पेट्रोल स्कूटर आणि बाइक पेट्रोल च्या वाढत्या कीमती मूले परवडत नाही. त्यातच भारतामधे ब्रांडेड कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक लौंच करत आहे म्हणून सध्या भारतात इलेक्ट्रिक गाडीची मागणी वाढत चालली आहे. TVS या कंपनीने मागेच TVS iQube EV ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलि. चांगले मायलेज आणि सुन्दर लुक मुले या गाडीला ग्राहकांनी खुप पसंती दाखवली.
iQube EV चे कमी किमतीचे व्हेरिएंट झाले लॉन्च
TVS ही टू-व्हीलर ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक मोठी आघाडीची कंपनी आहे. आणि या कंपनीने इलेक्ट्रिक (EV) मधे ही आपला दबदबा बनविला आहे. सध्या कंपनीने iQube चेच बेस व्हेरीएंट लॉन्च केले आहे जिची किम्मत पहिल्या स्कूटर पेक्षाही कमी आहे. सर्वात कमी म्हणजेच बेस व्हेरीएंट स्कूटर ची किम्मत ९४९९९ रु. ( शोरुम) एवढी ठेवण्यात आलेली आहे. ज्या जुन्या स्कूटर आहेत त्याच्या कीमती या व्हेरीएंट पेक्षा जास्त आहेत.
नविन TVS iQube EV बेस व्हेरीएंट फीचर्स
TVS iQube EV बेस व्हेरीएंट मधे 2.2 kwh ची बटरी देण्यात आलेली आहे जी फ़ास्ट चार्जिंग सहित २ तासात ८० % चार्जिंग होते आणि 4.4kw हब माउंट BLDC मोटर आहे, ही मोटर 140Nm टोर्क तयार करते असा कंपनीने क्लेम केलेला आहे. या व्हेरी एंट मधे स्पीड साठी दोन मोड़ देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे इको मोड़ ज्यामधे गाडी एकदा चार्ज केल्यावर ७५ किलोमीटर ची रेंज देते आणि दूसरा म्हणजे पावर मोड़ यामधे गाडी ६० किलोमीटर ची रेंज देते. या स्कूटर मधे मस्त मोठी अशी ५ इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. अजुन फीचर्स पाहिले तर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ३० लीटर भव्य असा स्टारेज, टो अलर्ट, क्रश अलर्ट हे दिले गेलेले आहेत. बटरी फ़ास्ट चार्जिंग साठी गाडी सोबत एक ९५० वैट चार्जर दिला गेलेला आहे.
आय क्यूब इलेक्ट्रिक मध्ये तीन मोडेल्स
आय क्यूब या स्कूटर चे मुख्य तीन मोडेल आहेत. आय क्यूब बेस मोडेल, आय क्यूब एस मोडेल आणि तिसरे म्हणजे आय क्यूब एस टी मोडेल. यातही हि बाईक बेटरी रेंज नुसार एकूण पाच वेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. बाईकची व्हेरीएंट आणि रेंज नुसार पाचही मोडेल ची डीटेल्स माहिती पाहू.
आय क्यूब बेस- २.२
२.२ म्हणजेच या मोडेल मध्ये बेटरी २.२ के.डब्लू.एच. ची आहे. हि बेटरी चे मोडेल सरासरी ७५ किमी ची रेंज देते. तसेच कंपनी दावा करते कि २.२ के.डब्लू.एच. बेटरी ०ते ८० % चार्जिंग व्हायला दोन तास लागतात. या व्हेरीएंट मध्ये कंपनीने दोनच कलर उपलब्ध केले आहेत. एक म्हणजे पर्ल व्हाईट आणि दुसरा म्हणजे वालनट ब्राऊन. या मोडेल ची एक्स शोरूम किंमत रु. १०७९८१ इतकी आहे.
आय क्यूब बेस- ३.४
या मोडेल मध्ये ३.४ के.डब्लू.एच. ची लिथीयम आयर्न बेटरी दिली असून, ७५ ते १०० किमी/ बेटरी ची रेंज मिळते. गाडीचे टोप स्पीड ७८ किमी/ तास इतके आहे. तसेच हे व्हेरीएंट पर्ल व्हाईट, शाईनिंग रेड आणि टायटेनियम ग्रे ग्लोसी असे तीन कलर मध्ये उपलब्ध आहे. या मोडेल ची एक्स शोरूम किंमत रु. १३७३११ इतकी आहे.
आय क्यूब एस.
३.४ के.डब्लू.एच. ची लिथीयम आयर्न बेटरी सहित मिळणारे हे मोडेल एकदा बेटरी चार्ज केल्यावर १०० किमी पर्यंत जाते आणि हि बेटरी शून्य ते ८० % व्हायला साडेचार तास लागतात. तसेच या मोडेल मधेही वेगळे तीन कलर मिळतात. एकतर मिंट ब्लू, दुसरा कॉपर ब्रांझ ग्लोसी आणि तिसरा कलर हा मर्क्युरी ग्रे ग्लोसी हे कलर मिळतात. या मोडेल ची एक्स शोरूम किंमत रु. १४७१०२ इतकी आहे.
आय क्यूब एस.टी. ३.४
या हि मोडेल मध्ये आय क्यूब प्रमाणे ३.४ के.डब्लू.एच. ची लिथीयम आयर्न बेटरी मिळते परंतु यामध्ये चार्जर थोडा फास्ट मिळतो. फास्ट चार्जर मुळे हि बेटरी शून्य ते ऐंशी पर्यंत चार्ज व्हायला फक्त तीन तास लागतात. बेटरी ची रेंज हि सारखीच आहे १०० किमी पर्यत. परंतु या मोडेल मध्ये चार कलर मिळतात, स्टारलाईट ब्लू ग्लोसी, टायटेनियम ग्रे मेट, कोरल स्टेन्ड ग्लोसी आणि चौथा कोपर ब्राँझ मेट. या मोडेल ची एक्स शोरूम किंमत रु. १५६२३७ इतकी आहे.
आय क्यूब एस ५.१
हे मोडेल मात्र सर्वात महाग आहे कारण यामध्ये बेटरी सर्वात मोठी म्हणजेच ५.१ के.डब्लू.एच. हि मिळते. आणि या स्कूटर ची रेंज हि जास्त म्हणजेच १५० किमी पर्यंत आहे. बेटरी मोठी असल्यामुळे पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळ जवळ ८ तास लागतात. हे हि मोडेल आय क्यूब एस.टी. ३.४ मोडेल च्याच स्टारलाईट ब्लू ग्लोसी, टायटेनियम ग्रे मेट, कोरल स्टेन्ड ग्लोसी आणि चौथा कोपर ब्राँझ मेट या चार कलर मध्ये उपलब्ध आहे. या मोडेल ची एक्स शोरूम किंमत रु. १८६०५६ इतकी आहे.
( पाचही मोडेल च्या किमंती ह्या महाराष्ट्र( पुणे) येथील जुलै २०२४ मधील आहेत. राज्य आणि जिल्हा नुसार किमतीत बदल होऊ शकतो. )
सारांश:-
जर तुमचे दररोज चे रनिंग ७५ किमी पेक्षा कमी असेल तर. तुम्ही बेस मोडेल घेऊ शकता. आणि जर रनिंग १०० किमी पर्यंत असेल तर सेकंड मोडेल वल्यू फोर मनी आहे. परंतु जर एकदम सर्व फीचर्स सहित इलेक्ट्रिक आय क्यूब हवी असेल तर टोप मोडेल म्हणजेच आय क्यूब एस ५.१ हेच तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये टच स्क्रीन, मोबाईल कनेक्टीविटी, मोठी बेटरी, जास्त रेंज हे सर्व फीचर्स मिळतात.
TVS iQube EVeeeeeEV च्या सर्व व्हेरीएंट च्या कम्पेरिजन साठी इथे क्लीक करुण पाहू शकता
6 thoughts on “TVS iQube EV – इलेक्ट्रिक (EV) मधे स्वस्त आणि ब्रांडेड स्कूटर झाली लॉन्च, किम्मत ही कमी”