गोव्यात बुडता बुडता वाचलो…

Belgaum Belgavkar
2 Min Read

YouTuber Ranveer Allahbadia and girlfriend saved from drowning in Goa by IPS officer and his IRS officer wife

YouTuber Ranveer Allahbadia, girlfriend rescued from drowning in Goa

  • यूट्युबर रणवीरने सांगितला समुद्रातील थरार
  • YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर

YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादियाने त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे. यावेळी त्याची गर्लफ्रेंड देखील त्याच्यासोबत होती. गोव्याच्या समुद्रातील थरार त्याने सांगितला आहे. एक आयपीएस अधिकारी आणि त्याच्या आयआरएस पत्नीने त्याला बुडण्यापासून वाचवलं. “आम्ही आता पूर्णपणे बरे आहोत” असं रणवीर अलाहबादियाने सांगितलं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने याबाबत पोस्ट केली आहे. रणवीरने त्याला आणि गर्लफेंडला वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले आहेत. “आम्ही आता पूर्णपणे बरे आहोत. पण काल ​​संध्याकाळी ६ वाजता मी आणि माझी गर्लफ्रेंड एका प्रसंगातून थोडक्यात वाचलो आहोत. आम्हाला दोघांनाही समुद्रात पोहायला आवडतं. मी तर हे लहानपणापासून हे करत आहे. पण काल ​​आम्ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलो.”

“माझ्यासोबत यापूर्वीही असं घडलं आहे परंतु तेव्हा माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं. एकटं पोहणं खूप सोपं आहे. पण आपल्यासोबत असलेल्या एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणं खूप कठीण आहे. ५-१० मिनिटांच्या स्ट्रगलनंतर, आम्ही मदतीसाठी हाक मारली आणि जवळच पोहणाऱ्या ५ जणांच्या कुटुंबाने आम्हाला लगेचच वाचवलं. आम्ही दोघंही खूप चांगले स्विमर्स आहोत पण निसर्गाचा प्रकोप असा आहे की, तो कधीतरी तुमच्या मर्यादांची परीक्षा घेईल.”

“आम्ही दोघेही पाण्यामध्ये वाचण्यासाठी धडपड करत होतो. भरपूर पाणी माझ्या तोंडात गेलं होतं. तेव्हाच मी मदतीसाठी ओरडायचं ठरवलं. आम्हा दोघांना वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी पती आणि आयआरएस अधिकारी पत्नीच्या कुटुंबाचे मनःपूर्वक आभार. या अनुभवाने आम्ही दोघंही ब्लँक आणि ग्रेटफूल आहोत. संपूर्ण घटनेत देवाने आमचं संरक्षण केलं असं आम्हाला वाटतं.”

- Advertisement -

#Goa #RanveerAllahbadia #DrowningRescue #YouTuber #IPSOfficer #IRSOfficer #OceanAdventure #Grateful #SurvivalStory #Swimming #BeachLife #Thankful #HeroicRescue #LifeSaving #GoaDiaries #CoupleGoals #AdventureAwaits #Nature’sPower #WaterSafety #Inspiration

saved from drowning in Goa by IPS officer
saved from drowning in Goa by IPS officer

saved from drowning in Goa by IPS officer

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *