बेळगाव—belgavkar—belgaum : मृत्यू कधी पण येऊ शकतो….! याचे प्रत्यंतर बुधवारी रात्री एका ट्रॅक्टर चालकाला आले. थांबलेल्या ट्रॅक्टरच्या सीटवरुन चालक सुरेश रवींद्र लोखंडे (वय 40, संकेश्वर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) खाली घसरले. थंडीमुळे त्यांनी गळ्यात स्कार्फ बांधला. स्कार्फ ट्रॅक्टरच्या एका छोट्याशा फटीत अडकला आणि क्षणार्धात त्याचा फास सुरेश यांच्या गळ्याभोवती लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
विश्रांतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर रस्त्याकडेला लावला. यावेळी त्यांना
चोथ्याची खोप (ता. आजरा, कोल्हापूर) ते हुडे माद्याळ (ता. कागल) रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुरेश बुधवारी रात्री परिसरातील एका साखर कारखान्याला ट्रॅक्टरमधून ऊस उतरवून रात्री दहाच्या सुमारास माघारी जात होते. विश्रांतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर रस्त्याकडेला लावला. यावेळी त्यांना डुलकी लागली. अर्धवट झोपेतच ते सीटवरुन घसरत खाली आले.
थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी गळ्याभोवती स्कार्फ बांधला होता. घसरताना स्कार्फ ट्रॅक्टरच्या फटीत अडकला. गळ्याभोवती जोराचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मूळ गाव सोलापूर (ता. हुक्केरी) असून ते सध्या संकेश्वर येथील नमाज माळ परिसरात रहात होते.
त्यांच्या मागे आई, पत्नी, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, घटनास्थळी गर्दी जमली होती. घटना आपल्या हद्दीत घडली, असे समजून आजरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र घटना कागल तालुक्याच्या हद्दीत घडल्याने मुरगूड पोलिसांना कळविण्यात आले.
Tractor Driver Dies Scarf Sankeshwar Hukkeri Belgaum
Tractor Driver Dies Scarf Sankeshwar Hukkeri Belgaum