Temple Elephant Kills Mahout in Belgaum
Belgaum : Assistant Mahout killed by temple elephant
बेळगाव—belgavkar—belgaum : रायबाग : सहायक माहुतावर हत्तीने हल्ला करुन पायात तुडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अलखनूर (ता. रायबाग) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. करेप्पा सखराम बेवनूर (वय 28, मूळ गाव भरमकोडी, ता. अथणी, सध्या रा. अलखनूर) असे हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या सहायक माहुताचे नाव आहे.
assistant mahout was trampled to death by a temple elephant at Alakhanur village in Raybag taluk, Belgaum
याबाबत हारुगेरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, अलखनूर येथील देवस्थानात सेवेसाठी हत्ती आहे. त्याची देखभाल करण्यासाठी एक माहुत व एक सहायक आहेत. सोमवारी सकाळी सहायक माहुत करेप्पा हा वैरण टाकण्यासाठी गेला असता हल्ला करुन हत्तीने ठार केले. याबाबत मंदिर समितीला समजताच पोलिसांसह वनखात्याला माहिती देण्यात आली.
देवस्थानासाठी हा हत्ती सेवेत घेतला आहे. देवस्थान समितीकडून हत्तीसाठी माहुत बेवनूर वनखात्याकडून संमती, विमा व इतर प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच वन खात्याने हत्तीची तपासणी केली आहे. हत्तीने सेवेकऱ्याला ठार केल्याने भाविकांनी धाव घेतली. वन खाते व पोलिसही दाखल झाले.
हारुगेरीचे मंडल पोलिस निरीक्षक रवीचंद्रन एफ., उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी, वनखात्याचे अधिकारी व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली.
दहा दिवसांपूर्वीच पुत्ररत्न : देवस्थानसाठी असलेला ध्रुव हा हत्ती 21 वर्षांचा आहे. त्याच्या देखभालीसाठी एक माहुत व एक सहायक माहुत नेमले होते. सहायक माहुत करेप्पा पत्नीसह वास्तव्यास होता. दहा दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न झाले आहे. करेप्पाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला होता.
#Belgaum #TempleElephant #Mahout #AnimalAttack #TragicIncident #Wildlife #ElephantAttack #SafetyConcerns #AnimalWelfare #LocalNews #BelgaumNews #RuralIndia #ForestDepartment #CommunitySupport #Trampled #ElephantCare #MahoutLife #Devotional #Alakhanur #Raybag
Temple Elephant Kills Mahout in Belgaum
Temple Elephant Kills Mahout in Belgaum