“महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणता ही चेहरा उभा करा आम्ही पाठींबा देवू”, Uddhav Thackeray

By Swamini Chougule

Published on:

Uddhav Thackeray
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. मुंबईतमधील शडमुखा हॉलमध्ये प्रचार सभेत बोलताना Uddhav Thackeray बोलत होते. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा म्हणून कोणते ही नाव जाहीर करा, माझा पाठींबा असेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जागावाटपावर बोलताना उद्धव ठाकरे विनंती करत म्हणाले की जागावाटपावरून मारामारी नको.

सिक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडले का? असा ठोक सवाल करत उद्धध ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) मोदींवर निशाणा साधला. सरकार निवडणुकांना घाबरले आहे. असे म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर निशाण साधला.

सभेत Uddhav Thackeray काय बोलले?

महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलताना म्हणाले की निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे तर त्यांनी आज निवडणूक जाहीर करावी.
महाराष्ट्रात धर्म रक्षणाची आणि स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. लढाई अशी लढायची की एक तर तू राहशील नाय तर मी राहील! होऊन जाऊ दे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे. सत्ताधारी बघतायत डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो. तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठींबा आहे.

भाजपसोबत जो धोका घेतला तो मला नको आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरवलं जायचं पण एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या पण यामध्ये असं नको आधी ठरवा आणि मग पुढे जा कारण त्यामध्ये धोका जास्त आहे. योजना पोहोचवणाऱ्याला 10 हजार महिना दिले जातात त्यासाठी दूत नेमले. हा लोकांचा पैसा आपण नाही होऊ शकत दूत आपण अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा असे कार्य कर्त्यांना सांगितले आहेत.

विधानसभा निवणूक एक महिना पुढे ढकलायच सुरू आहे कारण आपलं काम जनतेने विसरायला पाहिजे. लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? IAS अधिकारी सांगतायत साहेब तुम्ही लवकर या…यांच खरं रूप काय? गद्दारांना …सरकार पाडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली.


सुप्रीम कोर्टात पक्षाची लढाई सुरू आहे त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) म्हणाले की या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आपल्याला न्याय देवतेचा आशीर्वाद मिळेल. आपला निकाल पन्नास वर्षात नक्कीच लागेल. चंद्रचूड यांचे भाषण मी ऐकले नाही. भूतकाळात जेंव्हा आम्ही पाहतो तेंव्हा राम शास्त्री प्रभुणे आठवतात. चंद्रचूड साहेब तुम्ही जे काय केलं आहे त्याची नोंद इतिहासात नक्की होईल.असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

मोदींची गॅरंटी चालत नाही म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडचणीत आणण्यासाठी जर हे प्रश्न विचारत असाल तर आजच निवडून जाहीर करा. तुम्ही राज्यात ओबीसी मराठा वाद लावलाय.. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठींबा देऊ. समाजा-समाजात आगी लावू नका, असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना केलं.

सभेत जयंत पाटील काय बोलले?

लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, महाराष्ट्रात 31 जागांवर भाजपला नाकारले आहे. ते घाबरलेले आहेत आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात सही करण्यावरून काही तरी झाले ते म्हणतायत आत्तापर्यंत आम्ही बघून साह्य केल्या का? म्हणजे आत्तापर्यंत न बघता साह्य केल्या आहेत.शरद पवार म्हणतात जो मुख्य असतो तोच आधी बोलतो अशी दक्षिणेकडची पद्धत आहे.

सरकार निवडणूक कधी घेणार याचा अंदाज येत नाही. आज सुद्धा हरियाणा,जम्मू काश्मीर निवडणूक जाहीर होतेय अशी माहिती आहे. महाराष्ट्र सरकार अजून ही निवडणूक घ्यायला घाबरत आहे.15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विधानसभा घेतील कारण हे अजून घाबरले आहेत. 400 पार करणारे 240 वर थांबले आणि नंतर पलटी मारणारे दोन टेकू सोबत घेतले. सिव्हिल कोड मध्ये सेक्युलर शब्द तुम्हाला वापरावा लागला यात तुमची हार आहे. तुम्ही एक दिलाने काम केलं तर आपलंच सरकार राज्यात येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

हिंदू संस्थांनाच्या जमिनी लाटल्या गेल्या या जमिनी भाजप नेत्यांना विकल्या. या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये घेण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्माण घेतला.6 हजार किलो मीटर रस्ते सिमेंट काँक्रीट करणार आहे. MSIDC मंडळवर ही जबाबदारी दिली. स्टाफ त्यांच्याकडे नाही आणि 37000 कोटींचे हे काम हे करणार आहे. नांदेडहून जालन्याकडे जाण्याचा रस्ता करणार आहेत. 1 किलो मीटरसाठी 83 कोटी रुपये खर्च येतोय. 96 किलोमीटरचा मार्ग करत आहेत. अलिबाग वर्सोवा कॉरिडोर करताय. 20हजार कोटी पेक्षा जास्त खर्च यासाठी करणार आहेत. चंद्रावर जायला सुद्धा एवढा खर्च येणार नाही. भाई ठाकूरकडे जायला एवढा खर्च करताय.

आता महाराष्ट्रात विधानसभा निवणुकीची धुमचक्री सुरू होणार ही सभा म्हणजे याचीच नांदी आहे.

2 thoughts on ““महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणता ही चेहरा उभा करा आम्ही पाठींबा देवू”, Uddhav Thackeray”

Leave a Reply