महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक तीन लाखाची मदत – Mahavikas Aghadi  चा जाहीरनामा

By Admin

Published on:

Mahavikas Aghadi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavikas Aghadi : याधीच भाजप शिवसेना युतीने महिलांना लाडकी बहीण अंतर्गत 1500 रुपये महीना देऊन महिलांची मते आपल्या बाजूने फिरवायचा प्रयत्न केला आहे. आणि आता आजच महाविकास आघाडीने प्रत्येक कुटुंबाला अंदाजे वार्षिक 300000 रुपये मिळणार असे जाहीर केले आहे, तसेच आम्ही महिलांना दरमहा ३००० रुपये, बेरोजगार तरुणांना ४००० रुपये दरमहा देण्याचे जाहीर केले. आजच महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला 100 दिवसांचा अजेंडा जाहीर केला.

पाच हमी मार्फत प्रत्येकी ३००००० रु. ची मदत

मुंबई मध्ये झालेल्या Mahavikas Aghadi  च्या पत्रकार परिषदेला कॉँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खळगे, राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार नाना पाटोले, उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत उपस्थित राहिले होते. या पत्रकार परिषदेत कॉँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खळगे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपले पाच हमी जाहीर केल्या. या पाच  हमी नुसार सर्व मिळून एका कुटुंबाला अंदाजे 300000 रुपयाची मदत होणार आहे असे सांगितले. या पांच हमी म्हणजे महालक्ष्मी योजना, कौटुंबिक संरक्षण, कृषि समृद्धी, तरुणांना वचन आणि समानतेची गॅरंटी.

Mahavikas Aghadi  च्या पाच हमी सविस्तर

  1. महालक्ष्मी योजना – महालक्ष्मी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या खातेवर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये जमा होणार, तसेच पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महिलांना बसने मोफत प्रवास उपलब्ध करणार.
  2. कृषि समृद्धी योजना – शेतकरी उन्नती साठी सरसकट सर्व शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत कृषि कर्ज माफ करणार आणि ज्यांनी कृषि कर्जाची वेळेत परतफेड केली आहे त्यांना ५०००० रुपये प्रोत्साहन पर मदत देणार.
  3. तरुणांना वचन – महाराष्ट्रातील पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना महिन्याला ४००० रुपये देण्याचे आश्वासन.
  4. कौटुंबिक संरक्षण – प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यन्त आरोग्य विम्याचे आश्वासन आणि सर्वांना मोफत औषधे पुरविणार.
  5. समानतेची गॅरंटी – समानतेची गॅरंटी देणार आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा बंद करून जातिनिहाय जनगणना करणार.

Mahavikas Aghadi  चा १०० दिवसाचा अजेंडा

कॉँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खळगे असेही म्हणाले की, याव्यतिरिक्त महिलांना एका वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत देणार आणि त्यावयातीरिक्त प्रत्येक सिलिंडर साठी  फक्त ५०० रुपये द्यावे लागणार. Mahavikas Aghadi  निवडून आल्यास सध्याची निवडणूक ही महाराष्ट्राचे भविष्य बदलून टाकेल आणि हा आमचा अजेंडा १०० दिवसांचा आहे. असेही ते म्हणाले.  

1 thought on “महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक तीन लाखाची मदत – Mahavikas Aghadi  चा जाहीरनामा”

Leave a Reply