असा एक मराठी माणूस ज्याने जगातील सर्वाधिक शिक्षण घेतले आहे, श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR) यांच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरासरी एक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेतो. त्यामध्ये तो प्राविण्य मिळविण्यासाठी एक किंवा दोन डिग्री मिळवतो. परंतु १४ सप्टेंबर १९५४ साली नागपूर मध्ये जन्मलेले श्री. श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR)  यांनी आपल्या लहान आयुष्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २० डिग्री मिळविल्या होत्या. या डिग्री मिळविण्यासाठी त्यांनी ४२ विद्यापीठ मधून शिक्षण घेतले आणि यातील बहुतेक डिग्री या पहिल्या नंबर ने पास केल्या आहेत. एम.बी. एस. पासून ते आय.पी.एस (IPS) आणि आय. ए. एस. (IAS) सुद्धा झाले होते श्री. श्रीकांत जिचकर. त्यांचे निधन जरी वयाच्या ४९ व्या वर्षी झाले असेल परंतु ते खूप मनमुरादपने जगले.

तब्बल १० विषयात एम.ए. पदवी घ्रेतली

एखाद्या व्यक्ती बद्दल किती ऐकावे, श्री श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR)  यांनी कधी शिक्षण सोडलेच नाही जोपर्यंत जगले काही न काही शिकतच राहिले. सामान्य माणूस एका विषयात पदवी मिळवू शकतो परंतु  श्री. श्रीकांत जिचकर यांनी तब्बल १० विषयात एम.ए. (MA) पदवी मिळवली. त्यांनी सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व, राज्यशास्त्र, तत्वज्ञान अश्या एकूण १० पेक्षा जास्त विषयात एम.ए. पदवी मिळवली आहे. त्यांचे एका विषयात कधी मन रमलेच नाही आणि एका नोकरीवरही ते कधी अवलंबून राहिले नाही.

डॉक्टर पासून वकील नंतर आय.ए.एस. चा प्रवास

श्री. श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR)  हे फक्त एम.ए. च करून थांबले नाहीत. त्यांनी असंख्य क्षेत्रात प्राविण्य मिळविले. वैद्यकिय डॉक्टर झाले नंतर डॉक्टरी मध्ये त्यांनी एम.बी.बी.एस. (MBBS) हि केले यावरच न थांबता सर्वात उच्च पदवी म्हणजेच डॉक्टरकी मध्ये त्यांनी एम.डी. (MD) हि केले. डॉक्टरकी मध्ये मन लागले नाही आणि शिक्षणाची आवड गप्प बसू देईना मग त्यांनी वकिलीचा (Advocate) अभ्यास केला आणि एल.एल.बी (LLB) ची परीक्षा देऊन पदवी मिळवली. त्यातच नंतर एल.एल.एम. (LLM) ची पदवी हि मिळवली. त्यांना वाटले यापेक्षा उच्च पदवी मिळवू या नंतर ते आय.पी.एस. झाले. आय.ए.एस. पास होण्यासाठी त्यांनी आय.पी.एस. (IPS) चे पदही सोडून दिले.

हे हि वाचा -  भारताच्या पारड्यात अजून एका सुवर्ण पदकाची भर हुकली का ? - Vinesh Phogat

मधल्या कालावधीत पत्रकारिता आणि एम.बी.ए. केले

कुणाला कशापासून किक मिळेल सांगता येत नाही. ज्या माणसाचे शिक्षण हीच आवड निर्माण झाली असेल तो माणूस गप्प कसा राहू शकतो. जे मनात येईल टी परीक्षा द्यायची आणि त्यात प्राविण्य मिळवायचे हेच श्री. जिचकर (SHRIKANT JHICHKAR)  यांची दैनंदिनी होऊन बसली होती. मधल्या काळात त्यांनी पत्रकातीतेची पदवी हि मिळवली होती, त्यांनी व्यवसाय प्रशासनात हि काम केले. त्याचबरोबर डी.बी.एम. (DBM) आणि एम.बी.ए. (MBA) मधेही त्यांनी मास्टरी मिळवली.

फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर चित्रकलेतही प्रचंड आवड होती

श्री. श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR)  यांचे व्यक्तिमत्व कोणीच समजू शकले नाही. ते फक्त पुस्तकी शिक्षणातच हुशार नाचते तर त्यांना फोटोग्राफी  (PHOTOGRAPHY) करणे हि खूप आवडायचे. त्याचप्रमाणे चित्रकला (Drawing) हि त्यांची मुख्य आवड होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक आवड म्हणून अनेक नाटकांमध्ये अभिनय (ACTING) केला आहे. सर्वात आवडीची गोष्ठ म्हणजे धर्म, आरोग्य आणि शिक्षण यांवर भाषणे देऊन जनजागृती करणे. धर्म, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर भाषणे देण्यासाठी ते त्यांच्या छोट्या आयुष्यात पूर्ण देशभर फिरले आणि जनजागृती केली.

खासदार, राज्यमंत्री, आणि राज्यसभा सदस्यही

आय.पी.एस. पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आय.ए.एस. ची परीक्षा दिली आणि ते आय.ए.एस. हि झाले. परंतु काहीतरी नवीन शिकायची किक त्यांना गप्प बसू देईना. १९८० मध्ये विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी श्री. श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR) यांनी आय.ए.एस. पदाचा राजीनामा दिला. आणि ते देशातील सर्वात तरुण खासदार (MEMBER OF PARLIAMENT) म्हणून निवडूनही आले. खासदार झाल्यानंतर त्यांनी राज्यमंत्री, राज्यसभा सदस्य आणि नंतर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अशी अनेक पदे भूषवली. श्री. श्रीकांत जिचकर हे खासदार झाल्यावर एकाच वेळेस १४ खात्याचे मंत्री होते.

वयाच्या ४९ व्या वर्षीच दुर्दैवी मृत्यू

त्यांना डॉक्टरकी हि पदवी बहाल करण्यात आली होती. त्यांनी शैक्षणिक, व्यावसायिक आणि अध्यात्मिक ज्ञान मिळविले होते. सर्वगुणसंपन्न व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतातील सर्वात पात्र व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे. अशी व्यक्ती सर्वगुणसंपन्न व्यक्ती ना आधी झाली, ना आता आहे आणि भविष्यकाळात जन्माला येईल. भारताला अश्या व्यक्तीची खूप गरज होती परंतु एकदा मित्रासंगे गाडीमध्ये जात असताना ट्रक ने धडक दिल्याने त्यांचा अपघातात (ACCIDENT) मृत्यू झाला आणि भारतातील सर्वात हुशार व्यक्तिमत्व नाहीसे झाले. सलाम डॉक्टर श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR)   यांच्या कर्तुत्वाला आणि भावपूर्ण श्रद्धांजली.  

हे हि वाचा -  गेमर्स साठी गुड न्यूज ViewSonic VX2758A 2K PRO 3 गेमिंग मॉनिटर भारतात लाँच

डॉ. श्रीकांत जिचकर यांचा मुलाचे इंस्टाग्राम पेज पाहण्यासाठी यावर क्लीक करा

1 thought on “असा एक मराठी माणूस ज्याने जगातील सर्वाधिक शिक्षण घेतले आहे, श्रीकांत जिचकर (SHRIKANT JHICHKAR) यांच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का?”

Leave a Reply