St bus Bhadevadh : मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. आता एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे एसटी तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी (St bus Bhadevadh) वाढ होणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांची वाढ लवकरच लागू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या तिकीट वाढीला मंजुरी देण्यात आली, पण नवीन तिकीट दर केव्हा लागू होतील, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
St bus Bhadevadh
एसटी महामंडळाने दरवाढीसाठी प्रस्ताव तयार केला होता. सुरुवातीला १८ टक्के दरवाढीचा (St bus Bhadevadh) प्रस्ताव होता, पण आता तो १४.९५ टक्क्यांपर्यंत घटवला गेला आहे. २०२१ पासून या दरवाढीचा मुद्दा प्रलंबित होता, पण आता निवडणुकीनंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. एसटी महामंडळाच्या नियोजनात ५,००० नव्या बस खरेदी करणे, चार्जिंग स्टेशन सुरू करणे, आणि इंधन बदलणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
also read – Shreyas talapade & Alok nath यांच्यावर स्कॅमप्रकरणी तक्रार दाखल
रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ
रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यातील वाढीबाबतही चर्चा सुरु आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांची वाढ होणार आहे. ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांवरून ३१ रुपये होणार आहे. परंतु, भाडेवाढ कशी केली जाईल हे अजून निश्चित झालेले नाही. साधारणपणे, भाडेवाढ किमान तीन रुपये केली जाईल, पण दोन रुपये वाढवण्याचा विचारही होऊ शकतो.
प्रवाशांची प्रतिक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा-टॅक्सीचालकांकडून कमी अंतराचे भाडे नाकारण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे रेल्वे आणि मेट्रो स्थानकांमधील वाहतूककोंडी वाढली आहे. सामान्य प्रवाशांची प्रतिक्रिया आहे की, रिक्षा-टॅक्सीचालकांनी आपल्या सेवेचा दर्जा सुधारावा, त्यानंतर भाडे वाढवले जावे. तसेच, परिवहन विभागाने जाहीर केले आहे की रिक्षा-टॅक्सीच्या मीटरच्या प्रमाणीकरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतरच भाडेवाढ लागू होईल.