Best Offroding Bike TVS Ronin :- पाऊस पडला की त्या रम्य वातावरणात बाईक राईड करण्याचा अनुभव नाही खासच असतो. अनेकांना चारचाकी गाडीपेक्षा दुचाकीवर फिरणे आवडते. अनेक बाईक प्रेमी किंवा लाँग ड्राईव्ह प्रेमी एका चांगल्या बाईकच्या शोधात असतात. अश्याच बाईक चाहत्यांसाठी ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते. चला तर मग बघूया कोणती आहे ही बाईक.
TVS ही जुनी आणि नावाजलेली कंपनी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गाड्यांच्या डिझाईन आणि इंजिन मध्ये बरेच बदल होत आहेत. अश्यातच टीव्हीएस (TVS) ने रोनीन (Ronin) ही गाडी बाजारात आणली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय काय आहेत याचे फीचर्स.
ही बाईक एक खास मॉडेल आहे. TVS ने निओ – रेट्रो थीम मधील प्रीमियम मोटारसायकल आहे. पूर्णपणे नवे असलेले हे डिझाईन कधीही पाहिले गेले नाही. या बाईकचे डिझाईनच याची खास खासियत बनले आहे.
कसे आहे गाडीचे डिझाईन? – Design of TVS Ronin
यात गोल आकाराचे हेड लॅम्प आणि टी आकाराचे पायलट लॅम्प आहेत. ही बाईक एक retro बाईक आहे ज्यात क्रुझर आणि कॅफे रेसर टायर्स सारख्या स्क्रॅम्बलरचा समावेश आहे. याचे टायर १७ इंच आहेत. बाईकची सीट खूप सॉफ्ट आहे त्यामुळे लांबवरच्या प्रवासासाठी त्यावर बसणे सोयीचे जाते.
गाडीचे इंजिन कसे आहे? – TVS Ronin Engine Details
TVS Ronin 225 मध्ये 225.9cc इंजिन आहे जे 15.01 kw पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. या बाईकचा टॉप स्पीड 120 km/h आहे. हे इंजिन मजबूत आहेत त्यामुळे हायवेवरही चांगले काम करते.
गाडीचे फीचर्स काय आहेत?- features of tvs ronin
ही बाईकची रायडिंग quality खूप चांगली आहे कारण याचे हॅण्डल बार आणि सीट असे सेट केले गेले आहेत ज्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यासाठी रायडरला जास्त त्रास होत नाही. या बाईकला नवीन LED हेडलाईट आहेत. याशिवाय TVS SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत त्यामुळे संपूर्ण डिजिटल राउंड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. यात टियर ड्रॉप फ्युएल tank आहे. सीटच्या मागच्या बाजूला grab रेलची सुविधा आहे. सीट अत्यंत मऊ आणि फ्लॅटिश सिंगल पीस आहे.
TVS SmartXonnect काय आहे?
हे टीव्हीएसने विकसित केलेले एक इन हाऊस तंत्रज्ञान आहे जे बाईकला कनेक्ट केले जाते. ॲप द्वारे हे बाईकला कनेक्ट करते आणि यावर कॉल अलर्ट्स, एसएमएस अल्टर्स देते. यात voice assistant असल्याने बाईकशी बोलून बरीच कामे होतात. एवढेच नव्हे तर या ॲप द्वारे शेवटची ही बाईक कुठे पार्क केली गेली यावरून ती शोधता देखील येते.
TVS Ronin कोणकोणत्या रंगात उपलब्ध आहे?
ही बाईक सिंगल, ड्युअल आणि ट्रिपल कलर टोन मध्ये उपलब्ध आहे.
TVS Ronin बाईकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काय काय सुविधा आहेत?
सुरक्षेसाठी या बाईकमध्ये Anti Lock braking system म्हणजेच (ABS) ची ड्युअल चॅनल सुरक्षा मिळते ज्यामुळे कोणत्याही नुकसानाशिवाय प्रभावी ब्रेकिंग मिळते. एक मोड रोड मोड आहे तर दुसरा रेन मोड आहे. त्याचप्रमाणे यात स्लीपर क्लच आणि ग्लाइड तंत्रज्ञान वापरले गेले आहे. प्रवास किंवा राईड एकदम आरामदायी व्हावी म्हणून मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आणि पुढील बाजूस USD फोर्क्स असतील.
ग्लाईड थ्रू तंत्रज्ञान म्हणजे काय?- glide through technology
हे एक असे तंत्रज्ञान आहे जे सतत गिअर न बदलता ट्रॅफिक मध्येही बाईकला क्रुझ आणि फिल्टर करू देते. या फीचरमुळे बाईक रायडरला सतत क्लचवर हात न ठेवता सहज ट्रॅफिक मधून बाहेर पडता येते.
बाईकचा परफॉर्मन्स कसा आहे? – TVS Ronin performance
ही बाईक शहरात आणि हायवेवर चांगली चालवता येते. यावर अगदी आरामदायी आणि सहज राईड करता येते पण याचा हॅण्डल बार जरा जड पडतो. इथे ही बाईक थोडी निराश करते. ही बाईक स्पीडमध्ये बाईक चालवण्यासाठी खरंच मजेदार आहे. 80km/hr चा speed ही बाईक कोणत्याही अडचणी शिवाय सहज पकडते.
किंमत किती आहे? – tvs ronin on road price
या बाईकची x showroom किंमत 172700/- अशी आहे.
FAQ:-
१. TVS Ronin च्या विशेष आवृत्ती मध्ये कोणते वेगळे गुण आहेत?
:- एक विशिष्ट ग्राफिक, तीन टोन रंगसंगती, विविध प्री फिट accessories आहेत.
२. TVS Ronin ची किंमत काय?
या गाडीची किंमत एक लाख बहात्तर हजार सातशे रू. आहे.
ही होती TVS Ronin बद्दल संपूर्ण माहिती. फीचर्स आणि सुविधा बघता ही बाईक एकदम वाजवी दरात उपलब्ध आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बाईक प्रेमींना किंवा लाँग ड्राइव्ह प्रेमींना नक्कीच ही बाईक आवडली असणार.
1 thought on “TVS ची TVS Ronin हि ऑफरोडींग बाईक करणार भल्याभल्या बाईक ची हवा टाईट”