बेळगावच्या एकाला अटक, कळंगुट बीचवर बोट बुडाली

Belgaum Belgavkar
3 Min Read

Tourist boat capsizes off Calangute beach in North Goa

1 dead, 20 rescued after tourist boat capsizes off Calangute beach in Goa

  • एकाचा मृत्यू, 20 जणांना वाचवण्यात यश आले
  • Calangute beach in Goa
  • Sports water boat capsizes off Goa’s Calangute beach
  • वॉटर स्पोर्ट्स बोट कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बुडाली

 

गोवा : ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त गोव्याला पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले पाहायला मिळत आहेत. अशातच, गोव्यातील कळंगुट बीचवर (Calangute beach in Goa) पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंगुट समुद्रात गुरुवारी झालेल्या बोट अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोट चालक धारेप्पा झिराली (वय 42, रा. मूळ बेळगाव) आणि इब्राहीमसाब (वय 34, रा. मूळे शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली आहे.

बोट मालक मीना कुतिन्हो हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, बंदर कॅप्टन खात्याने या बोटीचा परवाना रद्द केला आहे. कळंगुट समुद्र किनाऱ्यावर बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वॉटर स्पोर्टस करण्यासाठी पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली बोट उलटली. यात खेड रत्नागिरी येथील सूर्यकांत पोफळकर (45) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पाच वर्षीय मुलासह 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील खेड येथील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर कुटुंबांमधील 13 जण गोव्यात आले होते. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बोट बूक करून जलसफरीला गेले होते. अवघ्या 60 मीटरच्या अंतरावर ही बोट वाळूत रुतून पडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, सुदैवाने 20 जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे. या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पर्यटकांमध्ये 5 वर्षांच्या लहान मुलासह महिलांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक सोडून इतर सर्वांनी लाईफ जॅकेट घातले होते.

- Advertisement -

 

सरकारने नियुक्त केलेल्या लाइफसेव्हिंग एजन्सी दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोट किनाऱ्यापासून सुमारे 60 मीटरवर उलटली. प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील खेड येथील 13 जणांच्या कुटुंबाचाही समावेश होता. अपघातातील जखमींनावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमध्ये सहा आणि सात वर्षांची दोन मुले आणि 25 आणि 55 वर्षांच्या दोन महिलांचा समावेश आहे.

आठवडाभरापूर्वी मुंबईत एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. 100 हून अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटला नौदलाची बोट धडकली, ज्यामुळे हा अपघात झाला. त्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

#Calangute #Goa #TouristAccident #WaterSports #BoatCapsize #GoaTourism #BeachSafety #RescueOperation #LifeJacket #TravelGoa #GoaBeaches #TouristSafety #GoaNews #AccidentReport #FamilyTrip #WaterAdventure #GoaLife #BeachAccident #EmergencyResponse #GoaTravel

 

Tourist boat capsizes Calangute beach Goa
Tourist boat capsizes Calangute beach Goa

Tourist boat capsizes Calangute beach Goa

Tourist boat capsizes Calangute beach Goa

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *