मोबाईलच्या दुनियेत येणार नवी क्रांती, 2025 मध्ये samsung चा येणार Rollable स्क्रीनचा मोबाईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Elec च्या म्हणण्यानुसार, samsung रोल करण्या योग्य मोबाईल विकसित करत आहे. या मोबाईलची स्क्रीन 12.4 इंच असेल. ही स्क्रीन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर फोल्ड करता येणाऱ्या मोबाईल पेक्षा मोठी असेल. या मोबाईलमध्ये 10.2 इंचाच्या डिस्प्लेसह तिहेरी फोल्डिंग Huwaie Mate XT समाविष्ट आहे. शिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन समोर एक अंडर-डिस्प्ले कॅमेरा देखील असेल.

आधी फक्त एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी तयार केलेला मोबाईल फोन जसा वेळ पुढे जाईल तसा तो सुधारत गेला. त्यात नवीन नवीन सुधारणा होत गेल्या आणि आता मोबाईल म्हणजे नुसते संपर्क साधण्याचे यंत्र न राहता मोबाईलच्या रुपात आपल्या तळ हातावर संपूर्ण विश्वच आले आहे. अगदी बँक व्यवहारापासून ते खरेदी करण्यापर्यंत सगळ्या गोष्ट आपण आजकाल मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो. मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या देखील दर दोन-सहा महिन्यांनी त्यांच्या मोबाईलच्या नवनवीन सुधारित आवृत्ती आणत आहेत. त्यातच samsung ही एक आखडीची मोबाईल कंपनी असून ती आता 2025 मध्ये घेऊन येणार आहे. मोठी स्क्रीन असलेला रोल करण्या योग्य मोबाईल फोन!

असा मोठी स्क्रीन असलेला आणि रोल करून ठेवता येणारा मोबाईल बाजारात आला तर तो नक्कीच धुमाकूळ घालणार आहे. कारण अजून तरी कोणत्याही कंपनीने अशा प्रकारचा मोबाईल फोन तयार करण्याचा विचार केला नाही.


Samsung rollable phone

कशी असेल मोबाईलची टेक्नॉलॉजी?

Samsung कडे रोल करण्या योग्य OLED स्क्रीन आहे, ज्याला Rollable Flex म्हणून ओळखले जाते. जे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर मोबाईलसाठी वापरली जाते. वास्तविक त्यांचा रोलआप व्यास अजून आपल्याला समजलेला नसला तरी OLED पॅनल मोठ्या प्रमाणात लहान जागेत गुंडाळले जाऊ शकते. तरी डिस्प्ले 49 mm ते 254.4mm इतक्या आकारात वाढला जाऊ शकतो.

हे हि वाचा -  जागर देवीचा: नवरात्रीचे नऊ रंग, मुहूर्त आणि माहिती 2024 :Navratri Colours, Information 2024

Samsung rollable phone कधी होणार लॉन्च?

असे म्हणले जात आहे की 2025 मध्ये वर्षाचा मध्यापर्यंत म्हणजे जून किंवा जुलै मध्ये हा फोन बाजारात येऊ शकतो. त्यामुळे रोलेबल मोबाईल मार्केटमध्ये आणणारी samsung ही पहिली कंपनी बनू शकते. या आधी फोल्ड फोन, फ्लिप फोन जवळजवळ सर्वच कंपनीचे बाजारात लॉंच झाले आहेत. परंतु रोलिंग फोन हा पहिलाच असणार आहे.

या आधी ही आपण rollable मोबाईलबद्दल ऐकले आहे.

रोलेबल मोबाईलबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी आपण बऱ्याच वेळा याबद्दल काही कंपन्यांकडून ऐकले आहे. LG, TECNO आणि OPPO या कंपन्यांनी रोलेबल मोबाईल दाखवले आहेत. 2021 मध्ये OPPO कंपनीने त्यांचा रोल करण्या योग्य प्रोटोटाईप प्रदर्शित केला आहे. तर TECNO या कंपनीने 2023मध्ये तो प्रदर्शित केला होता. तसेच LG कंपनीने ही घोषणा केली होती की ते रोलेबल मोबाईल लॉन्च करतील परंतु LG 2021 मध्ये स्मार्टफोन उद्योगातून बाहेर पडली. त्यामुळे आपल्याला असा रोलेबल मोबाईल मार्केटमध्ये येण्याची वाट पहावी लागली. पण लवकरच ही प्रतीक्षा संपणार आहे आणि आपल्याला असा रोलेबल मोबाईल पुढच्या वर्षी प्रत्येक्षात मार्केटमध्ये आलेला दिसेल.

Samsung मोबाईल कंपनी rollable mobile मार्केटमध्ये आणणारी पहिली कंपनी ठरेल, वर म्हणल्या प्रमाणे बऱ्याच कंपन्यांनी असा रोलेबल मोबाईल प्रत्यक्ष बाजारात आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही कारणाने कोणत्याही कंपनीला त्यात यश मिळालेले नाही. पण Samsung ही असा rollable मोबाईल प्रत्यक्ष मार्केटमध्ये घेऊन येणारी आणि विकणारी पहिली कंपनी ठरणार आहे. त्यामुळे 2025 मध्ये या नवीन टेक्नॉलॉजी असणाऱ्या मोबाईलची वाट लोक आतुरतेने पाहत आहेत.

या मोबाईलची किती असू शकते किंमत?

Samsung rollable मोबाईलची किंमत साधारपणे दोन ते तीन लाखाच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हा मोबाईल फोन प्रत्यक्ष 2025 मध्ये बाजारात आल्यावरच आपल्याला त्याची खरी किंमत कळणार आहे.

हे हि वाचा -  Infinix Zero 40 5G या स्मार्टफोन च्या लाँच पूर्वी झाली याची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन लीक, बघा सविस्तर

Samsung जर प्रत्यक्षात 2025 मध्ये असा rollable मोबाईल फोन मार्केटमध्ये आणण्यात यशस्वी झाली तर मात्र मोबाईल फोनच्या दुनियेत एक नवीन क्रांती येऊ शकते. जर असा मोबाईल मार्केटमध्ये आला तर टॅबसारख्या डिव्हाईसच्या खरेदीवर आणि वापरावर नक्कीच परिमाण होऊ शकतो. असे मोठ्या स्क्रीनचे तीन वेळा दुमडून हाताळतला येणारे मोबाईल आले तर लोकांमध्ये टॅब आणि लॅपटॉप वापरण्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. कारण असे मोबाईल फोन हाताळायला आणि कुठेही घेऊन जायला नक्कीच टॅब आणि लॅपटॉप पेक्षा सोपे असणार आहेत. त्यातून मोठ्या स्क्रीनची सुविधा मिळत असल्याने त्यावर काम करणे देखील सोपे होणार आहे.

आपल्याला ही मोबाईलच्या दुनियेतील क्रांती अनुभवायला 2025 च्या मध्याची वाट पहावी लागणार आहे. पण जेंव्हा हा मोबाईल लॉन्च होईल तेंव्हा नक्कीच मोबाईलच्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे हे मात्र नक्की  


FAQ

  1. Is Samsung making a rollable phone?

    Yes, the rollable mobile of this company will come in 2025

  2. What is the price of samsung rollable phonein 2025 ?

    2.5 lakhs is going to be the price going forward

  3. How flexible is the Samsung rollable phone going to be?

    The Samsung rollable phone is going to be so flexible that it can be wrapped around your wrist

1 thought on “मोबाईलच्या दुनियेत येणार नवी क्रांती, 2025 मध्ये samsung चा येणार Rollable स्क्रीनचा मोबाईल”

Leave a Reply