बेळगाव : कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे

Belgaum Belgavkar
2 Min Read
special train from Hubli for Mahakumbh Mela

बेळगाव—belgavkar—belgaum : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान कुंभमेळा होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे आहेत. या कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या भाविकांसाठी आता रेल्वे धावून आली आहे.

श्री सिद्धारूढ़ा स्वामीजी हुब्बल्लि – प्रयागराज विशेष किराया एक तरफा कुंभ मेला स्पेशल

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी बेळगाव, हुबळी या परिसरातील अनेक साधू-संत जाणार असल्याने नैर्ऋत्य रेल्वेने हुबळी-प्रयागराज मार्गावर विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याला सुरुवात होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या संगमावर जिथे साधू-संतांचा मेळावा असतो, तिथे मोठ्या संख्येने भाविकही येतात.

महाकुंभात सर्वत्र एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं, जे पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्हीही कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा आध्यात्मिक प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वे क्रमांक ०७३६९ ही एक्स्प्रेस गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता हुबळी येथून निघणार आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता ती प्रयागराज येथे पोहोचेल.

या एक्स्प्रेसला धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, पुणे असे थांबे देण्यात आले आहेत. एकूण २० डबे रेल्वेला जोडण्यात आले आहेत. नागरिकांनी या रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नैर्ऋत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रयागराज अनेक कारणांनी खास आहे. येथे अनेक प्रमुख संस्था तसेच धार्मिक स्थळे आहेत. त्रिवेणी संगमामुळे प्रयागराज, ज्याला तीर्थराज असेही म्हटले जाते, श्रद्धेचे केंद्र आहे. महाकुंभात सहभागी होणारे बहुतांश भाविक हनुमानजींचे दर्शन घेतात, याशिवाय येथे बांधलेली अनेक प्राचीन मंदिरे तुमची कुंभयात्रा अधिक आनंददायी करतील.

#KumbhMela #Prayagraj #Belgaum #Hubli #MelaSpecial #SpiritualJourney #RailwaySpecial #Mahakumbh2025 #Pilgrimage #HolyBath #DivineExperience #IndianFestivals #ReligiousGathering #TrainTravel #SacredRituals #CulturalHeritage #SpiritualAwakening #TravelIndia #FestiveVibes #KumbhYatra

special train from Hubli for Mahakumbh Mela

special train from Hubli for Mahakumbh Mela

special train from Hubli for Mahakumbh Mela

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *