The legend of maula jatt – पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेता फवाद खान तुम्हाला आठवतच असेल. त्याची ‛जिंदगी गुलजार है” ही मालिका सुद्धा काही वर्षांपूर्वी भारतात चांगलीच गाजली होती. भारतात त्याने त्याचा चांगलाच मोठा चाहता वर्ग निमार्ण केला होता. जास्त करून त्याच्या चर्मिंग लुक्सवर मुली अजूनही ही फिदा आहेत. त्याचे असंख्य चाहते आजही आपल्या इथे आहेत. त्याने सोनम कपूर बरोबर ‛खूबसुरत’ या चित्रपटात काम केले होते आणि तो भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता पण मध्यंतरी भारत-पाकिस्तान मधील संबंध खूपच बिघडले आणि पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली त्यामुळे फवाद त्याच्या भारतीय चाहत्यांना आणि चाहते त्याच्या अभिनय पाहण्याला मुखले होते.
पण त्याच्या चाहत्यांनासाठी एक खुश खबर घेऊन आपण आलो आहोत. फवाद खानच्या 2022 साली जगभरात गाजलेल्या एका चित्रपटाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. फवाद खानचा ‛the legend of maula jatt ’ नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानातील सगळ्यात महागडा चित्रपट आहे. या शिवाय या चित्रपटाने पाकिस्तानातील बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई केली आहे असे सांगितले जाते. ‛द लिजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे याची माहिती समोर येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या चित्रपटाच्या रिलीजला कडाडून विरोध केला आहे.
रिलीज नंतर आता दोन वर्षानंतर ‛the legend of maula jatt’ सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. भारतात हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. भारतात हा चित्रपट पाहण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग ही सुरू झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बाबत अधिकृत घोषणा केली असून 2 ऑक्टोबरच्या रिलीजसाठी हा चित्रपट तयार आहे असे सांगितले आहे.
पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या निर्णयावर ठाम आहे, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि पाकिस्तानातील कलाकारांना भारतात काम मिळू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर एका पेपरसाठी मुलाखत देताना दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हंटले की “आम्ही पाकिस्तानी चित्रपट इथे प्रदर्शित होऊ देणार नाही आणि पाकिस्तानी कलाकारांना इथे काम देखील करू देणार नाही.”
चित्रपटाचे रेकॉर्ड
‛the legend of maula jatt’ हा पाकिस्तातील सगळ्यात महागडा चित्रपट आहे. 13 ऑक्टोबर 2022 रोजी हा चित्रपट जगभरातील पंचवीस देशातील एकूण पाचशे हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. जगभरात चारशे हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट आहे असा या चित्रपटाचा रेकॉर्ड आहे. भारतात मात्र हा चित्रपट अजून ही प्रदर्शित झालेला नाही.
स्टारकास्ट of the legend of maula jatt
या चित्रपटात फवाद खान व्यतिरिक्त हमजा आली अब्बासी, हुमैमा मलिक,फरीस शफी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिलाल लाशारीने केले आहे. या चित्रपटात फवाद खानची नायिका आहे माहिरा खान. तिने आधी शाहरुख खानच्या राईसमध्ये त्याच्या नायिकेचे काम केलेले आहे. फवाद खान आणि माहिरा खान ही जोडी पाकिस्तानात आधीच लोकप्रिय आहे. या दोघांनी ‛ हमसफर’ या लोकप्रिय सीरिअलमध्ये एकत्र काम केले होते.
काय आहे ‛the legend of maula jatt ’ चित्रपटाची कथा
खरं तर हा चित्रपट 1979 मध्ये रिलीज झाला होता. एका जुन्याच चित्रपटाचा ‛the legend of maula jatt’ हा रिमेक आहे.
हा चित्रपट एका स्थानिक नायक मौला जट या नायकाच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची सुरुवात ममदल नावाच्या एका शहरातून होते. जिथे मौला जटचे कुटुंब राहते. या कुटूंबाने कौटुंबिक कलह संपवला आहे आणि ते शांततेत त्यांच्या आयुष्य जगू इच्छित आहेत. हा चित्रपटात जीवा नट त्याच्या टोळी बरोबर सरदार जटच्या हवेलीवर हल्ला करतो आणि सरदार जट आणि त्याच्या पत्नीचा तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून करतो. मात्र या हल्ल्यात सरदार जटचा एकमेव मुलगा मौला जिवंत राहतो. त्याला दानी नावाची बाई वाढवते आणि हा मौला म्हणजे फवाद खान आहे जो पुढे जाऊन कुस्ती शिकतो आणि प्रसिद्ध होतो. पण रात्री त्याच्या बालपणी त्याने पाहिलेली हिंसा स्वप्न रुपात त्याला येऊन सतावत असते पण त्याला या सगळ्याचा अर्थ कळत नाही.
याच दरम्यान गावातल्या एका मुलीला जीवा नटचा मुलगा माखा उचलून नेतो आणि तिच्यावर बलात्कार करून सगळ्या गावात दहशत पसरवतो. मौला लोकांना त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करतो त्याच दरम्यान एक म्हातारा मौला जटला तो सरदार जटचा मुलगा असून त्याच्या कुटूंबाला जीवा नटने मारले आणि माखा नट त्याचा मुलगा आहे ही हकीकत सांगतो.
आता मौला जट माखा नटच्या समोर कसा उभा राहतो आणि सगळ्या गावाला त्याच्या तावडीतून सोडवून त्याच्या कुटूंबाचा बदला कसा घेतो हे तर तुम्हाला चित्रपटातच पाहावे लागेल.