दहा लाखाच्या आत, आग लावतील या दोन कार 2024 अखेर होतील लॉन्च- Toyota Belta & Citroen Basalt

By Admin

Published on:

Toyota Belta & Citroen Basalt
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक व्यक्तीच स्वप्न असतं की आपल्या दारासमोर एक छानशी कार असावी ,पण ती कार आपल्या खिशाला परवडणारी देखील असावी अशी अपेक्षा असते. आपणही सध्या कार घेण्याच्या विचारात असाल तर थोडे थांबा. कारण येत्या काही महिन्यांमध्ये अशा दोन तगड्या कार लॉन्च होणार आहेत की ज्यामुळे कारचं मार्केट हादरून जाईल. कारण या दोन कार आपल्या बजेटमध्ये देखील असणार आहेत. – Toyota Belta & Citroen Basalt

1) टोयोटाची बेल्टा – Toyota Belta 2024

तर ज्या कारबद्दल आपण बोलत आहोत त्यातील पहिली कार आहे ती म्हणजे टोयोटाची बेल्टा कार (Toyota Belta ) .टोयोटाने मारुती सुझुकीच्या सहकार्याने उत्पादन केलेल्या टोयोटा ग्लांझा आणि टोयोटा अर्बन क्रुझरला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या संयुक्त प्रयत्नाने नवीन सेडन टोयोटा बेल्टा लॉंच होण्याच्या मार्गावर आहे. टोयोटा बेल्टा (Toyota Belta ) ही सरळसरळ होंडा सिटी ह्युंदाई वेरना सोबत स्पर्धा करेल. टोयोटाच्या या बेल्टा कार मॉडेल चे डिझाईन मारुती सुझुकीच्या सियाज या कार मॉडेल पासून प्रेरित असणार आहे.

टोयोटा बेल्टा (Toyota Belta ) चे खास वैशिष्ट्य सांगायचे झाले तर टोयोटा बेलटा (Toyota Belta ) ही हारटेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.या कारमध्ये नवीन फ्रंट ग्रील आणि नवीन अलोय व्हील सोबतच उतार असलेल्या रूफलाईन मिळतील. विशेष बाब म्हणजे ही कार ब्ल्यू, व्हाईट ,आणि रेड या कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केली जाणार आहे.

कारची खास वैशिष्ट्ये

टोयोटा बेल्टाच्या (Toyota Belta ) खास फीचर्स बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर या सेदान कार मध्ये एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह 7 इंच स्क्रीन इन्फोटेक सिस्टीम, 4.2 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टेरिंग व्हील , क्रुझ कंट्रोल मिळेल.टोयोटा बेल्टा 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सह मिळणार आहे.

टोयोटा बेल्टा (Toyota Belta ) किंमत

कमीत कमी किमतीमध्ये भारतात लॉन्च करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. ही कार भारतात 10 लाख रुपये ते 14 लाख रुपये च्या श्रेणीमध्ये असणार आहे. तसेच हाय स्पीड अलर्ट सिस्टीम, 6 एअर बॅग्ज, रियर व्ह्यू कॅमेरा ,ए बी एस आणि इ बी डी यासारख्या प्रमाणित मानकांमुळे ही सेडन कार अजून सुरक्षित असणार आहे.

इंजिन व पावर

या कारमध्ये 1.5लिटर 4 सिलेंडरचे सौम्य हायब्रीड पेट्रोल इंजिन असणार आहे की जे 103 बीएचपी पावर व 138 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. टोयोटा बेल्ट कार डिसेंबर 2024 अखेर भारतात लॉन्च होईल.

हे हि वाचा

  1. टाटा पंचला टक्कर देणार आता ही गाडी किंमतही कमी – Hyundai Exter CNG
  2. बापरे कोण घेणार हि गाडी ? तीन कोटी रुपये पण फीचर्समध्ये  कुठेच कमी नाही- Defender 130

2) सिट्रेऑनची बेसाल्ट – Citroen Basalt 2024

दहा लाख रुपयांच्या आतील श्रेणीमध्ये असणारी आणि ऑगस्ट महिन्यात कार मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत असलेली दुसरी कार म्हणजे सिट्रेऑनची बेसाल्ट (Citroen Basalt) कार. भारतातील कार मार्केट ची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये आपला कार व्यवसाय वाढवू पाहत आहेत त्यापैकीच एक आहे सिट्रेऑन कंपनी. कंपनी या महिन्यांमध्ये तिचं पाचवं कार मॉडेल म्हणजेच बेसाल्ट (Citroen Basalt) लॉंच करण्याच्या तयारीत आहे .

या पोस्टमध्ये पुढे तुम्ही जाणून घ्याल बेसाल्ट (Citroen Basalt) या कारच्या किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल. तुम्हाला एसयूव्ही किंवा कुपे कार मॉडेलबद्दल माहिती असेल पण ही कार या दोन्हीचे संमिश्रन डिझाईन असणार आहे. कार एक्स्पिरियर या कारच्या बंपर डिझाईन मुळे एक वेगळाच लूक मिळतो . समोरील बाजूला v shaped एलईडी डी आर एल एस दिले आहेत .या कारचे डिझाईन c3 एअर क्रॉस कॉम्पॅक्ट सारखे दिसून येते . कारच्या टॉपला कूपे रूफ लाईन व ड्युअलटोन फिनिश aloy wheel देण्यात आलेले आहे. पाठीमागे रॅपराऊंड एलईडी टेल लाईट, ब्लॅक आऊट बंपर आणि सिल्वर स्कीड प्लेट दिलेली आहे.

सिट्रेऑन बेसाल्ट (Citroen Basalt) कार इंटेरियर

सिट्रेऑन बेसाल्ट मध्ये सहा एअर बॅग ,क्लायमेट कंट्रोल, रियर हेड रेस्ट या कॉमन सुविधासोबतच यात एक उत्कृष्ट डॅशबोर्ड लेआउट आहे. ज्यात ड्युअल डिजिटल डिस्प्ले आणि ए सी वेंट साठी एक समान डिझाईन आहे. कारमधील व्हाईट लेदरमुळे इंटेरियरचा लूक अजून शानदार दिसून येतो.

सिट्रेऑन बेसाल्ट (Citroen Basalt) इंजिन व पावर

सिट्रेऑन बेसाल्ट कार इंजिनच्या दोन्ही मध्ये उपलब्ध असणार आहे. एक म्हणजे 1.2 लिटर नॅचरल ऍस्पिरिटेड आणि दुसरे आहे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन . 1.2 लिटर नॅचरल इंजिन ८२ पीएस पावर 115 Nm पिक tork जनरेट करते .हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स सोबत उपलब्ध असेल. तर 1.2 पेट्रोल इंजिन 110 पी एस पावर आणि 205 एन एम पीक tork जनरेट करते. हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल तसेच सहा स्पीड ऑटोमॅटिकशी जोडलेले असणार आहे.

बेसाल्ट कार मायलेज

बेसाल्ट कार पेट्रोल साठी 18 किलोमीटर प्रति लिटर ,टर्बो एम टी साठी 19.5 किलोमीटर प्रति लिटर, तर टर्बो एल टी साठी 18.7 किलोमीटर प्रतिलिटर इतके मायलेज देईल.

सिट्रेऑन बेसाल्ट किंमतCitroen Basalt Price

सिट्रेऑन बेसाल्ट या कारची किंमत साधारणपणे नऊ ते दहा लाखांच्या आसपास असणार आहे.

Leave a Reply