अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर अगदी सिनेसृष्टीच्या सुरवातीपासून बरेच मराठी आणि हिंदी सिनेमे निघाले आहेत. अगदी सूर्यकांत मांडरेपासून चिन्मय मांडलेकर आणि महेश मांजरेकर पर्यंत तर हिंदीमध्ये शरद केळकर, अक्षय कुमारने देखील शिवाजी महाराजांनी भूमिका साकारली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट आले नाहीत. मागे झी मराठीवर छत्रपती संभाजी महाराजांवरील मालिका आली होती. ती खूपच गाजली आणि त्यात डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्कृष्ट रित्या साकारली आहे. आता मात्र आपल्याला आपल्या स्वराज्याचा ‛Chhaava’ चित्रपटाच्या रुपात पहायला मिळणार आहे.
‛ Chhaava’ चित्रपटाचा टिझर झाला लॉंज
आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‛Chhaava’ या हिंदी चित्रपटाचा टिझर नुकताच लॉंच झाला आहे आणि त्यात विक्की कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर हा मराठामोळा दिग्दर्शक करत आहे.या सिनेमाचा टिझर नुकताच लॉंच झाला त्यात विक्की कौशल याने भूमिका साकारताना केलेली मेहनत दिसून येत आहे तर त्याच्या लूक्सवर देखील बरीच मेहनत घेतल्याचे आपल्याला लगेच लक्षात येते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लढाईची दृष्ये खूपच सुंदर रीतीने शूट केल्याचे या टिझरमधून लगेच जाणवते. गेल्या अनेक महिन्यापासून बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भव्य चित्रपटाची निर्मिती होत असल्याची चर्चा सुरू होती. पण निर्मात्यांनी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या होत्या. सिनेमातील कलाकार असोत किंवा बाकी गोष्टी यांच्याबद्दल फार काही सांगितलं गेलं नव्हतं. काही दिवसांपासून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर लिक झाला आणि चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली.त्यानंतर आता सिनेमाचा टिझर अधिकृत रित्या लॉंच झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सारकरण्याचा बहुमान विक्की कौशल या गुणी अभिनेत्याला मिळाला
आहे.
चित्रपटाच्या नावावरून ही सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. अखेर चित्रपटाला नाव ‛Chhaava’ हेच असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल शोभून दिसत आहे. या भूमिकेसाठी विकीने घेतलेली मेहनत डोळ्यात भरते तर त्याच्या लुक्सचा देखील खूप विचार करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज या मराठी मालिकेतील संभाजी महाराजांच्या लूकशी साधर्म असणारा लूक दिसून येत आहे.
Chhaava या चित्रपटाचा टिझर शेअर करताच नेटकाऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. टिझर पाहून आता प्रेक्षकांची चित्रपटा विषयीची उत्सुकता वाढली आहे.
कशी आहे स्टार कास्ट?
क्र. | भूमिका | स्टार कास्ट |
---|---|---|
१ | छत्रपती संभाजी महाराज | विक्की कौशल (vicky kaushal) |
२ | औरंगजेब | अक्षय खन्ना (akshay Khanna) |
३ | सरसेनापती हंबीरराव मोहिते | आशुतोष राणा (Ashutosh Rana) |
४ | सोयराबाई | दिव्या दत्ता (divya dutta) |
५ | येसूबाई | रश्मीका मंदाना (rashmika mandanna) |
६ | दिग्दर्शक | लक्ष्मण उतेकर (lakshman utekar) |
Chhaava च्या टिझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल असून औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून येत आहे तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणा असणार आहे तर सोयराबाईची भूमिका दिव्या दत्ता साकारत आहे आणि येसूबाई म्हणजे स्वराज्याच्या महाराणीची भूमिका रश्मीका मंदाना साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात बरेच मराठी कलाकार विविध भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे तर संतोष जुवेकर हा देखील महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे सांगितले जात आहे पण तो नेमकी कोणाची भूमिका साकारणार आहे हे मात्र अजून ही गुलदस्त्यात आहे.
Chhaava चित्रपट कधी होणार आहे प्रदर्शित
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ‛Chhaava’ चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर टिझर लॉंच करतानाच चित्रपटाची रिलीज डेट देखील सांगितली गेली आहे.
विक्की कौशल हा पंजाबी मुंडा आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याची भूमिका कशी साकारणार आहे हे पाहण्याची उत्सुकता तर आहेच पण आपले महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरूपात पाहण्याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. आता आपले मराठामोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे शिवधनुष्य कसे पेलणार आहेत हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.कारण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे वादळी आयुष्य आणि स्वधर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेलं बलिदान हे चित्रपटातून सरकारने इतके सोपे तर असणार नाही. ती खूप मोठी जबाबदारी तर आहेच आणि मराठी माणसाच्या मनात श्रद्धास्थान असलेल्या आपल्या राजेंचा चित्रपट म्हणजे साधीसुधी गोष्ट देखील नाही.आणि आपले कोणते मराठी कलाकार कोणती भूमिका साकारणार आहेत ते पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहेच.
टिझर तरी चांगला वाटतोय पण Chhaava चित्रपट प्रत्येक्ष चित्रपट गृहात पाहण्यासाठी आपल्याला 6 डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तर वाट पाहुयात 6 डिसेंबरची
जय भवानी! जय शिवाजी! जय शंभूराजे!