TOP SELLING ELECTRIC CAR – भारतीय बाजारात सध्या डीझेल कार जवळ जवळ नामशेष झाल्या आहेत. शासकीय नियमानुसार आता भारतात पेट्रोल कारच बनविल्या जातात. त्यातच सर्व कार आता सी.एन.जी (CNG) मध्ये येतात. सी.एन.जी. गाडी म्हणजे गरीबाची गाडी ओळखली जायची परंतु आता महागड्या गाड्या मधेही सी.एन.जी. व्हेरीएंट मिळायला लागले आहे. टाटा कंपनी सध्या सी.एन.जी. गाड्या मध्ये एक नंबर ला आहे. टाटा गाडी मध्ये सी.एन.जी. असूनही बूट स्पेस भरपूर मिळतो आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग सध्या सर्व टाटा च्या गाड्यांमध्ये मिळत असल्यामुळे. टाटा कार ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे.
ज्या प्रमाणे टाटा च्या गाड्या सी.एन.जी. मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मध्ये येतात त्याचप्रमाणे आता इलेक्ट्रिक गाड्या (ELECTRIC CARS) हि त्याच सेफ्टी फीचर्स सहित भेटत आहेत आणि टाटा ( TATA MOTORS) च्या सर्व इलेक्ट्रिक गाडीमध्ये रेंज हि खूप चांगली मिळते. आज आपण भारतातील जास्त विकणार्या इलेक्ट्रिक गाड्यांची (TOP SELLING ELECTRIC CAR ) लिस्ट पाहणार आहोत, त्यामध्ये ३ कार टाटा कंपनीच्या च आहेत.
टाटा पंच इ.व्ही. ( TATA PUNCH EV)
टाटा पंच पेट्रोल आणि सी.एन.जी. कार ने तर भारतात मारुती सुझुकी कंपनीची हवा टाईट केली आहे. टाटा पंच हि गाडी मिनी एस.यु.व्ही. म्हणून ओळखले जाते. सध्या हि गाडी इलेक्ट्रिक मध्ये हि मिळत आहे. पेट्रोल पेक्षा इलेक्ट्रिक गाडी मध्ये भरभरून फीचर्स दिले आहेत. टाटा पंच इलेक्ट्रिक गाडीची एक्स शोरूम किंमत १०.९९ लाखापासून सुरु होते आणि टोप मोडेल १५.४९ लाखाला मिळते. हि गाडी टाटा कंपनीच्या च्या रेकोर्ड नुसार बेटरी फुल चार्ज करून ३२२ किमी ते ३९० किमी पर्यंत रेंज देते.
Pros | Cons |
१. सेफ्टी फीचर्स भरभरून आहेत. २. काही सुविधा महागड्या गाडी मध्ये येतात ते दिले आहेत. ३. गाडी घेताना बेटरी कोणती घ्यायची हा पर्याय उपलब्ध आहे. ४. फास्ट चार्जिंग सुविधा आहे. | १. टाटा कंपनीच्या नेक्सोन मोडेल एवढी किंमत२. टोप मोडेल खूप महाग भेटते. |
टाटा नेक्सोन इ.व्ही. ( TATA NEXON EV )
टाटा नेक्सोन हि गाडी हि आधी पेट्रोल आणि सी.एन.जी. मध्ये आव्हायलेबल आहे. टाटा नेक्सोन इलेक्ट्रिक मधील मोडेल ची एक्स शोरूम किंमत सरासरी १४.४९ लाख ते १९.४९ लाखांपर्यंत आहे. या गाडी ची रेंज हि मोडेल नुसार बेटरी फुल चार्ज करून ३२५ किमी ते ४६५ किमी पर्यंत रेंज देते.
Pros | Cons |
१. पेट्रोल कार पेक्षा इलेक्ट्रिक कार खूप स्वस्त पडते. २. आतून आणि बाहेरून पूर्ण गाडी प्रीमिअम दिसते. ३. पेट्रोल गाडीपेक्षा इलेक्ट्रिक गाडीमध्ये फीचर्स खूप आहेत. ४. हि गाडी ८ते ९ सेकंद मध्ये झिरो पासून १०० किमी पर्यंत जाते. | १. मोडेल मध्ये जास्त काही बदल केलेले नाहीत. |
टाटा टीयागो इ.व्ही. ( TATA TIAGO EV )
टाटा टीयागो इ.व्ही. हि इलेक्ट्रिक गाडी बेटरी रेंज नुसार ७ व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. आणि बेटरी रेंज नुसार व्हेरीएंट ची किंमत रु. ७.९९ लाखांपासून सुरु होऊन रु. ११.८९ लाखांपर्यंत आहे. हि गाडी हचबेक असल्यामुळे लहान असल्यामुळे बेटरी रेंज कमी आहे. या गाडीमध्ये बेटरी फुल चार्ज झाल्यावर गाडीची रेंज २५० किमी ते ३१५ किमी पर्यंत मिळते. या गाडीमध्ये २४० लिटर बूट स्पेस सहित २४ के.डब्लू.एच ची बेटरी देण्यात आली आहे. हि गाडी व्हाईट कलर सहित अजून चार कलर मध्ये आव्हायलेबल आहे.
Pros | Cons |
१. हि गाडी इलेक्ट्रिक मध्ये सर्वात परवडणारी गाडी आहे. २. १९.२ आणि २४ के डब्लू एच अश्या दोन पर्याय उपलब्ध आहेत. | १. या हि गाडीचे टोप मोडेल खूप महाग येते. २. अजून भारतात चार्जिंग स्टेशन जास्त उपलब्ध नाहीत. |
एम.जी. कोमेट इ.व्ही. ( MG COMET EV )
एम.जी. कोमेट इ.व्ही. हि गाडी अगदी छोटी आहे. आणि रेंजही २३० किमी पर्यंत आहे. परंतु गाडीमध्ये फीचर्स खूप आहे. आणि ट्राफिक मध्ये वापरायला हि गाडी एकदम बेस्ट आहे. या गाडीची एक्स शो रूम किंमत ६.९९ लाखापासून ९.४० लाखांपर्यंत आहे. या गाडीमध्ये सर्वात चांगले फिचर म्हणजे गाडीचा टर्निंग रेडिअस फक्त ४.२ मी. आहे. तसेच सेफ्टी फिचर मध्ये ए.बी.एस. आणि इ.बी.डी. सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. उत्कृष्ठ इंटेरिअल मुळे गाडीत बसल्यावर प्रीमिअम वाटते.
Pros | Cons |
१.हि गाडी लहान असून टर्निंग रेडिअस खूप कमी असल्यामुळे ट्राफिक मध्ये वापरायला खूप सोप्पी आहे. २. इंटेरिअल खूप प्रीमिअम फील देते. ३. २५० किमी ची रेंज खूप चांगली आहे. ४. ४ प्रवासी बसू शकतात. | १. मागील सिट फोल्ड केल्याशिवाय बूट स्पेस मिळत नाही. २. खराब रस्ते मध्ये गाडी आपटते. |
सिट्रोन इ.सी.३ ( CITRON E. C3)
सिट्रोन हि एक फ्रेंच कंपनी आहे. या कंपनी ने काही वेळातच भारतीय कार मार्केट मध्ये आपली जागा बनवली आहे. सिट्रोन कंपनीच्या पेट्रोल गाड्या सुरुवातीला लौंच केल्या. त्या नंतर आता या कंपनी ने सिट्रोन इ.सी.३ ( CITRON E. C3) हि गाडी लौंच केली आहे. २९.२ के. डब्लू. बेटरी सहित हि गाडी ३२० किमी ची रेंज प्रदान करते. कंपनीचा दावा आहे कि बेटरी ५७ मिनिटात पूर्ण चार्ज होते आणि पूर्ण चार्ज झाल्यावर गाडी ३२० किमी धावते. तसेच या बेटरी ची वारंटी ७ वर्ष किंवा १४०००० किमी आहे आणी गाडीची वारंटी ३ वर्ष किंवा १२५००० किमी आहे.
Pros | Cons |
१.प्रशस्त मोठे केबिन मिळते. | 1. गाडी चालवणे चांगले वाट्त नाही. 2.बरेच महत्वाचे फीचर्स या गाडीमध्ये मिळत नाही. |
1 thought on “भारतातील जास्त विकणारी (TOP SELLING ELECTRIC CAR ) ५ इलेक्ट्रिक कार – ३ कार तर टाटा च्याच”