भव्य श्री रामाच्या ७० फूटी मूर्तीचे अनावरण नाशकातील तपोवनात उभारली भव्य मूर्ती, Jay Shri Ram

Pratiksha Majgaonkar
5 Min Read
Shri-Ram
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jay Shri Ram Idol In Nashik:- प्रभू श्री रामांच्या (Jay Shri Ram) ७० फूट मूर्तीचे नाशिकमध्ये अनावरण करण्यात आले आहे. ही मूर्ती फायबर पॉलिमर पासून बनवली असून या मूर्तीच्या सात एकर जागेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रामायणातील दृश्य साकारून रामायणावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील नाशिकमध्ये श्री रामाची ही ७० फूट उंच मूर्ती (70 feet Shri Ram Idol in Nashik) तयार केली असून त्याचे अनावरण करण्यात आले आहे. पंचवटी परिसरातील तपोवन येथील राम शास्त्री उद्यानात या मूर्तीचे अनावरण केले गेले. ही श्री रामा ची (Shri Ram)मूर्ती महाराष्ट्रातील रामाची सर्वात उंच मूर्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मूर्तीच्या आजूबाजूच्या सात एकर परिसरात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रामायणातील दृश्य साकारली जाणार आहेत.

Shri Ram ही भव्य आणि दिव्य मूर्ती पाहण्यासाठी नाशिक शहरातील पर्यटन वाढेल. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता ही मूर्ती पाहण्यासाठी नक्कीच पर्यटन वाढणार आहे. यावर भाष्य करताना नाशिकचे आमदार राहुल धिकाळे यांनी या पर्यटनाच्या फायद्याकडे लक्ष वेधले. या मूर्तीचे अनावरण इस्कॉनचे गौरांगदास प्रभू आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोवीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मंदिराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ही मूर्ती उभारली असून आता पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. अयोध्येत Shri Ram चा जन्म झाला पण नाशिक मधील पंचवटी, तपोवन परिसरात श्री रामांनी वनवास काळात वास्तव्य केले असल्याचे मानले जाते त्यामुळे अयोध्यानंतर नाशिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या पंचवटी, तपोवन परिसरात ही भव्य ७० फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे.

- Advertisement -

हाच धागा पकडून नाशिकचे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल धिकाळे यांच्या पुढाकारातून ही धनुर्धारी श्री रामाची मूर्ती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागू होण्यामुळे ११ तारखेलाच म्हणजेच दसऱ्याच्या एक दिवस आधीच या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील ही एकमेव सर्वात मोठी मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे.



या मूर्तीच्या अनावरणासाठी शिंदे सरकारने निधी मंजूर केला. येत्या काळात हे ठिकाण पर्यटनाचे हब होणार आहे. येथील ही श्री रामाची मूर्ती ७० फूट उंच तर भगवा झेंडा १०८ फुटाचा आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, अरुण पवार, प्रियांका माने, रुची कुंभारकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आली.

सिंधुदुर्गातील मालवण येथे २६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर या श्री रामाच्या मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थैर्यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

“फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (एफआरपी) ने बनलेली ही मूर्ती आरसीसी स्ट्रक्चरवर उभारण्यात आली आहे. स्लॅब १५ फूट उंच आहे. १०८ फूट उंच ध्वज चौकीही उभारण्यात आली आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारताबाहेरील हनुमानाची भव्य मूर्ती (Lord Hanuman Idol in America)

अमेरिकेत काही दिवसापूर्वीच ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ या नावाखाली हनुमानाची मूर्ती उभारण्यात आली होती. ९० फूट उंचीची ही महाबली हनुमानाची मूर्ती लोकार्पण करून त्याचे नामानिधान स्टॅच्यू ऑफ युनियन असे करण्यात आले.

हे नाव या मूर्तीला देण्याचे कारण म्हणजे हमुनंत म्हणजे साक्षात भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. हनुमंतानेच श्री राम आणि माता सीतेला पुन्हा एकत्र आणले म्हणून या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ युनियन नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील हनुमंताची ही मूर्ती तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मूर्ती आहे. प्रथम क्रमांकावर १५१ फूटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि दुसऱ्या क्रमांकावर फ्लोरिडा मधील ११० फूटी पेगासस आणि ड्रॅगन या मूर्ती आहेत. हनुमंताची ही भव्य मूर्ती अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वर्तुळाचा एक मैलाचा दगड ठरली आहे.

नाशिक मधील Shri Ram मूर्तीच्या अनावरणामुळे होणारे फायदे

  • आधीच नाशिक हे एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची तसेच पर्यटकांची गर्दी असतेच या भव्य मूर्तीच्या निमित्ताने नाशिकचे धार्मिक महत्त्व अजूनच वाढले आहे.
  • आता येथे भाविक तसेच पर्यटकांचे लक्ष वेधले जाणार असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
  • या मूर्तीच्या परिसरात रामायणातील दृश्य साकारली जाणार असल्याने इतिहासकारांना देखील याचा लाभ होणार आहे.
  • रामायणातील दृश्य साकारली जाणार असल्याने प्रभू श्री रामांचा संपूर्ण जीवनपट आणि रामायणाचा प्रसार व प्रचार होणार आहे.
  • श्री रामाचे जीवन हे भाविकांसाठी एक आदर्श आहे आणि त्यावरच आता प्रकाश टाकण्यात येणार आहे.
  • नाशिकमधील या ७० फूटी मूर्तीमुळे अयोध्येतील पर्यटकाला चालना मिळू शकते.

अयोध्या नगरीत पुन्हा राम मंदीर बांधले गेल्यावर भाविकांना खूप आनंद झाला होताच आता नाशकात देखील या भव्य मूर्तीचे दसऱ्याच्या एक दिवस आधीच लोकार्पण झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *