आपल्या सगळ्यांना 2018 मध्ये आलेली राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांची स्त्री (Stree 1) हा हॉरर कॉमेडी चित्रपट आठवत असेलच.
स्त्री चित्रपट भाग १ – Stree 1
- दिग्दर्शक- अमर कौशिक
- संगीत- सचिन संघवी, जिगर सरैया
- कलाकार- राजकुमार राव (Rajkumar Rao), श्रद्धा कपूर (Shraddha kapoor), पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बैंरर्जी, कृती सेनन (आयटम सॉंग)
अशी स्टार कास्ट असलेला हा सिनेमाची! Stree 1 या सिनेमाची सुरुवात होतो चंदेली नावाच्या छोट्याशा गावातील एका विचित्र चर्चेने! अचानक गावातील पुरुष गायब होतात त्यांचे कपडे फक्त सापडतात आणि हे काम एक स्त्री करतेय असे सगळ्यांना वाटत असते. स्त्री पुरुषांना त्यांच्या नावाने हाक मारून बोलवते आणि पुरुष गायब होतात. ती स्त्री म्हणजे एक आत्मा आहे असा समज असतो लोकांचा. प्रत्येकाकडे त्यांच्या कथा असतात. गावात घबराहटीचे वातावरण असते. आपल्या घराच्या भिंतीवर ‛ ओ स्त्री कल आना’ असे लोक लिहीत असतात. चंदेरी गावातील मनीष मल्होत्रा म्हणजे विक्की (राजकुमार राव) लेडीज टेलर असतो आणि तो 31 मिनिटात बायकांचे घागरे शिवून देत असतो त्याचे दोन मित्र असतात एक बिट्टू ( अपारशक्ती खुराना) आणि जाना (अभिषेक बैनर्जी)
ती स्त्री म्हणजे एक वैश्या असते जिला एका पुरुषाने मारले आहे. अशी आख्यायिका गावात सांगितली जात असते.
विक्की एका मुलीला (श्रद्धा कपूरला) भेटतो. ती त्याला आवडते.ही मुलगी गावात जेंव्हा पूजेचे दिवस असतात तेंव्हाच येते ना तिच्याकडे मोबाईल असतो ना ती तिचे नाव सांगते. बिट्टूला संशन असतो की गावातल्या पुरुषांना जिने गायब केलं आहे. ती स्त्री म्हणजे श्रद्धा कपूर आहे आणि या सगळ्या रहस्याचा छडा बिट्टू, विक्की, जाना आणि रुद्र(पंकज त्रिपाठी )हे सगळे मिळून लावतात.
या नोटवर हा चित्रपट संपतो. पण ती स्त्री म्हणजे खरंच श्रद्धा कपूर असते का? आणि गावातील पुरुष कुठे गायब झाले असतील आणि श्रद्धा कपूर जशी अचानक येते तशी निघून ही जाते तर ती कुठे जाते? या सगळे प्रश्न मात्र Stree 1 मध्ये अनुत्तरित राहिले होते आणि त्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा स्त्री दोन या चित्रपटातून होईल असे वाटते. हो स्त्री दोन (Stree 2) चित्रपट येत आहे तो कधी? कसा? चित्रपटाची स्टार कास्ट काय? याची माहिती आपण पाहणार आहोत.
स्त्री चित्रपट भाग २ – Stree 2
- दिग्दर्शक- अमर कौशिक
- संगीत – सचिन जिगर, जस्टीन वेगस
- कलाकार – राजकुमार राव (Rajkumar Rao), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बैंरर्जी
- रिलीज डेट -15 ऑगस्ट 2024
Stree 2 या चित्रपटाचा ट्रेलर लँज झाला आहे आणि त्याची कथा ढोबळ मानाने आपल्याला ट्रेलरवरून कळले ती अशी आहे. आधी पुरुष गायब होत होते जे स्त्री जिला एका पुरुषाने मारले होते ती पुरुष गायब करत होती पण आता उलट कथा असेल ज्या पुरुषाने त्या स्त्रीला मारले होते तो सरकटा पुरुष गावातील स्त्रियांना गायब करत आहे त्याला सरकटा असे ट्रेलरमध्ये संबोधले जात आहे. ट्रेलरमध्ये फक्त त्याचे अनिमेडेड डोके दाखवले आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि त्याचे मित्र मंडळ या सरकटाशी लढण्याची तयारी करताना दाखवले आहे.
Stree 2 – ट्रेलरमध्ये जे ऍनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट वापरले आहेत ते खूपच चांगले वाटतात. श्रद्धा कपूर देखील त्या सरकटा बरोबर लढताना दाखवली आहे पण ती नेमकी तीच स्त्री आहे का? या रहस्याचा उलगडा आपल्याला या चित्रपट होण्याची शक्यता आहे. तसेच आधीच्या चित्रपटात त्या स्त्रीची अर्धवट राहिलेली कथा या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पूर्ण होऊ शकते.
नेहमीप्रमाणे ट्रेलरमध्ये राजकुमार रावचा उकृष्ट अभिनय दिसून येतो. अनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट पाहताना मजा येणार असे दिसतेय. आता चंदेली गावात हा सरकटा पुरुष काय धुमाकूळ घालणार आहे आणि त्याला राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बैंनर्जी हे सगळे मिळून कसे तोंड देणार आहेत हे पाहण्या सारखे असणार आहे.
स्त्रीच्या रहस्यानंतर आता सरकटा पुरुषाचे आगमन या कथेत होणार म्हणजे कथा इंटरेस्टिंग असणार आहे यात वाद नाही. आता या पुरुषाचे डोके कोणी आणि का कापले? श्रद्धा कपूर खरंच ती स्त्री आहे का? आणि त्या स्त्री आणि सरकटा पुरुषात काय संबंध आहे? तो सरकटा पुरुष स्त्रियांना गायब का करत आहे? आणि राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर आणि त्यांची मंडली या चित्रपटात काय धूमछान उडवर हे पहायला मजा येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून तर चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे पण 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला Stree 2 चित्रपट पाहण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
मग पुन्हा एकदा तयार व्हा एक भन्नाट हॉरर कॉमेडी पाहायला आणि राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची केमस्ट्री पडद्यावर अनुभवायला स्त्री दोनमध्ये (Stree 2)!
अजित कुमारचे कोटींचे कार संग्रह | AJITH KUMAR EXPENSIVE CAR AND BIKE COLLECTIONS
2 thoughts on “या महिन्यात श्रद्धा कपूर चा हॉरर स्त्री दोन (Stree 2) चित्रपट येतोय, पहायला विसरू नका”