Tata Nexon CNG:- नुकतीच म्हणजेच 24 सप्टेंबर 2024 मध्येच Tata ने त्यांची सर्वात लोकप्रिय कार Nexcon ची CNG आवृत्ती लाँच केली आहे. ही भारतातील पहिली Turbocharged CNG SUV ठरली आहे कारण ही कार कॉम्पॅक्ट SUV टर्बो पेट्रोल इंजिनसह येते. त्यामुळे टर्बो पेट्रोल इंजिन आणि CNG कॉम्बिनेशन मध्ये ही कार लाँच झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एक किलो CNG वर 24 किलो मीटर धावेल असे सांगितले गेले आहे.
जानेवारी महिन्यातील भारत मोबिलिटी शोकेसमध्ये ही कार प्रथम प्रदर्शित करण्यात आली होती. आता भारतात येणाऱ्या सणांची रेलचेल पाहता दिवाळी आधीच Tata Motors ने एक नवीन गाडी बाजारात आणून फटाका फोडला आहे. या दमदार लूक असलेल्या आणि आकर्षक दिसणाऱ्या गाडीची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत फक्त 8.99 लाख ठेवण्यात आली आहे.
Tata Nexon CNG ची खासियत
Tata Nexon च्या या नव्या मॉडेलच्या लाँचमुळे ही कार पेट्रोल, डिझेल, CNG आणि अगदी इलेक्ट्रिक version मध्ये उपलब्ध असलेली देशातील पहिली गाडी ठरली आहे.
ही Tata Nexon कंपनीने एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल आठ Variant मध्ये सादर केली आहे. यात स्मार्ट (ओ), स्मार्ट प्लस, स्मार्ट प्लस एस, प्युअर, प्युअर एस, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस आणि फियरलेस प्लस एस अश्या variants चा समावेश आहे.
Tata Nexon CNG Design
कंपनीने या Nexon गाडीच्या लूक आणि डिझाईन मध्ये कोणताही बदल केलेला नाही. अगदी नवीन फेसलिफ्ट मॉडेलसारखीच ही गाडी आहे. या गाडीवर टाटा लोगो रुंद वरच्या ग्रिल विभागात आढळतो तर यात स्प्लिट-हेडलॅम्प सेटअप आहे.
ट्रॅपेझॉइडल हाऊसिंगमध्ये मोठ्या लोखंडी जाळीसह या गाडीचा हेडलाइट्सचा खालचा भाग ठेवण्यात आला आहे ज्यात जाड प्लॅस्टिकच्या पट्टीचा समावेश आहे. तसेच नवीन अनुक्रमिक एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स या नव्या Nexon गाडीत देण्यात आले आहेत.

Tata Nexon CNG Power, Performance and Mileage
1.2 लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन या Nexon CNG मध्ये कंपनीने दिले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. या कार मध्ये दोन छोटे CNG सिलेंडर वापरण्यात आले आहेत अर्थात कंपनीने ही गाडी ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे.
यात ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान वापरल्याने यात वापरकर्त्याला बूट स्पेस सोबत तडजोड करावी लागणार नाही. हे तंत्रज्ञान वापरून गाडी डिझाईन केली असल्याने यात 321 लिटरची बूट स्पेस मिळते.
इंजिन 99bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क CNG मोड मध्ये generate करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही गाडी एक किलो CNG मध्ये 24 किलोमिटरचे मायलेज देईल.
नवीन टचस्क्रीन सेट-अप आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह, कर्व्ह संकल्पनेने प्रेरित इंटीरियर डिझाइनसह या Tata Nexon फेसलिफ्टच्या केबिनला पुन्हा डिझाईन करण्यात आले आहे. या नव्या मॉडेल मध्ये एसी व्हेंट्स थोडे कमी जाडीचे करण्यात आले आहेत. शिवाय डॅशबोर्ड असलेली बटणे कमी केल्याने फीचर्स हाताळणे वापरकर्त्याला सोपे झाले आहे.
टच-आधारित HVAC कंट्रोल पॅनलने वेढलेले दोन टॉगल सेंट्रल कन्सोलमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर यात डॅशबोर्डला फिनिशसारख्या कार्बन-फायबरसह लेदर इन्सर्ट देखील मिळतो. 10.25-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यात आहे तर 10.25-इंच फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दुसरी स्क्रीन म्हणून उपलब्ध आहे ज्यामुळे नेव्हिगेशन देखील कस्टमाइझ केले जाऊ शकते.
Tata Nexon CNG Features
360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर असे फीचर्स टॉप-स्पेक Nexon मध्ये मिळतात.
सुरक्षेच्या दृष्टीने ESC, सर्व आसनांसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX तसेच इमर्जन्सी आणि ब्रेकडाउन कॉल असिस्टंट, 6 एअर बॅग्स असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Tata Nexon CNG Variants and there Prices
Variant | Petrol Prices | CNG Prices |
Smart | – | Rs. 8.99 Lakhs |
Smart Plus | Rs. 8.70 Lakhs (with 5-speed MT) | Rs. 9.69 Lakhs (with 6-speed MT) |
Smart Plus S | Rs. 9 Lakhs (with 5-speed MT) | Rs. 9.99 Lakhs (with 6-speed MT) |
Pure | Rs. 9.70 Lakhs | Rs. 10.69 Lakhs |
Pure S | Rs. 10 Lakhs | Rs. 10.99 Lakhs |
Creative | Rs. 10.70 Lakhs | Rs. 11.69 Lakhs |
Creative Plus | Rs. 11.20 Lakhs | Rs. 12.19 Lakhs |
Fearless Plus PS | – | Rs. 14.59 Lakhs |