बेळगाव शहर : कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू…

Belgaum Belgavkar
1 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : चिदंबरनगर, अनगोळ येथे 60 वर्षीय अनोखळी व्यक्तीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी घटना उघडकीस आली. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिस त्याच्या वारसदारांचा शोध घेत आहेत.

 

चिदंबरनगरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी सकाळी परशुराम मिंजाळकर हे वाहनात पेट्रोल भरण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्याकडेला वृद्धाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता कुत्र्यांचा कळप अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे दिसले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत याची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना आणि उद्यमबाग पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असूनमृत व्यक्ती याच परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करत होता. त्याला दारूचे व्यसनही होते. मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा मृत्यू रात्रीच झाला आहे. उत्तरीय तपासणी अहवालानंतरच मृत्यू कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट होणार आहे.
– धरेगौडा पाटील, पोलिस निरीक्षक, उद्यमबाग ठाणे

- Advertisement -

stray dog attacked death angol belgaum
stray dog attacked death angol belgaum

stray dog attacked death angol belgaum

 

 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *