Vivo V40e होतोय भारतात लाँच: दमदार फीचर्स, Ultra Slim आणि तरीही परवडणारी किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo V40e Launch in India:- आज प्रसिद्ध Vivo कंपनी आपला V40e हा मोबाईल भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. आज दुपारी 12 वाजताच हा मोबाईल लाँच झाला आणि या मोबाईलच्या टिझरने लाँच होण्याआधीच बाजारात चर्चेला विषय मिळवून दिला.

कंपनीने आता अधिकृतरित्या हा मोबाईल फ्लिपकार्ट सारख्या साईट्स वरुन खरेदी करता येईल असे सांगितले आहेच शिवाय याचे फीचर्स देखील अधिकृतपणे मांडण्यात आले आहेत. तसेच कंपनीने सांगितल्याप्रमाणे हा मोबाईल रॉयल ब्रॉन्झ आणि मिंट ग्रीन या दोन कलर ऑप्शन्स सह आला आहे.

हा मोबाईल म्हणजेच Vivo ने या आधीच केलेल्या Vivo V40 आणि Vivo V40 Pro याच सिरीजचा एक Upgraded भाग आहे. या Upgraded Version मध्ये Funtouch OS 14 ही ऑपरेटिंग सिस्टिम तर अँड्रॉइड version Android 14 हे वापरण्यात आले आहे.

Vivo V40e Features

Vivo V40e या स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी, 2000 nits पीक ब्राइटनेससह 3D AMOLED Curved डिस्प्ले आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Vivo V40e स्मार्टफोनचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी IP64 रेट असलेली security देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि बॅक पॅनलवर ऑरा लाइट आहे जे नोटिफिकेशन ब्लिंकर म्हणूनही काम करते.

Vivo ने हा नवीन स्मार्टफोन रॉयल ब्रॉन्झ आणि मिंट ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीने 128 GB स्टोरेजसह 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह 12 GB रॅम असे दोन स्टोरेज पर्याय सादर केले आहेत. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 33999/- रुपये आहे. तसेच प्री-बुकिंगवर दोन्ही स्मार्टफोन्सवर 5000/- रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.

हे हि वाचा -  Infinix कंपनी चे पहिले Infinix XPAD 7,000mAh बॅटरी सह भारतात होणार आहे लाँच, बघा स्पेसिफिकेशन्स.

Vivo V40e Availability and Offer

हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. याची विक्री 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. HDFC आणि SBI कार्डसह प्री-बुकिंगवर झटपट 10% सवलत, 6 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI, 15 दिवसांची बदली आणि 10 महिन्यांची विस्तारित हमी यासारख्या ऑफर कंपनीने दिल्या आहेत.

Vivo V40e Price

फीचर्स आणि इतर बाबी पाहता या मोबाईलची किंमत तशी कमीच ठेवण्यात आली आहे. तसेच सध्या प्री बुकिंग सुरू असल्याने कंपनीने यावर भरघोस डिस्काउंट देखील ठेवला आहे.

RAM + StorageOriginal PriceDiscount Price
8GB + 128GBRs. 33999/-Rs. 28999/-
12GB + 256GBRs. 35999/-Rs. 30999/-
Vivo V40e Price

Vivo V40e Camera Details

या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर याचा बॅक कॅमेरा Sony IMX882 OIS चा 50 MP चा आहे. सोबतच यात 8 MP Ultra Wide-Angle Camera lense देण्यात आलेली आहे.

यात फ्रंट कॅमेरा म्हणजेच सेल्फी कॅमेरा देखील AF Ultra Wide-Angle 50 MP चा देण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर कमी प्रकशात देखील चांगले फोटो यावेत यासाठी यात Rear fill light with dual color temperature असा बॅक फ्लॅश ऑप्शन देण्यात आला आहे.

Front कॅमेरासाठी Night, Portrait, Photo, Video, Micro Movie, High Resolution, Dual View, Live Photo असे पर्याय तर बॅक कॅमेरासाठी Night, Portrait, Photo, Video, Micro Movie, High Resolution, Pano, Ultra HD Document, Slo-mo, Time-lapse, Supermoon, Pro, Dual View, Live Photo असे पर्याय देण्यात आलेले आहेत.

Vivo V40e Display

Vivo V40e या मोबाईलचा डिस्प्ले 6.77 इंचाचा असून याचे Resolution 2392 × 1080 आहे. याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे.

Vivo V40e Design

हा मोबाईल अगदी स्लिम आणि वजनाला हलका आहे. या मोबाईलची लांबी, रुंदी आणि उंची 16.372cm ×7.5cm ×0.749cm(7.49mm) आहे. याची जाडी फक्त आणि फक्त 7.49 mm एवढीच आहे त्यामुळे हा मोबाईल carry करणे खूप सोपे जाणार आहे. तसेच या मोबाईलचे वजन फक्त 183 ग्रॅम आहे.

हे हि वाचा -  OPPO F27 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे,तर बघा याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Vivo V40e Battery

या मोबाईल मध्ये 80 W ची 5500 mAh ची Li-ion battery वापरण्यात आली आहे. यामुळे सतत बॅटरी डाऊन होणे किंवा सतत चार्ज करत राहणे असे त्रास वापरकर्त्याला होणार नाहीत.

Vivo V40e Box Contains

  1. हा मोबाईल विकत घेताना या मोबाईलच्या बॉक्स मध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील.
  2. Vivo V40e Smartphone
  3. Quick Start Guide म्हणजेच युजर Manual
  4. USB Cable (चार्जिंग केबल)
  5. Charger
  6. Eject Tool (SIM card टाकण्यासाठी)
  7. Phone Case (बॅक कव्हर)
  8. Protective Film (applied) म्हणजेच स्क्रॅच कार्ड जे आधीच मोबाईलला लावलेले असेल.
  9. Warranty Card

FAQ

  1. What is the starting Price of Vivo V40e in India?

    It Starts from Rs. 33999/-.

  2. What are colour options in Vivo V40e?

    It’s available in two colour options i.e. Royal Bronze and Mint Green

Leave a Reply