बी.एम.डब्लू. ने लौंच केली अतरंगी इलेक्ट्रिक स्कूटर किंमत ऐकून डोक फिरेल – The most expensive scooter of BMW company

By Admin

Published on:

BMW SCOOTER
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The most expensive scooter of BMW company – सध्या बाजारात पेट्रोल डीझेल हे खूप महाग होत चालले आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल, डीझेल कार्स आता सामान्य माणसाला परवणारे राहिले नाही. काही मोठ्या भारतीय आणि भारताबाहेरील कंपन्या आपल्या प्रीमियम गाड्यामधेही सी.एन.जी. ऑप्शन द्यायला लागले आहेत. त्यातच आता सी.एन.जी. पेक्षाही जास्त मायलेज देणारी कार म्हणजे इलेक्ट्रिक कार्स बाजारात यायला लागल्या आहेत. कार्स तर आहेतच परंतु काही भारतीय फेमस कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्या हि बाजारात आता आपल्याला मिळतात. त्यांची रेंज हि खूप चांगली आहे. इलेक्ट्रिक गाडीला मायलेज जास्त मिळते आणि मेंटनन्स खर्चही खूप कमी असतो. त्यामुळे  टोपच्या कंपन्याही आता महागड्या आणि जास्त रेंज देणार्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बाजारात लौंच करायला लागल्या आहेत.

बी.एम.डब्लू. या कंपनीने बाजारात एक महागडी स्कूटर लौंच केली आहे – The most expensive scooter of BMW company, किंमत जास्त आहेच परंतु ती स्कूटर एकदम अतरंगी दिसते. त्याच स्कूटर बद्दल आज आपण तपशीलवार पाहणार आहोत.

कशी दिसते बी.एम.डब्लू. सी.ई ०४ हि अतरंगी स्कूटर – What does BMW look like? CE 04 is an opaque scooter

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ (BMW CE 04) या स्कूटर मध्ये सगळच एकदम वेगळ अतरंगी आहे. १५ इंच टायर सहित हि गाडी बेल्ट वर चालते म्हणजेच या स्कूटर मध्ये चैन नाही. डूयल डिस्क ब्रेक आहे. तसेच एखाद्या लक्झरी कार सारखी हि स्कूटर किलेस आहे. म्हणजे चावी खिशात असल्यावर हि बटन स्टार्ट होते हि स्कूटर. बी.एम.डब्लू. सी.ई ०४ स्कूटर मध्ये सिंगल सीट आहे परंतु सीट एवढे एखाद्या बेंच सारखे मोठे आहे की यावर तीन जन बासू शकतात. तसेच मागच्या चाकाला सिंगल सस्पेन्शन देण्यात आले आहे आणि गाडी खूपच लांब दिसते. भारतात हि पहिली स्कूटर असेल जी एवढी लाबं आहे.

The most expensive scooter of BMW company
What does BMW look like? CE 04 is an opaque scooter

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ ची किंमत किती- BMW How much does CE 04 cost?

आता बी.एम.डब्लू. ची स्कूटर (BMW CE 04) आहे म्हटल्यावर किंमत तर जास्त असणारच, परंतु या स्कूटर ची किंमत खूपच जास्त आहे. या स्कूटर चे भारतात इलेक्ट्रिक मध्ये एकच व्हेरीएंट लौंच झाले आहे त्या व्हेरीएंट ची भारतातील किंमत १४ लाख रुपये आहे. आता १३० मायलेजसाठी कोण घेणार एवढी महाग स्कूटर कुणास ठाऊक .

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ चे मायलेज – Mileage of BMW  CE 04

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ (BMW CE 04) हि एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एकदा बेटरी फुल चार्ज केल्यावर हि स्कूटर १३० किमी/बेटरी अशी मायलेज किंवा रेंज देते. या स्कूटर मधील बेटरी हि ८.५ के.डब्लू.यु.एच. क्षमतेची आहे. हि बेटरी आपण घरच्या  कोणत्याही सोकेट वर चार्ज करू शकतो. तसेच स्कूटर सोबत जो चार्जर मिळतो त्या चार्जर ने हि स्कूटर फुल चार्ज व्हायला ४ तास २० मिनिटे लागतात. जर का फास्ट चार्ज वापरायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी कंपनीला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. जर पैसे जास्त भरून तुम्ही फास्ट चार्जर घेतला तर बेटरी कमी वेळेत म्हणजेच १ तास ४० मिनिटात फुल चार्ज होते.

हे हि वाचा – TVS iQube EV – इलेक्ट्रिक (EV) मधे स्वस्त आणि ब्रांडेड स्कूटर झाली लॉन्च, किम्मत ही कमी

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ चे फीचर्स – Features of BMW CE 04

बी.एम.डब्लू. सी.ई ०४ (BMW CE 04) हि स्कूटर कंपनी क्लेम नुसार ८० मैल/बेटरी चे मायलेज देतेच. त्याचबरोबर या स्कूटर शून्य ते 30 पर्यंत जायला फक्त २.६ सेकंद लागतात. ४२ एचपी आयुटपुट असून 30 अम्पियर ची बेटरी देण्यात आली आहे. तसेच या स्कूटर चा जास्तीत जास्त वेग/तास हा १२० मिळतो . आपण याआधी फक्त प्रीमियम कार्स मध्येच मोठा डिजिटल डिस्प्ले पाहिला आहे, परंतु आता बी.एम.डब्लू. सी.ई ०४ या स्कूटर मध्ये १०.२५ इंचाचा डिजिटल डिस्प्ले मिळतो.

बी.एम.डब्लू. चे सी ४०० ( BMW C400 GT ) जी.टी. हि पेट्रोल स्कूटर हि उपलब्ध

बी.एम.डब्लू. चे ३५० सी.सी. पेट्रोल इंजिन सहित २९ किमी/लिटर चे मायलेज असलेली स्कूटर BMW C400 GT हि मार्केट मध्ये उपलब्ध आहे. याही स्कूटर चे एकाच व्हेरीएंट बाजारात उपलब्ध आहे आणि याची किंमत एक्स शोरूम रु. ११२५००० इतकी आहे. या स्कूटरचे वजन २१४ किलो असून टोप स्पीड हे १३९ किमी/तास इतके आहे. याही स्कूटर मध्ये मोठा डिस्प्ले, वायझर, मोठे टायर आणि डूअल डिस्क ब्रेक मिळतात.

Leave a Reply