Thar Roxx Launch – तुम्हाला माहित आहे का? भारतात या महिन्यात कोणत्या चारचाकी गाड्या लाँच होणार आहेत आणि त्यातच एक लोकप्रिय कंपनी त्यांची ब्रॅण्डेड काराचे नवीन मॉडेल लॉंच करत आहे. थार आणि एक्स.यु.व्ही प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या कार्सची आवड आहे आणि जे थार प्रेमी आहेत त्यांनी तर ही बातमी अजिबात मिस करू नका कारण भारतीय बाजार पेठेत पुढच्या आठच दिवसात एक नवीन एस.यु.व्ही कार धुमाकूळ घालणार आहे.
आता ती कंपनी कोणती?
आणि कोणती ब्रॅण्डेड कार आहे ती?
ही कार बाजारात नेमकी कधी येणार आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत.
भारतातील एस.यू.व्हीच्या कारच्या दुनियेत मार्केटमध्ये आणखीन एका कारची एंट्री होणार आहे. महिंद्रा कंपनी मार्केटमध्ये त्यांची महिंद्रा Thar Roxx ही पाच दरवाजांची नवीन कार लॉंच करणार आहे. ही नेक्स्ट जनरेशन कार असून ही कार कशी असणार आहे? या कारमध्ये कोणते फीचर्स देण्यात येणार आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत.
महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar Roxx )
महिंद्रा थार रॉक्स स्पोर्ट युटिलिटी व्हेईकेल्स(SUV) कार बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ही महिंद्रा थारचे नवीन व्हर्जन असून 29 जुलै रोजी टीजर सह या कारची घोषणा करण्यात आली. ही कार भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही प्रेमींसाठी खास आकर्षण असणार आहे.
थार रॉक्सची डिझाइन कशी आहे? – Thar Roxx Design
महिंद्रा थार रॉक्समध्ये सी- आकाराचे एलईडी डीआरएल बसवले आहेत. या कारमध्ये मोठा व्हील बेस बसण्यासोबत चार ऐवजी पाच दारे असणार आहेत. या नवीन SUV मध्ये 18-इंचाचे आलॉय व्हील देखील बसवले जाण्याची शक्यता आहे. हेडलाईट युनिट्स सह एक नवीन ग्रील देखील मिळेल.
कसा असणार आहे फ्रंट फेस? – Front Look for Thar Roxx
थारच्या या नवीन मॉडेलमध्ये पाच दारे असणार आहेत त्यामुळे ही कार आधीच्या थार मॉडेल पेक्षा मोठी असणार आहे. या थारच्या नवीन व्हर्जनमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइनचा फ्रंट फेस असणार आहे.महिंद्राचे ऑटोमोबाईल सेक्टरचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले की “ थार रॉक्स ही वैशिष्ट्य पूर्ण रचना असलेली प्रीमियम, प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक व सुरक्षितता असलेली एस.यु.व्ही कार असणार आहे.”
थार रॉक्समध्ये काय असणार आहेत फीचर्स? – Mahindra Thar Roxx Features
या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या नवीन व्हर्जनमध्ये 10.25 इच टचक्रीन असण्याची शक्यता आहे. या महिंद्रा थार रॉक्समध्ये पॉवर्ड ड्रायव्हर सीट दिली जाण्याची शक्यता आहे.या कारमध्ये सुरक्षेसाठी ADAS फिचर देखील असू शकते. LED प्रोजेक्टर हेडलँप्स, रिअर AC व्हेंट, सहा एअर बॅग्स असून तसेच वैशिष्ट्य पूर्ण फ्रंट आणि रिअर सेंटर आर्मरेस्ट, सीट अप होल्स्ट्री आहे.नव्या थारमध्ये रिअर डिस्क ब्रेक्सचे वैशिष्ट्य ही असण्याची शक्यता आहे.
5- डोअर थारची पॉवरट्रेन काय आहे?
हे थारचे नवीन मॉडेल असले तरी या नवीन थारमध्ये 3- डोअर मॉडेलप्रमाणे इंजीन असणार आहे. महिंद्राने थार रॉक्सच्या पॉवरट्रेनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. थार रॉक्स या कारमध्ये 2.0 लिटर डिझेल, 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध असू शकतो.
सनरुफ कसे असेल? – Sunroof In Thar Roxx
थार रॉक्स SUV लॉंच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान दिसली होती. या कारची अनेक वैशिष्ट्य या टेस्टिंगमध्ये सांगण्यात आली आहेत. रिपोर्ट्स नुसार या थार रॉक्स कारमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ दिले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच एसयूव्हीमध्ये 10.25 इंच टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ही देण्यात येण्याची शक्यता आहे. या कारमध्ये अँड्रोइड ऑटो आणि ऍपल कार प्लेची सुविधाही असण्याची शक्यता आहे. थार रॉक्समध्ये केवळ 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील असण्याची शक्यता आहे.
या थार रॉक्स कारची किंमत किती असेल? – Price Expected For Thar Roxx
या कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती 13 ते 21 लाखांच्या दरम्यान असणार आहेत.महिंद्रा थारचे तीन डोअर व्हेरिएंट 11.35 लाख ते 17.60 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत ऑफर केले जाते. पण महिंद्रा थार रॉक्स पाच डोअरच्या स्वरूपात आणली जाणार आहे.आशा स्थितीत पाच डोअर थारची बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13 लाख रुपयांपासून कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 21 लाख इतकी अपेक्षित आहे.
कधी येणार आहे प्रत्येक्ष बाजारात ?
महिंद्राच्या थारच्या नवीन जनरेशन कारच्या जे कार प्रेमी प्रतीक्षेत आहेत त्यांची प्रतिक्षा या महिन्यात संपणार आहे. तर 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर थार रॉक्स ही नवी कोरी कार बाजारात तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे.ही कार एस.यु.व्ही कार प्रेमींसाठी नक्कीच एक नवीन पर्याय असणार आहे.
2 thoughts on “15 ऑगस्टला होणार आहे Thar Roxx गाडी लॉन्च; काय असणार धडाकेबाज फीचर्स वाचा सविस्तर”