speculation over JDs MLAs joining Congress
13 MLAs unhappy with leadership
कर्नाटक—belgavkar : नेतृत्वाअभावी निधर्मी जनता दल पक्षाची अधोगती सुरु झाल्याची चर्चा होत आहे. पक्ष संघटनेकडे आणि भविष्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने काही आमदार पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षप्रवेशाचे आवाहन केल्याची माहिती मिळाली आहे. माजी पंतप्रधान आणि निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा उतारवयामुळे कोणत्याही कार्यक्रमात सक्रीय नाहीत.
एच. डी. कुमारस्वामी सध्या केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे कर्नाटकातील निजदकडे पूर्ण लक्ष देणे त्यांना अशक्य बनले आहे. मुलांवरील अत्याचार आणि इतर प्रकरणांमुळे एच. डी. रेवण्णा हे मोजक्याच कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आपल्या राजकीय भविष्याचा विचार करुन अनेक आमदारांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्री जी. टी. देवेगौडा, त्यांचे पुत्र व हुणसूरचे आमदार जी. डी. हरीश, देवदुर्गच्या आ. करेम्मा, शिमोगा ग्रामीणच्या आ. शारदा पूर्णानाईक, हनूरचे आ. मंजुनाथ यादगिरी, यादगिरीचे आ. कंदकूर यांच्यासह काही आमदारांनी काँग्रेस प्रवेशासाठी तयारी चालवली आहे. त्या सर्वांनी काँग्रेस प्रवेश केल्यास सर्वांना योग्य पद दिले जाणार आहे. शिवाय पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचेही आश्वासन देण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री डी. कुमारस्वामींना एच. मिळाल्यानंतर त्यांनी आमदारांना पक्षातच राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ते सध्या तारेवरची कसरत करत आहेत. पक्षामध्ये का रहावे? असा प्रश्न आमदार करत आहेत.
गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घडामोडी, देवेगौडा कुटुंबीयांची एकाधिकारशाही, विविध आरोपांमुळे पक्षावर लागलेला कलंक आदी कारणे त्यांनी कुमारस्वामींपुढे मांडली आहेत. कुमारस्वामींनी आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हमी योजना जारी करताना काँग्रेसची कसरत सुरु आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मोफत वीज योजना बारगळली आहे.
जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काँग्रेस नेते काय करत आहेत, याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आली आहे. आपल्या पक्षाबाबत कोणतीही चिंता नाही. पक्ष मजबूत करण्याचे अनेक उपाय आपल्याकडे असल्याचे कुमारस्वामींनी काँग्रेसला सांगितले आहे.
speculation over JDs MLAs joining Congress
speculation over JDs MLAs joining Congress