडओ साठी मिळते. फक्त या मोबईल मध्ये एन.एफ.सी. मिळत नाही तसेही त्याची काही गरजाही भासत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम कलर ओएस १४ (Colour Os 14) मिळते. कंपनी च्या म्हणण्यानुसार कंपनीने या मोबाईल मधील डिस्प्ले मध्ये एक सेन्सर बसवला आहे जो दिसत नाही. तो सेन्सर म्हणजे लाईट सेन्सर आहे. ज्यामुळे अंधारात किवा उजेडात मोबाईल वापरताना मोबाईल चा ब्राईटनेस आपोआप कमी जास्त होतो आणि डोळ्यांना त्रास होत नाही. तसेच हा डीव्हाईस सेल ब्रोडकास्ट सर्विस ला सपोर्ट करतो. सेटिंग्ज मध्ये जाऊन आपण वायरलेस आपत्कालीन सुचना आपण चालू करून वापरू शकतो.
OPPO F27 PRO+ 5G कॅमेरा कसा आहे
मित्रांनो OPPO F27 PRO+ 5G या मोबाईल मध्ये आपल्याला मागील बाजूस मेन कॅमेरा 64MP आणि दुसरा कॅमेरा 2MP मिळतो. आणि सेल्फी कॅमेरा 8MP कॅमेरा आहे. मेन आणि फ्रंट कॅमेराने आपण 4K मध्ये 30FBS व्हिडिओ शूट करू शकतो. मेन जो ६४ मेगापिक्सेल कॅमेरा आहे हा एफ/१.७ एएफ मोड मध्ये मिळतो. तसेच या कॅमेरा ने जास्तीत जास्त ४के ३० एफपीएस मध्ये विडीओ रेकॉर्डिंग करता येऊ शकते, त्याचप्रमाणे १०८०पी ६० एफपीएस आणि ३० एफपीएस मध्ये तर ७२०पी सुद्धा ६० एफपीएस आणि ३० एफपीएस मध्ये विडीओ रेकॉर्डिंग करू शकतो. तसेच स्लो-मोशन विडीओ, टाईम-लप्स, डूअल-व्यू, सुपर-इआयएस असे सर्व प्रकारचे विडीओ रेकॉर्डिंग आपण या मेन कॅमेरा ने करू शकतो.
OPPO F27 PRO+ 5G मोबाईल दोन कालार मध्ये मिळतो
OPPO F27 PRO+ 5G मोबाईल सध्या दोन कलर मध्ये मिळतो. त्यातील डस्क पिंक हा कलर खूपच चान दिसतो आणि दुसरा कलर आहे मिडनाईट नेव्ही, हा कलर थोडा डार्क आहे अंधारात हा पूर्ण Black कलर वाटतो. मागच्या बाजूला प्रीमिअम असे लेदर वापरले आहे. तसेच कॅमेरा सुपर लक्झरी दिसण्यासाठी राउंड शेप रिंग वापरली आहे.
OPPO F27 PRO+ 5G मोबाईल संगे BOX मध्ये काय काय मिळते
- OPPO F27 PRO+ 5G मोबाईल
- 67W चार्जर
- USB DATA केबल
- सीम एजेक्टर टूल
- QUICK GUIDE
- SAFETY GUIDE
- मोबाईल केस
2 thoughts on “पावसाळा चालू झालाय water proof मोबाईल घ्यायचाय हाच बेस्ट ऑप्शन – OPPO F27 PRO+ 5G”