Covid XEC या कोरोंना व्हेरीएन्टचे परदेशात थैमान, पाहिल्यापेक्षा अजून भयानक लक्षणे

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Covid XEC
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Covid XEC variant – कोरोना समूळ नष्ट होणार नाही हे आधीच WHO कडून सांगितले गेले होते. आता कोरोनाचा XEC हा variant (Covid Xec Variant) अमेरिकेसह 27 देशांमध्ये नव्या धोक्याच्या रुपात उभा राहिला आहे. जर्मनीत जून मध्ये आढळलेल्या या XEC variant च्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असलेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता तज्ज्ञांनी Corona ची नवी लाट येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात येऊ शकते असे सांगितले आहे.

जगभरात थैमान घातलेल्या या Corona virus ने पुन्हा आपले डोके वर काढल्याचे दिसत आहे. या व्हायरसमुळे संपूर्ण जग जवळजवळ दीड ते दोन वर्ष ठप्प झाले होते आणि आजही अर्थव्यवस्थेवरील परिणाम आपण पाहत आहोत. जगातला एकही कोपरा असा राहिला नाही जिथे या corona रूपी राक्षसाने थैमान घातले नाही. आताही त्यात अनेक बदल होत होत नवे नवे variants तयार होत आहेत.

यावर्षीच्या जून महिन्यात जर्मनी, बर्लिन यासारख्या देशात corona विषाणूचे Covid XEC (MV.1) चे प्रकार समोर आले आहेत. 5 सप्टेंबर रोजी स्क्रिप्स रिसर्चच्या Outbreak.info यावर दिलेल्या माहितीनुसार हा corona चा प्रकार वेगाने जगभरात पसरत आहे. 15 देश आणि एकट्या अमेरिकेतील 12 राज्य या विळख्यात आली आहेत. या corona XEC variant चे जवळजवळ 95 रुग्ण आढळले आहेत.

माइक हनी जे ऑस्ट्रेलियाचे डेटा इंटिग्रेशन स्पेशालिस्ट आहेत त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात हा प्रकार Omicron च्या DeFLuQE प्रमाणे आव्हान बनू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

नवा कोरोना प्रकार XEC माहिती (about New Corona variant XEC)

ओमिक्रॉन प्रकारातील KS.1.1 आणि KP.3.3 या दोन उप-प्रकारांचे संयोजन असलेला हा XEC प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. हे दोन्ही उप प्रकार आधीच जगासाठी डोकेदुखीचा विषय ठरले आहेत आणि त्यात या दोन्ही प्रकारच्या संयोगाने होणाऱ्या या नव्या प्रकारामुळे जास्त संसर्ग होऊन अधिक धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Hazard ratio of Covid XEC

अद्याप शास्त्रज्ञांनी हा प्रकार किती धोकादायक होऊ शकतो हे स्पष्ट केलेले नाही तरीही हा संसर्गजन्य असल्याने काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण आधीच्या variant पेक्षा याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो.

US cases of KP.3 strain

CDC म्हणजेच यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात DeFLuQE म्हणून ओळखला जाणारा Omicron प्रकाराचा KP.3.1.1 स्ट्रेन वरचढ ठरला आहे. या प्रकारचे 52.7% रुग्ण अमेरिकेत या महिन्यात म्हणजेच 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान आढळले आहेत. परंतु शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार XEC प्रकार ज्या वेगाने पसरत आहे ते पाहता तो लवकरच KP.3 प्रकारानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार जर्मनी, डेन्मार्क, ब्रिटन आणि नेदरलँडमध्ये XEC प्रकारची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या प्रकारात अजून काही बदल होत आहेत आणि त्यामुळेच ते हिवाळ्यात जास्त पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही यावर लस देऊन प्रतिबंध करता येऊ शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

How a New Covid XEC Type Spreads Rapidly

स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक एरिक टोपोल हे XEC प्रकाराबद्दल बोलताना म्हणतात की, ही तर अजून फक्त सुरुवात आहे. येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात याचा प्रसार इतका वेगवान होऊ शकतो की पुन्हा एकदा corona ची लाट येऊ शकते असे एरिक यांचे मत आहे. त्यात आत्ताच्या तारखेला corona च्या चाचण्या आधीपेक्षा खूप कमी प्रमाणात घेतल्या जात आहेत त्यामुळे हा विषाणू किती पसरला आहे हे सांगणे कठीण होत आहे असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या प्रकाराची प्रथम पुष्टी ही भारतामध्ये महाराष्ट्रात झाली त्यानंतर अमेरिकेसह इतर 9 देशांमध्ये XEC (MV.1) प्रकाराचे रुग्ण आढळले. चीन, युक्रेन, पोलंड आणि नॉर्वेमधील रुग्णांमध्येही या प्रकाराची पुष्टी झाली आहे असे डेटा स्पेशालिस्ट माईक हनी यांनी सांगितले आहे.

Symptoms of type Covid XEC corona

या प्रकारात देखील आधीच्या लक्षणांसारखा ताप आणि सर्दीचा समावेश आहे. या प्रकारात खूप जास्त प्रमाणात ताप, थकवा, अंगदुखी, घसा खवखवणे, खोकला अशी लक्षणे जाणवू शकतात. या लक्षणांशिवाय चव व वास कमी होणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या आणि जुलाब याही लक्षणांचा समावेश आहे. Corona विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना काही दिवसात बरे वाटण्यास सुरुवात होते परंतु या प्रकारच्या रुग्णांना बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो.

How to care in Covid XEC

लसीकरण करून घेणे हा एकमेव मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे असे काही उपाय करता येतील.

Leave a Reply