Vinesh Phogat is out in Paris Olympic 2024 – सध्या जगभरात ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. महिलांच्या स्पर्धाही चांगल्याच गाजत आहेत. अश्यातच कुस्तीची स्पर्धा चर्चेत आली आहे ती विनेश फोगाट यांच्यामुळे. त्यांनी जो सामना खेळला त्यानुसार भारताचे सुवर्ण पदक निश्चितच झाले होते. पहिली फेरी फार अटीतटीची झाली. दुसऱ्या फेरीतही विनेश फोगाट यांनी चांगला खेळ खेळून बाजी पटकावली आणि ऑलिंपिक मध्ये शेवटच्या फेरीत जाणारी विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) ही भारताची पहिली महिला ठरली पण या सगळ्याला ग्रहण लागले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नक्की झालं काय म्हणून हे पदक हुकले हे जाणून घेऊया पण त्याआधी पाहूया विनेश फोगाट आहेत तरी कोण?
कोण आहेत विनेश फोगाट – Who is Vinesh Phogat? ?
विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) या ज्या कुटुंबातून आल्या आहेत त्या कुटुंबात एकूण सहा बहिणी आहेत. त्या सगळ्यांनीच भारतासाठी काही ना काही केले आहे आणि भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. विनेश फोगाट यांच्या काकांचा जीवन प्रवास दंगल चित्रपटात दाखवण्यात आला आहेच. तेच विनेश फोगाट यांचे गुरूही आहेत. फोगाट रेसलेर सिस्टर्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्यात गीता, बबिता, प्रियांका, रितू, विनेश आणि संगीता यांचा समावेश आहे. यांच्यातील गीता, बबिता, रितू आणि संगीता माजी पेहेलवान पटू महावीर सिंह फोगाट यांच्या मुली आहेत.
वयाच्या नवव्या वर्षीच विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) यांनी आपल्या पित्याला गमावले आणि म्हणूनच महावीर सिंह यांनी विनेश आणि प्रियांका यांचा सांभाळ केला. त्यांनी सहाही मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. विनेश आणि त्यांच्या बहिणींनी उत्तम प्रशिक्षण घेऊन भारताला पदके मिळवून दिली आणि आपल्या देशाचे नावही उज्ज्वल केले. एवढेच नव्हे तर महावीर सिंह यांना त्यांच्या कोचिंग मुळे भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविले देखील आहे.
विनेश फोगाट यांचा खेळ कसा होता – How was Vinesh Phogat’s game??
खेळ सुरु झाल्यावर पहिली फेरी खूप अटीतटीची झाली. यात विनेश फोगाट यांनी १ – ० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत २ – २ ने आघाडी घेऊन ५ – ० अशी परिस्थिती आणली. या परिस्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आले नाही आणि विनेश फोगाट या अंतिम फेरीत दाखल झाल्या.
विनेश फोगाट यांना स्पर्धेत अपात्र का ठरविण्यात आले?
ऑलिंपिक ची स्पर्धा सुरू झाली आणि विनेश फोगाट यांनी ५० किलो महिला कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता परंतु सुवर्ण पदकाच्या फेरीसाठी होणाऱ्या स्पर्धेआधीच त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) यांनी ५० किलो महिला कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता परंतु या सुवर्ण पदकाच्या फेरी आधी त्यांचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅमने वाढलेले आढळल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. या स्पर्धेच्या नियमानुसार कुस्तीपटुंना त्यांचे वजन आटोक्यात ठेवावे लागते. विनेश यांनी मंगळवारच्या सामन्यासाठी त्यांचे वजन ५० किलो पेक्षा कमी ठेवले होते. ऑलिंपिकच्या नियमानुसार खेळाडूला सामन्यात तेवढेच किंवा त्यापेक्षा कमी वजन ठेवावे लागते.
विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) यांना आता रौप्य पदक मिळेल का नाही. ?
स्पर्धेच्या नियमानुसार त्या रौप्य पदकासाठी देखील अपात्र आहेत. त्यामुळेच स्पर्धेच्या ५० किलो गटात फक्त सुवर्ण आणि कांस्य पदक विजेतेच असणार आहेत. जेव्हा उपांत्य फेरीत विनेश फोगाट यांनी ५ – ० असा स्कोर केला होता तेव्हा सोशल मीडियावर #दंगल हा ट्रेंड करत आहे.
भारताला ऑलिम्पिक कुस्तीत किती मेडल्स मिळाले आहेत?
भारताला पाच ऑलिम्पिक स्पर्धेत सहा मेडल्स मिळाली आहेत. ज्यात २००८ मध्ये सुशील कुमार यांनी जिंकलेले कांस्य आणि २०१२ मध्ये जिंकलेले रजत, तसेच योगेश दत्तचे कांस्य, २०१६ मध्ये साक्षी मलिक चे कांस्य, २०२० मध्ये बजरंग पूनिया यांचे कांस्य आणि रवी दहियाने यांचे रजत पदक यांचा समावेश आहे.
विनेश फोगाट यांनी याआधी किती पदके जिंकली आहेत?
कॉमवेल्थमध्ये त्यांनी सलग तीन सुवर्ण पदके जिंकली होती. २०१८ मधील जकार्ता येथील एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल, २०२१ मधील स्पर्धेत सुवर्ण पदक याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन रौप्य पदे त्यांनी पटकावली आहेत.
हे हि वाचा