Tata Sumoचा होणार पुनर्जन्म

By Pratiksha Majgaonkar

Published on:

TATA SUMO
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उद्योग विश्वातील एक विश्वासार्ह नाव म्हणजे टाटा. टाटा कंपनीने १९९४ मध्ये Tata Sumo ही जबरस्त लूक असलेली गाडी लाँच करून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ही १० सीटर रिअर व्हील ड्राईव्ह SUV म्हणून लाँच करण्यात आली होती. ही गाडी प्रामुख्याने लष्कर आणि ऑफ रोड वाहतुकीसाठी डिझाईन केली गेली होती. या गाडीला चांगली मागणी होती. १९९७ पर्यंत जवळजवळ एक लाख गाड्या कंपनीने विकल्या होत्या.

Tata Sumo बंद का करण्यात आली ?

ही त्या काळची सगळ्यात आरामदायी आणि जबरदस्त लूक असलेली गाडी तब्बल २५ वर्षांनी कंपनीने बंद केली. यामागे काही कारणे होती. या गाडीची किंमत ७ लाख ३९ हजार ते ८ लाख ७७ हजार या दरम्यान होती. ही गाडी जुन्या तंत्रज्ञानावर आधारलेली होती त्यामुळे त्यात बऱ्याच प्रमाणात बदल करावे लागत होते. याशिवाय याच्या विक्रीत देखील घट झाली होती. मोठ्या प्रमाणावर करायला लागणारे बदल आणि विक्रीतील घट यामुळे कंपनीला ही गाडी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता.

१ ऑक्टोबर २०१९ पासून गाडीत एअर बॅग्स, सीट बेल्ट reminder, speed alert system, reverse parking sensors, ABS अश्या काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने बंधनकारक करण्यात आल्या आणि या व्यवस्था जुन्या Tata Sumo मध्ये नव्हत्या.

शेवटची Tata Sumo कोणती होती?

सुमो गोल्ड या नावाचे शेवटचे सुमो मॉडेल होते. यात BS4 एमिशन नॉर्म नुसार ३.० लिटर ४ डिझेल सिलेंडर इंजिन दिले गेले होते. मात्र त्यानंतर BS6 नोर्म नुसार Tata Sumo ने आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये बदल न केल्याने टाटा सुमोला आपली गाडी बाजारातून मागे घ्यावी लागली.

या गाडीला सुमो नाव कसे पडले?

Tata Sumo हे नाव ऐकल्यावर एखाद्या जॅपनीज नावाप्रमाणे वाटते ना? पण तुम्हाला माहीत आहे का हे नाव जपानी नाही. एका मराठी माणसाच्या नावावरून टाटा ग्रुपने हे नाव आपल्या गाडीला दिले आहे. टाटाच्या गाडीला हे नाव पडण्यामागे एक कथा आहे. सुमंत मुळगावकर (sumant moolgaokar) हे प्रसिद्ध उद्योगपती तर होतेच पण ते टाटा मध्ये आर्किटेक्ट होते. त्यांच्यामुळेच टाटा मोटर्स एका नव्या रुपात सगळ्यांसमोर आली. आजची टाटा मोटर्सची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी सुमंत मुळगावकर यांच्यामुळे आहे हे स्वतः टाटा ग्रुप्स देखील मान्य करते.

सुमंत मुळगावर (sumant moolgaokar) हे देखील त्यांच्या कामाशी एकनिष्ठ होते. आपल्यावर ज्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे त्या डिपार्टमेंटला वर कसे आणता येईल, काय काय केल्याने कंपनीला फायदा होईल याचा ते सतत विचार करायचे. ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये सर्व अधिकारी एकत्र जेवायचे परंतु त्यांच्यात सुमंत नसायचे. ते लंच ब्रेक झाला की स्वतःची गाडी काढून बाहेर पडायचे. त्यांच्या सहकाऱ्यांना हा प्रश्न नेहमी पडायचा ते असे का करतात. त्यांनी शेवटी याचे उत्तर शोधून काढलेच. सुमंत मुळगावकर त्यावेळी गाडी घेऊन हायवे जवळ असणाऱ्या ढाब्यावर जेवायला जायचे. तिथे येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर सोबत त्यांची चर्चा रंगायची.

ते तिथे येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरना ट्रक चालवताना येणाऱ्या अडचणी, काय काय बदल अपेक्षित आहेत हे सर्व जाणून घ्यायचे. ऑफिसचा लंच ब्रेक संपायच्या आत ते परत ऑफिसमध्ये यायचे आणि जे बोलणे ट्रक ड्रायव्हर सोबत झालेले असेल त्याचा नीट विचार करायचे.

त्यांच्या या प्रयत्नांमुळे टाटा मोटर्स हे एक विश्वासार्ह नाव म्हणून नावारूपाला आले. टाटाच्या मोटर्स सगळ्या गरजा पूर्ण करणाऱ्या बनू लागल्या. सुमंत मुळगावकर यांच्यामुळे टाटा मोटर्स हे एक प्रसिद्ध ब्रँड बनले. त्यांच्या प्रयत्नांनी टाटा ब्रँड एक नवी उंची गाठत होते आणि त्यांचे टाटा ग्रुप्सवर असलेले ऋण कसे फेडायचे या विचारात टाटा ग्रुप होते. पुढे अनेक वर्षांनी टाटा ग्रुप्सने ठरवले Tata Sumo ही गाडी बाजारात लाँच करायची. सुमंत मुळगावकर यांच्या सन्मानार्थ म्हणून त्यांच्या नावातील पहिली दोन अक्षरे घेऊन या गाडीचे नाव ठेवण्यात आले.

आज आपण जी Tata Sumo पाहतो ती सुमंत मुळगावकर (sumant moolgaokar) यांच्याच नावावरून आलेली गाडी आहे.

टाटा ग्रुप्स पुन्हा त्यांच्या गाड्या बाजारात आणणार आहे का?

होय. टाटाने पुन्हा नव्या रुपात गाड्या बाजारात आणायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जुन्या गाड्यांमध्ये जे काही आवश्यक बदल होते त्यानुसार काम करून आणि सध्याची मार्केट स्थिती बघता टाटा ने नव्या रुपात, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसालाही परवडतील अश्या गाड्या बाजारात आणायचा निर्णय घेतला आहे. टाटा curvv, टाटा Tiago अश्या अनेक गाड्या बाजारात लाँच होणार आहेत.

Tata Sumo गाडी बाजारात आणल्यावर सुमारे २५ वर्ष मार्केटमध्ये राज्य केलं. त्यांनतर वाहनाच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुधारित नियम आले त्यानुसार ही गाडी upgrade होऊ न शकल्याने बंद झाली आणि आता लवकरच पुन्हा अश्या गाड्या नव्या रुपात समोर येणार आहेत.


FAQ:-

टाटा सुमो २०२४ किती सीटर आहे?

नवी सुमो ७ सीटर आहे.

What is the price of Sumo in 2024?

At present no information has been given about the prices, but according to auto experts, considering the competition in the market, the price of Sumo can be between Rs 10 lakh to Rs 15 lakh.

Is Tata Sumo coming back?

New Tata Sumo 2024 Expected to Launch in 2024

What is the mileage of Tata Sumo 2024 diesel?

The Sumo mileage is 14.07 to 15.3 kmpl. The Manual Diesel variant has a mileage of 15.3 kmpl.

Leave a Reply