त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात कुत्र्यांचा हल्ला, 10 जण जखमी

Belgaum Belgavkar
2 Min Read

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर

Shri Trimbakeshwar Temple

त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दर्शन रांगेमध्ये उभे हल्ला…

Trimbakeshwar Jyotirling : 12 ज्योर्तिलिंगापैकी एक नाशिकचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिक (महाराष्ट्र) : त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरामध्ये भीतीचे वातावरण होते. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये मंदीरातील रांगेत 10 जणांना कुत्र्याचा चावा

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 10 जणांना चावा घेतला. रविवारी संध्याकाळी मंदिराच्या दर्शन रांगेत उभे असताना कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये 5 मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारााठी दाखल करण्यात आले.

 

पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्यानं काही काळ मंदिर परिसरात भीतीचे वातावरण होते. जखमी झालेल्यांमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवार असल्याने देशभरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरातील दर्शनरांगेत आबालवृद्ध भाविक उभे असताना अचानक मोकाट श्वानांनी भाविकांवर हल्ला केला. काही क्षणात श्वानांनी भाविकांच्या पायाला चावा घेण्यास सुरुवात केला. या हल्ल्यात सर्वाधिक लहान मुले जखमी झाली आहेत. श्वानांनी चावा घेण्यास सुरुवात केल्याने भाविकांमध्ये घबराट उडाली. यामुळे गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेने भाविकांनी नाराजी वर्तवली आहे.

 

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, लस उपलब्ध होत नसल्याचा आरोप झाल्याने भाविकांसह नातलगांनी संताप व्यक्त केला. ही बाब लक्षात येताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी रुग्णालयात येत पाहणी केली. श्वानदंशावरील उपचारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेले सिरम औषध मर्यादित स्वरूपात उपलब्ध झाल्याने त्याचा तुटवडा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ते उपलब्ध करून दिले.

 

Trimbakeshwar Temple Dog Attack
Trimbakeshwar Temple Dog Attack

Trimbakeshwar Temple Dog Attack

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *