Phullwanti Marathi Movie: आजकाल मराठीमध्ये एक से बढकर एक चित्रपट येत आहेत. त्यातल्याच एका उत्कृष्ट चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला आहे. प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या अभिनयाने नटलेला आणि पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या अजरामर कादंबरीवर आधारित असलेला ‛फुलवंती’ हा चित्रपट लवकर आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत आणि काय आहे या चित्रपटाची रिलज डेट? या प्रश्नांची उत्तरे आपला या लेखात वाचायला मिळणार आहेत.
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या फुलवंती या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 11 ऑक्टोबर पासून Phullwanti हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी Phullwanti या चित्रपटाची स्टार कास्ट समोर आली आहे आणि त्यात आपल्याला बरेच ओळखीचे चेहरे पाहायला मिळतात. आता Phullwanti या चित्रपटाचा ट्रेलर लॉंज झाला असून प्राजक्ता माळीने तिच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. काही मिनिटात हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत आहेत.
कसा आहे Phullwanti ट्रेलरमध्ये
आपल्याला ट्रेलरच्या सुरुवातीलाच प्राजक्ता माळी जी Phullwanti ची भूमिका साकारणार आहे ती पायात घुंगरू बांधताना दिसते. तिचा नाच पाहण्यासाठी राजे महाराजे रांगा लावतात पण ती बाई कोणाच्या हाताला लागत नाही असे प्रसाद ओक बोलताना दिसतो तर बाईने नुसता कमरेला झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा थरारतो, नाच गाण्यावर आणि ताला सुरावर तिची पक्की हुकूमत आहे असे डायलॉक आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या फुलाने आख्या हिंदुस्तान गाजवला आता पुण्याला नादावनार आपली फुला असे ही संवाद आपल्याला ऐकायला मिळतात.
तर पुण्यात शाही मेन्यातुन जात असताना फुलवंती ची पालखी थांबवली जाते. तेंव्हा फुलवंती म्हणते की कुठल्या तरी साध्या पालखीसाठी माझा शाही मेना थांबवला? असं ती रागाने विचारते तेंव्हा वेदांतसूर्य व्यंकटधरी नरसिंह शास्त्री आहेत ते असं कोणी तरी म्हणते आणि ती मेण्यातून डोकावून त्यांना बघते. नरसिंह शास्त्री म्हणजे गश्मीर महाजनी आहे.
आणि पुढे फुलवंती नरसिंह शास्त्रीनी तिचे नृत्य पाहावे म्हणून धडपडते तेंव्हा तिला सांगितलं जातं की ते तुमचे नृत्य पाहणार नाहीत तेंव्हा फुलवंती जे डायलॉग बोलते ते काळजात घर करतात. नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला! प्रश्न नजरेचा आहे आणि ती साफ असेल तर फुलवंती पण तुम्हाला दुर्गाच दिसेल. असा हा ट्रेलर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे. ट्रेलरमध्ये दिसणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप आकर्षक आहे. त्यातली कलाकारांची वेशभूषा आणि बोलण्याचा लेहजा उत्तम आहे.
Phullwanti Star cast
- प्राजक्ता माळी (Prajakta Mali)
- गश्मीर महाजनी ( Gashmeer Mahajani)
- प्रसाद ओक (Prasad Oak)
- वनिता खरात (vanita Kharat)
- चेतन भट्ट (Chaitanya Bhatt)
- स्नेहल तरडे (Snehal Tarde)
अशा कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्यांचे लुक्स लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाहीत. स्नेहल तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले असून त्यांनी या चित्रपटात काम देखील केलं आहे असं दिसून येत आहे. चित्रपट पेशवेकालीन असून एक सिद्धहस्त लेखकाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात हस्यजत्राचे बरेच कलाकार दिसत आहेत. चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता माळी प्रोडक्शन हाऊस मार्फद झाली आहे तर मंगेश पवार अँड कंपनी आणि सोहम ss क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती आहे.
गश्मीर महाजनी पहिल्यांदाच ऐकतिहासिक लूक आणि भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. तसेच नृत्यांगणेची भूमिका साकारत असताना प्राजक्ता माळीने डान्स करण्यासाठी घेतलेली मेहनत तिच्या त्या अदा प्रथमदर्शनीच आपले लक्ष वेधून घेतात.
एकूण चित्रपटाचा ट्रेलर पाहून असे दिसतेय की एक कलावंतबाई फुलवंती आणि एक ज्ञानी आणि विद्यावंत पुरुष नरसिंह शास्त्री यांची प्रेमकथे वर आधारित हा चित्रपट असावा. ट्रेलरमध्येच फुलवंतीची नरसिंह शास्त्रीनी तिचा नाच पहावा म्हणून केलेली धडपड आपले लक्ष वेधून घेते. पेशवे काळातील ही कथा असून नरसिंह शास्त्री हे पेशव्यांचे पंडित आहेत आणि फुलवंती एक नृत्यांगना!
फुलवंती टायटल सॉंग ही रिलीज झाले आहे
या चित्रपटाचे टायटल सॉंग ‛ पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी! फुलवंती मी’ हे गाणे देखील रिलीज झाले असून भव्य सेट आणि प्राजक्ता माळी हिचे नृत्य अतिशय उत्तम आहे. गाणे आर्या आंबेकरने गायले असून खूपच सुरेल आहे.
फुलवंती कधी होणार रिलीज?
11 अक्टोंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ता माळीचा दिलखेचक नाच आणि अदा! गश्मीर महाजनी यांचा देखणा लूक आणि एक्टिग आणि त्यांच्या साथीला असणारे बाकी कलाकार पडद्यावर आता काय कमाल करणार आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला 11 आक्टोंबरची वाट पहावी लागेल.