4 Army personnel dead in Poonch accident are from Karnataka
6 soldiers killed as vehicle falls into gorge in Poonch
कर्नाटक—belgavkar : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने जखमी झालेल्या कोडगू येथील दिवीन (वय 28) या जवानाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून 5 जवानांचा मृत्यू झाला होता. या घटनेत दिवीन गंभीर जखमी झाला होता.
त्याला उपचारासाठी श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लष्करी अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कॉलनंतर जवानाची आई जया श्रीनगरला गेली होती. आता तो मृत पावल्याचे वृत्त आले आहे. सोमवारपेठ तालुक्यातील अलूर सिद्धापूर गावातील शिपाई दिवीन, आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दहा वर्षांपूर्वी तो सैन्यात दाखल झाला. फुफ्फुसांना गंभीर इजा झाल्याने त्यांने रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.
नुकताच त्याची लग्नाची तारीख निश्चित केली होती. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराचे वाहन कोसळल्याने बेळगावच्या सुळेभावी येथील एका जवानासह कर्नाटकातील 3 जवानांसह मराठा रेजिमेंटच्या एकूण 5 जवानांचा मृत्यू झाला होता. अनेक सैनिक जखमी झाले होते.
या भीषण दुर्घटनेत कर्नाटकातील तिघांसह एकूण 6 जण मृत्यू पावले. बेळगावजवळील सांबरा गावचे सुभेदार दयानंद तिरकन्नवर (वय 45), कुंदापूरजवळील कोटेश्वर बिजाडी येथील अनूप (33), बागलकोट महालिंगापूरचे महेश (25) यांचा मृत्यू झाला होता.
vehicle falls into gorge in Poonch
vehicle falls into gorge in Poonch