टाटा च्या या इलेक्ट्रिक कार ने सगळ्या कंपन्यांचे धाबे दणाणणार – Tata Curvv EV

Pratiksha Majgaonkar
4 Min Read
Tata Curvv EV

Tata Curvv Ev News : सध्या भारतीय बाजारपेठ ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. नवीन नवीन कार अनेक फीचर्स सहित लाँच होत असतानाच टाटा कर्व ही कार लाँच होणार आहे. सध्याच्या सणांच्या दिवसात लाँच होणाऱ्या गाड्यांकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. सणांच्या दिवसात मोठी खरेदी करण्यासाठी भारतीय उत्सुक असतातच आणि अश्यातच लाँच होणाऱ्या नव्या गाड्या नवनवीन फीचर्स सहित आणि तेही परवडणाऱ्या किमतीत येत असतील तर ते सोन्याहून पिवळे असते. त्यात टाटा कंपनी म्हणले की ती आपल्या चांगल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेच. अगदी सामन्यातील सामान्य माणसाचा विचार करून बनवण्यात येणारे यांचे प्रॉडक्ट्स लवकरच लोकप्रिय होतात.

याच टाटा कंपनीने आता Tata curvv EV बनवली आहे जी लवकरच बाजारात येत आहे. चला तर मग बघूया काय आहेत या गाडीचे फीचर्स.

  1. Tata curvv EV मध्ये काय काय खास आहे?
    • Tata Curvv EV ही देशातील पहिली इलेक्ट्रिक कूप एसयूव्ही आहे.
  2. काय आहेत या गाडीचे फीचर्स?
    • ही गाडी दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. एक 45kwh आणि दुसरा 55kwh असा पर्याय आहे.45kwh क्षमतेच्या
  3. बॅटरीमध्ये गाडी किती अंतर कापते?
    • या क्षमतेच्या बॅटरी मध्ये बॅटरी पूर्ण चार्ज असताना 502 km ARAI अशी रेंज देते. तर 70 kw चार्जरने ही बॅटरी 10 ते 80
  4. टक्के चार्ज होण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ लागतो.55kwh बॅटरी काय फीचर देते?
    • या बॅटरी मध्ये 585 km ARAI ची रेंज मिळते.

या गाडीचे व्हेरियंट नुसार किंमत – Tata curvv EV Price by Variant

  • Tata Curve EV क्रिएटिव्ह 45 kWh बॅटरी बॅक – 17.49 लाख रुपये
  • Tata Curve EV Complete 45 kWh बॅटरी पॅक – 18.49 लाख रुपये.
  • Tata Curve EV Accomplished Plus S 45 kWh बॅटरी पॅक – 19.29 लाख रुपये.
  • Tata Curve EV Complete 55 kWh बॅटरी पॅक – 19.25 लाख रुपये.
  • Tata Curve EV Accomplished Plus S 55 kWh बॅटरी पॅक – 19.99 लाख रुपये.
  • Tata Curve EV Empowered Plus 55 kWh बॅटरी पॅक – 21.25 लाख रुपये.
  • Tata Curve EV Empowered Plus A – 21.99 लाख रुपये.

या सर्व किंमती एक्स शोरुम किमती आहेत.

काय आहेत या गाडीचे खास फीचर्स? – Tata curvv EV features

या गाडीचे 18 इंचाचे व्हील्स आहेत. 450 mm वॉटर वेडिंग क्षमता, 190 mm ground clearance, 500 लिटर बूट स्पेस, multi drive modes, फ्लश डोअर हॅण्डल, Ventilated seats, connected apps, LED lights, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट, स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

- Advertisement -

सुरक्षेच्या दृष्टीने गाडीत कशाचा समावेश आहे?

Tata Curvv EV मध्ये सुरक्षेचा खूप विचार केला गेला आहे. प्रवासादरम्यान प्रवाश्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी यात लेव्हल-2 ADAS चा समावेश करण्यात आला आहे. यात सहा एअर बॅग्स, थ्री पिन सीट बेल्ट, सीटबेल्ट अँकर प्री-टेन्शनर, फोर्टिफाइड बॉडी स्ट्रक्चर, आयसोफिक्स, 20 सेफ्टी फीचर्स, ईएसपी, ईपीबी, 360 डिग्री सराउंड व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत.

काय असेल याची किंमत? Tata curvv EV Price

Tata Curvv च्या Electric version ची किंमत 17.49 लाख ठेवण्यात आली आहे. ही किंमत एक्स शोरुम किंमत आहे आणि यात बदलही होऊ शकतो.

कधी होणार लाँच?

कंपनी आपल्या electric व्हेरीयंटसाठी 12 ऑगस्ट पासून बुकिंग सुरू करणार असून याची टेस्ट ड्राइव्ह 14 ऑगस्ट पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे कंपनी पेट्रोल आणि डिझेल व्हेरीयंट 2 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे.

Tata Curvv EV ची थेट स्पर्धा कोणासोबत होऊ शकते?

Tata Curvv भारतीय बाजारपेठेत Citroen Basalt, Mahindra XUV 400, MG ZS EV यांसारख्या SUV बरोबर थेट स्पर्धा करू शकते.

15 ऑगस्टला होणार आहे THAR ROXX गाडी लॉन्च; काय असणार धडाकेबाज फीचर्स वाचा सविस्तर

Share This Article
4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *