Xiaomi Mix Flip Price Leacked: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Xiaomi ने मागच्या महिन्यात चीनमध्ये Mix Fold आणि Mix Flip स्मार्टफोन्स लाँच केले. तसेच Mix Flip हा Xiaomi कंपनी चा पहिला फ्लिप फोन आहे, जो आता भारतीय बाजारात लवकरच लाँच होईल अशी अपेक्षा आहे. हा फोन Samsung Galaxy Z Flip 6, Oppo Find N3, Motorola Razr 40 इत्यादी फ्लिप फोन्सशी स्पर्धा करेल.तसेच Xiaomi च्या या पहिल्या फ्लिप फोनच्या वैशिष्ट्यांची आणि तपशीलांची माहिती उपलब्ध आहे, आलेल्या आहेत ज्यामुळे वापरकर्त्यांना या नवीन Flip स्मार्टफोन चि सर्व आकर्षक फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळते तसेच नुकतीच या स्मार्टफोन च्या जागतिक किमती समोर आलेल्या आहेत चला तर मग या किमती तसेच फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊयात.
Xiaomi MIX Flip ची जागतिक किंमत आणि लाँचची लिक झालेली माहिती
Xiaomi MIX Flip हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच झालेला आहे आणि भारतासह इतर जागतिक बाजारपेठांमध्ये देखील येण्याची अपेक्षा आहे. कंपनीने जागतिक लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, पण Xiaomi MIX Flip च्या जागतिक किंमतींच्या किमतीची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. तसेच चीनमध्ये या फ्लिप फोनची किंमत जास्त होती, तसेच जागतिक बाजारात असणारी किंमत आत्ता समोर आलेली आहे.
तसेच भारतामध्ये या फोनच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण किंमती समान असण्याची शक्यता आहे. Xiaomi MIX Flip 12GB+512GB स्टोरेज वेरिएंट आणि ब्लॅक रंगात जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असेल, तसेच या स्मार्टफोन च्या लीक झालेली किमती खाली दिलेल्या आहेत
- युरोप: EUR 1,299 (सुमारे ₹1,20,560)
- फिलिपिन्स: PHP 64,999 (सुमारे ₹96,215)
- मलेशिया: MYR 4,300 (सुमारे ₹82,537)
Xiaomi MIX Flip मधील specifications
Specification | Details |
---|---|
Internal Display | 6.86-inch 1.5K TCL C8+ LTPO, 120Hz refresh rate |
Outer Display | 4-inch 1.5K TCL C8+, 120Hz refresh rate, 3000 nits peak brightness |
Processor | Qualcomm Snapdragon 8 Gen 3 |
Operating System | Xiaomi HyperOS based on Android 14 |
Rear Cameras | Dual setup: 50MP +50MP |
Front Camera | 32MP |
Battery | 4780mAh |
Charging | 67W wired fast charging |
- Xiaomi MIX Flip Display :
Mix Flip या स्मार्टफोन मध्ये एक लेटेस्ट 6.86-इंचाचा 1.5K TCL C8+ LTPO इंटरनल डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले स्पष्ट रंग, चांगला ब्राइटनेस आणि स्मूथ स्क्रोलिंगसाठी उपयुक्त आहे.तसेच या फोनमध्ये एक 4-इंचाचा 1.5K TCL C8+ बाहेरच्या बाजूला डिस्प्ले देखील आहे, ज्यामध्ये 3000 निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस आहे, त्यामुळे बाह्य डिस्प्लेला अत्यंत स्पष्टता मिळते. - Xiaomi MIX Flip Processor:
Mix Flip मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे, जो स्मार्टफोनच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. हा प्रोसेसर Samsung Galaxy Z Fold 6, Galaxy Z Flip 6, Vivo X Fold 3 Pro, Xiaomi 14 Ultra आणि Xiaomi 14 यांसारख्या इतर फोन्समध्ये देखील वापरला जातो, ज्यामुळे Mix Flip ला एक चांगले कार्यप्रदर्शन प्राप्त होते. - Xiaomi MIX Flip OS:
Mix Flip हा Xiaomi HyperOS वर आधारित Android 14 सॉफ्टवेअरवर कार्यरत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोनला लेटेस्ट आणि आधुनिक इंटरफेस, फिचर्स आणि कार्यक्षमतादेते, जी वापरकर्त्याच्या एक चांगला अनुभव देते. - MIX Flip Camera:
Xiaomi Mix Flip मध्ये डबल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये एक 50MP Light Fusion 800 मैन सेन्सर आहे,आणि दुसरा 50MP OmniVision OV60A40 सेन्सर टेलिफोटो लेन्ससह दिलेला आहे. या सेटअपमुळे उच्च गुणवत्ता आणि वेगवेगळ्या फोटोग्राफी साठी उपयोगी आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या स्मार्टफोनच्या समोर 32MP कॅमेरा आहे.ज्यामुळे सेल्फी फोटोस चांगले येतात तसेच याद्वारे विडिओ कॉल वर देखील चांगल्या प्रकारे दृश्य दिसतात. - Xiaomi MIX Flip Battery
Xiaomi Mix Flip मध्ये 4780mAh बॅटरी आहे, जी दीर्घकालीन वापरासाठी आहे. याशिवाय, या स्मार्टफोन मध्ये 67W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे , ज्यामुळे बॅटरी झपाट्याने चार्ज होते आणि वापरकर्त्याला कमी वेळात जास्त वापराची सुविधा मिळते.
FAQ
Xiaomi MIX Flip भारतात उपलब्ध आहे का?
Xiaomi MIX Flip भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे, परंतु लाँच तारीख आणि उपलब्धतेसंबंधी अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
Xiaomi MIX Flip मध्ये कोणता प्रोसेसर असणार आहे?
Xiaomi MIX Flip मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असणार आहे.