Top Selling Car In India– जेव्हापासून किया (Kia), एम जी (MG), आणि सिट्रोन (Citroen) या बाहेरील कार कंपनी भारतात येऊन आपल्या गाड्या विकू लागल्यात तेव्हापासून भारतीय कंपनीच्या गाड्या हि चांगल्या फीचर्स द्यायला लागल्या आहेत. मुख्यत्वे किया या कंपनीने आपल्या गाड्या संपूर्ण फीचर्स सहित भारतात विकायला सुरुवात केली आहे तेव्हापासुन भारतीय कंपनी महिंद्रा (Mahindra & Mahindra) आणि टाटा (TATA Motors) या भारतीय कंपनीने हि कार मध्ये भरभरून फीचर्स द्यायला सुरुवात केली आहे. असूनही भारतीय कार मार्केट मध्ये सर्वात जास्त कार या आजही मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीच्या विकल्या जात आहेत.
सर्वात जास्त मारुती सुझुकी च्या गाड्या विकल्या जातात
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) गाडीमध्ये फीचर्स भरपूर असतात परंतु सेफ्टी रेटिंग च्या बाबतीत हि कंपनी बाकीच्या कार कंपनी पेक्षा खूप मागे आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या या भरपूर फीचर्स सहित गरिबांच्या खिशाला परवडेल या किमतीमध्ये भेटतात आणि या गाड्यांमध्ये सी.एन.जी. (CNG) कंपनी फिटेड असल्यामुळे गाडीचे मायलेज हि सर्वात चांगले असते. यामुळे पहिल्यापासून मारुती सुझुकी कंपनीच्या कार्स भारतात जास्त विकल्या जातात. भारतीय कार्स प्रेमींची सर्वात जास्त पहिली पसंदीची म्हणजे अल्टो (Alto) हि होती, आणि आता वेगन आर हि सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे.
टाटा (TATA Motors) कंपनीही मागे नाही
जून २०२४ मध्ये केलेल्या सर्वे नुसार सर्वात जास्त कार्स विकणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी आहे, या कंपनीचे कार्स मार्केट शेअर्स ४०.४ % आहे. दुसऱ्या क्रमांकावर हुंदाई (Hyundai) हि कंपनी असून या कंपनीचे मार्केट शेअर्स १४.८ % आहेत. तसेच तीन नंबर ला आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री. रतन टाटा यांची टाटा (Tata Motors) हि कार्स कंपनी आहे, या कंपनीचे मार्केट शेअर्स जून २०२४ च्या सर्वे नुसार १२.८ % आहेत. मोडेल नुसार सर्वात जास्त विकणारी कार टाटा पंच हि आहे. टाटा पंच (Tata Punch) या मोडेल च्या जुन २०२४ मध्ये १८२३८ गाड्या विकल्या आहेत. टाटा पंच हि गाडी सी.एन.जी. मध्ये, तसेच पेट्रोल मध्ये तसेच इलेक्ट्रिक मध्ये हि मिळते. सी.एन.जी. असूनही गाडीचा बूट स्पेस खूप मोठा मिळत असल्याने. आता कार प्रेमी टाटा पंच ला पहिली पसंती देतात. टाटा च्या सर्व गाड्या या सेफ्टी रेटिंग मध्ये ५ स्टार आहेत, त्यामुळे टाटा कंपनी मार्केट शेअर्स मध्ये एक नंबर ला यायला वेळ लागणार नाही. टाटा कंपनीची नेक्सोन हि गाडी हि सेफ्टी मध्ये चांगली आहे.
जास्त विकणार्या कार्स मध्ये मारुती च्या सर्वात जास्त गाड्या
सी.एन.जी. (CNG) आणि पेट्रोल (Petrol) मध्ये सर्वात जास्त मायलेज आणि किंमत हि परवडेल अशी असल्यामुळे भारतात सर्वात जास्त विकणार्या गाड्या लिस्ट मध्ये पहिल्या दहा मध्ये मारुती च्या ६ गाड्या येतात. दोन नंबर ला स्विफ्ट (Swift) हि गाडी आहे, या मोडेल च्या गाड्या जून २०२४ मध्ये १६४२२ विकल्या गेल्या आहेत. चार नंबर ला ७ सिटर, सी.एन.जी. गाडी म्हणजेच इर्तीगा (Ertiga) हि गाडी आहे, या मोडेल च्या जून २०२४ मध्ये एकूण १५९०२ गाड्या विकल्या आहेत. बलेनो (Baleno) हि मारुती ची गाडी कमी वेळेतच ग्राहकांची पसंती बनली, जुन २०२४ मध्ये या मोडेल च्या गाड्या १४८९५ विकल्या गेल्या. त्याचप्रमाणे वेगन आर च्या १३७९० गाड्या, डीझायर (Dezire) च्या १३४२१ गाड्या आणि ब्रीझा (Breeza) च्या १३१७२ गाड्या विकल्या गेल्या आहेत.
हुंदाई ची क्रेटा (Creta) आणि वेणू (Venue) जास्त विकल्या गेल्या
हुंदाई या कंपनीने मारुती सुझुकी च्या अल्टो ला टक्कर देण्यासाठी SANTRO हि गाडी बाजारात आणली आणि तिने अल्टो टक्कर हि दिली. परंतु हुंदाई च्या जास्त गाड्या विकल्या जात नाहीत. कारण हुंदाई च्या गाड्यामध्ये किंमतीच्या मानाने फीचर्स खूप कमी असतात. परंतु हुंदाई (Hyundai) चे क्रेटा आणि वेणू हे मोडेल भारतात खूप प्रसिद्ध झाले. क्रेटा आणि वेणू या दोन्ही गाड्या एक एस.यु.व्ही. आहेत. दोन्ही गाड्या या चांगल्या मायलेज सह डीझेल मध्ये भेटतात. तसेच लूक मध्ये, फीचर्स मध्ये हि क्रेटा गाडीला तोड नाही. यावर्षी जुन २०२४ मध्ये क्रेटा च्या १६२९३ गाड्या आणि वेणू च्या ९८९० गाड्या भारतात विकल्या गेल्या आहेत.
किया च्या सेल्तोस आणि सोनट मधेही भरभरून फीचर्स
किया कंपनी अजून भारतात नवीन आहे. त्यामुळे किया च्या जास्त गाड्या भारतात विकल्या गेल्या नाहीत, परंतु सेल्तोस (Seltos) आणि सोनट (Sonat) हे दोन मोडेल मध्ये कंपनीने भरभरून फीचर्स दिले आहेत. तसेच या गाड्यांचे सेफ्टी रेटिंग हि चांगले आहे. लूक वाईज तर या गाड्यांना नाव ठेवायला जागाच नाही. डीझेल मध्ये मायलेज हि परवणारे आहे. यामुळेच ग्राहक या गाड्या डोळे झाकून घेत आहेत. मागच्या महिन्यात म्हणजेच जून २०२४ मध्ये सोनेट च्या ९८१६ आणि सेल्तोस च्या ६३०६ गाड्या भारतात विकल्या गेल्या आहेत.