SAPAT TEA NEWS- जर तुम्ही चहा पीत असाल तर हि धक्कादायक बातमी तुमच्या साठी आहे. कारण सपट चहा या मोठ्या कंपनीच्या चहा पावडर मध्ये कीटकनाशक आढळून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने नमुना चाचणी घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. सपट कंपनीचा परिवार चहा हा महाराष्ट्र मध्ये खूपच लोकप्रिय ब्रांड आहे. अन्न व औषध अधिकार्यांना चहा पावडर मध्ये अधिक प्रमाणात कीटकनाशक आढळल्यामुळे राज्यातील सर्व सपट चहाच्या डेपो वर छापा टाकून सर्व चहा पावडर जप्त केली आहे.
SAPAT TEA कंपनीवर का टाकली धाड
नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाला SAPAT TEA कंपनीच्या परिवार ब्रांड च्या चहा पावडर मध्ये कीटकनाशके असल्याचा संशय आला. त्यामुने नाशिक येथील अन्न व औषध अधिकारी यांनी या चहाचे नमुने तपासले. तपासात असे लक्षात आले कि या सपट परिवार, सह्याद्री कडक, सह्याद्री इलायची च्या चहा पावडर मध्ये अत्यंत अधिक प्रमाणात कीटकनाशके आहेत. त्यामुळे हि सर्व चहा पावडर मानवी आरोग्यास अतिशय हानिकारक आहे असे घोषित करण्यात आले.
SAPAT TEA कंपनीवर कुठे कुठे टाकले छापे
अन्न व औषध प्रशासनाला SAPAT TEA कंपनीच्या परिवार ब्रांड च्या चहा पावडर मध्ये कीटकनाशके असल्याचा संशयावरून राज्यात अनेक ठिकाणी कंपनीच्या गोडाऊनवर छापे टाकून सर्व माल जप्त करण्यात आला आहे. खालील ठिकाणी टाकले छापे.
औरंगाबाद –
वाळूंज MIDC, औरंगाबाद येथील सपाट कंपनीच्या गोडाऊन वर छापा टाकून सह्याद्री कडक, सह्याद्री इलायची, परिवार फमिली ब्लेंड, सह्याद्री हॉटेल डस्ट या सर्व ब्रांड चे सुमारे १२ लाख रुपये किमतीचे चहा पावडर जप्त केली आहे.
पुणे –
पुणे येथील सपट इंटर नशनल प्रा. ली. येथे गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी यांनी छापा टाकून सपट चहा कंपनीचा सुमारे १५ लाख रुपयाचा माल जप्त केला आहे.
कोल्हापूर –
श्री. बालाजी एजन्सी, कोल्हापूर या ठिकाणीही कारवाई अंतर्गत छापा टाकून सुमारे २ लाख रुपये किमतीची चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.
सातारा –
सातारा येथील मे. महालक्ष्मी ट्रेडिंग शाहुपरी, या पेढीवर छापा टाकून सपाट चहाचा ३५ हजार रुपयाचा साठा जप्त केला आहे.