या गुंतवणुकीत फिक्स deposit, जागा/ घर, शेअर्स, म्युच्युअल फंड असे अनेक प्रकार येतात. यात एक पर्याय असतो तो म्हणजे सोन्यातील गुंतवणूक. अगदी पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेनुसार सोन्याचे दागिने किंवा सोन्याची बिस्किटे (GOLD) , कॉइन्स घेऊन ठेवली जातात आणि अडीअडचणीला वापरली जातात.
आपण कष्टाने कमावलेले पैसे कुठे ना कुठे गुंतवत असतो. भविष्यात येणाऱ्या खर्चाचा विचार करून आधीपासूनच त्याची तरतूद केली जाते. लग्नसाठीचे खर्च, घर घेण्यासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने थोडीफार गुंतवणूक करत असतो.
कमी जोखमीची गुंतवणूक म्हणजे सोन्यातील गुंतवणूक मानली जाते. आपल्या भारतीय परंपरेनुसार पाडवा, दसरा अश्या काही शुभ मुहूर्तावर GOLD खरेदी करण्याची प्रथा आहेच. ही सोन्यात केलेली गुंतवणूक अनेक प्रसंगी कामी आलेल्याचे अनुभवही आपण ऐकून असतो.
Why invest in gold ?
- सोन्यात केलेली गुंतवणूक ही रिस्क फ्री म्हणजेच यात धोका नसतो.
- दागिने घेतले असतील तर ते सण समारंभात मिरवता तर येतातच पण अडी अडचणीच्या वेळी तेच गहाण ठेवून किंवा विकून ती वेळ निभावून नेता येते.
- गुंतवणूक म्हणून घेतले गेलेले सोने सर्वत्र स्वीकारले जाते म्हणूनच त्याचे रूपांतरण सहज शक्य आहे.
- आपल्या भारतीय संस्कृती नुसार सोने ही एक भावनिक आणि सांस्कृतिक गुंतवणूक आहे.
- अनेक मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा ठेवतात जो आर्थिक अस्थिरतेच्या वेळी काढला जातो.
How to invest in gold?
भौतिक स्वरूप:-
म्हणजेच पारंपरिक पद्धतीने जी नाणी, दागिने, विटा खरेदी केल्या जातात त्या पद्धतीला भौतिक स्वरूप म्हणले जाते. यात थेट भौतिक वस्तूची मालकी मिळते. हे वैयक्तिकरीत्या किंवा बँकेच्या locker मध्ये सुरक्षित ठेवता येते.
गोल्ड ई टी एफ:-
यात सोन्याची मालकी असल्याची कागदपत्रे दिली जातात. याची मालकी डी मॅट खात्यात युनिट्स स्वरूपात असते. यात सोने ठेवण्यासाठी कोणत्याही भौतिक साधनाची गरज नसते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे कागदपत्रे जतन केले जातात.
गोल्ड funds:-
यात सोन्याची मालकी सोन्याच्या खाण कामात असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स मधील गुंतवणुकीवर असते. या स्वरूपाच्या सोन्याची मालकी म्युचुअल फंड किंवा स्टॉक्स स्वरूपात मिळते. या प्रकारच्या सोन्याच्या गुंतवणुकीसाठी देखील भौतिक स्वरूपाची गरज नसते. होल्डींग फंडस् स्वरूपात हे जतन केले जातात.
How is investing in gold beneficial ?
अचानक आलेले आर्थिक संकट निभावून नेण्यासाठी सोने वापरणे ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. सोने तारण कर्ज घेऊन ती वेळ निभावून नेता येते.
आता आधुनिक काळात गोल्ड ई टी एफ आणि गोल्ड फंडस् घेतले जातात. या पर्यायामुळे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि इतर परिस्थिती पाहता सोन्याचे दर वाढू शकतात. फेड्रल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकते अश्या शक्यतेमुळे २०२५ पर्यंत सोन्या – चांदीचे भाव वाढू शकतात. अश्या स्थितीत गोल्ड फंडस् आणि ई टी एफ फायदेशीर ठरू शकते.
What are the benefits of Gold ETF ?
१. कमी प्रमाणात गुंतवणूक:-
या पद्धतीत सोने युनिट्स मध्ये खरेदी केले जाते. एक युनिट १ ग्रॅमचे असते. म्हणजेच यातही SIP म्हणजेच Systematic Investment Plan पद्धतीने जमेल तसे युनिट्स घेऊन ठेवता येऊ शकतात. तर भौतिक सोने म्हणजेच दागिने, नाणी इत्यादी गोष्टी तोळ्यात खरेदी – विक्री होतात. खूप कमी ग्रॅमचे सोने घेणे काहीवेळा शक्य होत नाही म्हणून हा पर्याय उत्तम ठरतो.
२. सोन्याची शुद्धता:-
ई टी एफ द्वारे खरेदी केलेले सोने ९९.५% शुद्धतेची हमी देते. यांची किंमत पारदर्शक आणि एक समान असते.
३. नो मेकिंग चार्जेस:-
हे सोने खरेदी करण्यासाठी फक्त आणि फक्त १% brokerage आणि १% पोर्टफोलिओ making charges लागतात. हेच दागिने घेण्यासाठी ८ ते १० टक्के घडणावळ लागू शकते.
४. सोन्याची सुरक्षितता:-
ई टी एफ हे डिजिटल पद्धतीने असल्याने चोरीची भीती नगण्य असते. हेच भौतिक सोने ठेवताना चोरीची भीती असते. ई टी एफ द्वारे खरेदी केलेले सोने साठवण्यासाठी Dmat अकाऊंट ची वार्षिक फी भरावी लागते तर भौतिक सोने बँकेच्या locker मध्ये ठेवताना तिथले चार्जेस जास्त असू शकतात.
५. सुलभता:-
हे ई टी एफ द्वारे घेतलेले सोने कधीही खरेदी – विक्री करता येते. त्याचप्रमाणे कर्ज घेण्यासाठी देखील हे तारण ठेवता येते.